योगासने करताना काय काळजी घ्यावी ?

योगासने करताना काय काळजी घ्यावी ?
योगासन हि साधारण गोष्ट नाही ,हि एक शारीरिक साधना आहे, ज्यात नियम, शिस्त , आत्मविश्वास आणि सातत्याची गरज भासते.सतत सराव करीत राहणे गरजेचे आहे .योगासन करण्यापूर्वी हे जाणून घेणे आवश्यक आहे कि योगासने काय आहेत? काय काळजी घेणे फार महत्वाचे आहे.
- योगासन करणाऱ्या व्यक्तीने सराव करण्यापूर्वी पोटाची स्वच्छता करणे आवश्यक आहे.
- योग साधना करणाऱ्या व्यक्तीला मलावरोधाची तक्रार नसावी. जर एखाद्याला सकाळी चहा कॉफी पिण्याची सवय असेल परिणामासाठी हे न पिणेच चांगले राहील.
- योगासनांचा सराव करण्याच्या कमीत कमी एक तासानंतरच काही खायला हवे.
- योगासने सूर्यदयाच्या पूर्वी आणि सूर्यास्तानंतर करावीत.
- कठीण योगासनांचा सराव सकाळी आणि सोप्या योगासनांचा सराव संध्याकाळी करणेच योग्य असते. योग साधना सतत सराव, निष्ठा आणि दृढ निश्चय यानेच वेळेवर होऊ शकते.
- योग साधनेत अनेक अडथळे येतात, जे गैरसमजुतीच्या रूपात योगसाधकांसमोर येतात. आपण आपले मन शुद्ध करून आणि ध्यान केंद्रित करून या अडथळ्यांना दूर करू शकता. आपल्याला धीर बाळगून दृढ संकल्प घेऊन आपली साधना करीत राहायची आहे.
- महर्षी पतंजली यांनी योग साधकांसमोर येणाऱ्या अडचणींना दूर करण्यासाठी स्वतः मध्ये मैत्री,करुणा, आनंद आणि अपेक्षा यांसारखी भावना जागृत करण्याला सर्वोत्तम मानले आहे आणि हा एक सात्विक मार्ग आहे. याचा सराव करणारा शारीरिक आणि आत्मिक सौन्दर्य मिळवतोच.
योगासने करताना काय काळजी घ्यावी ?
- योगासने स्वच्छ,हवेशीर आणि किटाणूरहित अशा जागी करायला हवीत, जिथे गडबड गोंधळ नसेल किंवा जवळपास कोणी खेळत नसेल.
- योगासने सपाट जागेवर किंवा सपाट जमिनीवर करावीत. सतरंजी किंवा घडी केलेली घोंगडी घालून योगासने करावीत.ओबडधोबड जमीन योगासनांसाठी योग्य नसते.
- योगासने सुरु करताना डोळे उघडे आणि मांसपेशींना तणावमुक्त ठेवावे.एखाद्या आसनाला आपण नियमाने आरामात करू शकत असला तर डोळे बंदही करता येतील.
- योगासने करताना शरीर सक्रिय आणि मेंदू निष्क्रिय असायला हवं . तरीही सतर्कता आणि सावधगिरी सोडायला नकॊ. मेंदूवर तणाव वा जोर देऊन केलेल्या सरावाच्या दरम्यान आपल्याला आपल्या चुका समजणार नाहीत.
- योगासनांच्या वेळी फक्त नाकानेच श्वसन करावे. तोंडाने श्वास घेणे अपायकारक ठरू शकते. आसनाच्या मुद्रेत सराव करताना श्वास थांबवू नये.
- मधुमेह आणि रक्तदाबाच्या रुग्णाला शीर्षासन करणे वर्ज्य आहे. त्यांनी सर्वांगासनाही करू नये. याच्या मुद्रा रक्तदाबाला प्रभावित करू शकतात.पुढे वाकून केली जाणारी आसने या रुग्णांसाठी फायदेशीर असतात.
- स्त्रियांनी पाळीच्या दिवसांमध्ये योगासने करू नये.कारण या अवस्थेत गर्भाशयाचे तोंड उघडे असते आणि तिथून रक्तस्त्राव होत राहतो. योगासनांच्या प्रभावाने जास्त रक्तस्त्राव होऊ शकतो आणि इतर त्रास उद्भवू शकतो.
- गर्भावस्थेतही योगाभ्यास करू नये. गर्भावस्थेचे सुरुवातीचे तीन महिने उलटून गेल्यावरच सहज क्रिया असणारी योगासने करावीत.
- योगासनांच्या वेळात मनावर नियंत्रण ठेवायला शिकावे.
- योगासनांची सुरुवात योगाच्या जाणकार व्यक्तीच्या मार्गदर्शनातच करावी. योगाभ्यासाच्या दरम्यान सैल कपडे घालावे.
- योगाभ्यासाच्या लगेच नंतर अंघोळ करू नये आणि कुठलेही थंड वा गरम पदार्थ घेऊ नये. योगाभ्यासाच्या कमीत कमी ३० मिनिटानंतर याचे सेवन करावे.
- चुकीच्या पद्धतीने केलेल्या योगासानाने शारीरिक त्रास किंवा अस्वस्थता होऊ शकते.योगाभ्यासापुर्वी त्याच्या पद्धतीची पूर्ण माहिती घ्यावी.योग्य पद्धतीने केलेल्या योगाभ्यासाने शरीर निरोगी व आनंदी राहते.
- योगाभ्यासाने शरीरातील आजारच दूर होत नाहीत तर मानसिक रोगही दूर होतात आणि सध्याच्या परिस्थितीत हे फार गरजेचे आहे.
- योग अनवाणी करणे चांगले असते.योगाच्या वेळी आपल्याजवळ योग ब्लॉक,पट्ट्या,सॅन्डबॅग आणि लाकडी ब्लॉक अवश्य पाहिजे.
- हिवाळ्यात योगासने करणे फार गरजेचे आहे. कारण याने शारीरिक क्षमता विकसित होते. मन आनंदी राहते. योगाने अतिरिक्त कॅलरीज खर्च तर होतातच पण मनाला आनंदी ठेवणारे हार्मोन्स हि जास्त प्रमाणात निघतात.
- दररोज ३० मिनिटांचे योग शरीराला निरोगी ठेवण्यासाठी पुरेसे असते.
- योग करण्यापूर्वी शरीराला ‘वार्म अप’ करणे आवश्यक असते. कारण हिवाळ्यात मांसपेशी ताठर असतात. ‘वार्म अप’ केल्यावर सामान्य योगासने आणि प्राणायाम करावे.
- हिवाळ्यात योग करताना आणि बाहेर फिरताना शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी एका जाड वस्त्राऐवजी कमीत कमी वस्त्रांचे तीन थर घालावेत. सर्वात आतले वस्त्र योग करताना उत्पन्न झालेला घाम शोषून घेईल मधील वस्त्र शरीर गरम ठेवेल आणि बाहेरील वस्त्र जे वॉटर प्रूफ आणि विंटर प्रूफ असेल,शरीराचा थंड वाऱ्यापासून बचाव करेल.
Yoga and There Rules|योगासन आणि त्याचे नियम
- शरीराला थोडा वेळा आराम द्या.कारण योग झाल्यावर लगेच कपडे काढल्याने शरीरात उत्पन्न ऊर्जा वेगाने नष्ट होते.
- योगासने केल्यावर नकळत शरीरातील पाण्याची पातळी कमी होते.म्हणून योग केल्यावर पाणी आणि तरल पदार्थाचा वापर पुरेशा प्रमाणात करावा.
- फिरण्यासाठी अशा जागेवर जावे जिथे मंद हवा वाहत असेल.
- थंडी फार असेल तर बाहेर जाऊ नये. घरातच ट्रेडमिल,प्राणायाम आदी करावे.
- बर्फयुक्त,चिखलयुक्त आणि दलदली जागांवर जाऊ नये.
- फिरताना डोक्यावर स्कार्फ व गरम टोपी घालावी.
- थंड वाऱ्यामुळे छातीत ताठरपणा आणि श्वासासंबंधी समस्या उद्भवू शकतात. डोके, मान आणि तोंडाला रुमालाने झाकावे.
- योगा मेंदूच्या रासायनिक घटकांना सक्रिय करून मनाला आनंदी ठेवतो.
- गंभीर रोग जसे उच्चरक्तदाब, हृदयरोग आणि डायबेटिस पासून रक्षण करते.
- अतिरिक्त कॅलरीज खर्च होऊन वजन संतुलित राहते आणि शरीराचा आकार योग्य प्रमाणात राहते.
- योगामुळे हृदयआणि फुफुसांना बळकटपणा मिळतो. कारण यांच्या ऊतकांना पुरेसे ऑक्सिजन आणि पोषक घटक मिळतात.
- शरीराच्या सगळ्या अवयवांना जास्त प्रमाणात ऑक्सिजन प्राप्त होतो.
- योगामुळे हाडे, सांधे आणि मांसपेशी मजबूत होतात.
- शरीराचे रोगप्रतिकार तंत्र मजबूत होते.

दिनचर्येत बदल करा
निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी व्यग्र राहणे फार गरजेचे आहे.आपल्या दिनचर्येत बदल घडवून आपण आरामात व्यग्र राहू शकता आणि वेळेवर कामे पूर्ण करू शकता. कशाप्रकारे ते पाहू
- निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी व्यग्र राहणे फार गरजेचे आहे.आपल्या दिनचर्येत बदल घडवून आपण आरामात व्यग्र राहू शकता आणि वेळेवर कामे पूर्ण करू शकता. कशाप्रकारे ते पाहू.
- घरातच असा नाश्ता तयार करून ठेवावा, जो आरामदायी होण्यासोबतच चविष्टही असेल,त्याला पॅक करून कार्यालयात न्यावे.
- आपल्याला ऑफिस मिटिंगसाठी बाहेर जावे लागले आणि बाहेरचे जेवावे लागले तर सॅलड आणि सूप जास्त प्रमाणात घ्यावे.तेलकट,मसालेदार जेवणाऐवजी असे जेवण मागवावे,जे आपल्यासाठी अपायकारक नसेल.
- उन्हाळ्याच्या दिवसामध्ये थंड पेय पदार्थ घेताना काळजी घ्यावी कि त्यात केमिकल नसेल,आपण ज्युस,सरबत जास्त प्रमाणात घेऊ शकता.
- उन्हाळ्याच्या दिवसामध्ये थंड पेय पदार्थ घेताना काळजी घ्यावी कि त्यात केमिकल नसेल,आपण ज्युस,सरबत जास्त प्रमाणात घेऊ शकता.
- वाचता-वाचता बोअर झाला असेल तर उभे राहा आणि ५-१० मिनिटे फेऱ्या माराव्या
- नकारात्मक विचार करू नये कारण त्याने तणाव वाढतो आणि आपल्यात खळगा निर्माण होतो. नकारात्मक विचार करणारे सकारात्मक विचार करणाऱ्यांच्या तुलनेत कमी जगतात.
- नकारात्मक विचार करणारे इतर लोकांच्या तुलनेत जास्त प्रमाणात जेवतात, त्यामुळे पुढे जाऊन त्यांची आजारी पडण्याची शक्यता वाढते.
- नकारात्मक विचार मनात न येवो त्यासाठी सकारात्मक कामात लागावे.
- नकारात्मक विचार मनात न येवो त्यासाठी सकारात्मक कामात लागावे.
- सकारात्मक आणि आशावादी विचार ठेवणारे व्यक्ती सक्रिय आणि निरोगी राहते आणि ती निराश होत नाही. असे लोक जास्त वयापर्यंत तारुण्याचं उपभोग घेतात.
- सकारात्मक आणि आशावादी विचार ठेवणारे व्यक्ती सक्रिय आणि निरोगी राहते आणि ती निराश होत नाही. असे लोक जास्त वयापर्यंत तारुण्याचं उपभोग घेतात.
योगाभ्यासाने रोगी माणसाला जीवन ऊर्जा मिळते आणि त्याला स्थायीपणे आरोग्य प्राप्त होतो. निरोगी माणसाच्या बळ आणि आरोग्यात वाढ होते आणि त्याला दीर्घ आयुष्य लाभते. आसन कित्येक श्रेणीमध्ये विभागलेली आहेत. शारीरिक आरोग्य आणि शारीरिक शक्ती यादीप्रमाणे आसनांची निवड करायला हवी. जे रुग्ण आहेत, त्यांना आपल्या विकाराला लक्षात घेऊन आसनांची निवड केल्याने फायदा होतो.निरोगी राहण्यासाठी योगाभ्यास आज प्रत्येक माणसासाठी आवश्यक आहे. त्याच्याशिवाय निरोगी राहणे अवघड आहे. योगाभ्यासाने रुग्ण माणसाला जीवन ऊर्जा मिळते आणि त्याला स्थयीपणा आरोग्य प्राप्त होते. निरोगी माणसाच्या बळ आणि आरोग्यात वाढ होते आणि त्याला दीर्घ आयुष्य लाभते.
धन्यवाद
हे पण वाचा- लहान मुलांचा पौष्टिक आहार
हे पण वाचा-मुलांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी उपाय