Vhollyball Information|व्हॉलीबॉल ची माहिती

तर मित्रांनो आणि मैत्रिणीनो आज आपण जाणून घेणार आहे व्हॉलीबॉल ची संपूर्ण माहिती , अटी , आणि नियम

व्हॉलीबॉल ची मराठी मधून माहिती/ व्हॉलीबॉल चे नियम आणि अटी/Vhollyball Information

Vholyball Ground

Vhollyball Information|व्हॉलीबॉल ची माहिती

व्हॉलीबॉल ची ऐतिहासिक पार्श्वभूमी

व्हॉलीबॉल ची मराठी मधून माहिती व्हॉलीबॉल चे नियम आणि अटी आज आपण जाणून घेणार आहोत.भारतामध्ये हा खेळ खूप वर्षांपासून खेळला जातो. व्हॉलीबॉल हा खेळ जेवढा शहरात लोकप्रिय आहे. तेवढाच तो गावामध्ये पण प्रसिद्ध आहे.
असे मानले जाते कि, एका काळामध्ये या खेळाला (Mintonet )’ मिन्टोनेट ‘ नावाने ओळखले जात होते. या खेळाच्या सुरुवातीला हा खेळ केवळ बास्केटबॉलच्या ब्लॅडरसोबात खेळला जात होता. स्प्रिंगफील्ड कॉलेजचे डॉक्टर होल्स्टइड्ने या खेळाला ‘व्हॉलीबॉल ‘हे नाव दिले. १९४७ मध्ये या खेळाला आंतरराष्ट्रीय संघटना बनवली गेली. ज्या मध्ये व्हॉलीबॉल चे वेगवेगळे नियम बनवले गेले. जसा व्हॉलीबॉल चा प्रभाव अमेरिकेत वाढला तसा जगातील इतर देशात याची लोकप्रियता वाढत गेली. १९५४ मध्ये या खेळात स्पेन, अमेरिका पण सामील झाला. त्या नंतर टोकियो ऑलिम्पिक खेळामध्ये पहिल्यांदा सामील केला गेला.

व्हॉलीबॉल हा खेळ ज्या मैदानावर खेळला जातो, त्याला कोर्ट असे म्हणतात. व्हॉलीबॉल कोर्टाची लांबी १८ मी आणि ९रुंदी असते. जमिनीपासून २.मीटरपर्यंतच्या ठिकाणापर्यं कोणताही अडथळा नसावा, कोर्टाच्या सर्व सीमारेषा ५ सेमी जाडीच्या असतात,व्हॅलीबॉल खेळाची सुरुवात सर्व्हिस करून केली जाते. मैदानाच्या लांबीच्या मध्यभागी म्हणजे ९ मीटरवर मध्यरेषा असते. त्या रेषेच्या दोन्ही बाजूला ३ मीटर अंतरावर अटॅक लाईन असते.

जाळी (Net )

व्हॉलीबॉल कोर्टाच्या मध्यभागी ९. मी लांब आणि १ मी रुंद जाळी बांधली जाते. जाळीतील प्रत्येक चौकोन हा १० x१० सेमी चा असतो. जाळीचा वरच्या व खालच्या बाजूला ३ सेमी उंचीचे कॅनवास शिवलेले असते. जाळीची जमिनीलपासून उंची पुरुषांसाठी ३.४३ व स्त्रियांसाठी २. सेमी असते . खांबापाशी नेटची उंची २ सेमी च्या फरकापेक्षा जास्त नसावी.

सर्व्हिस एरिया (Service एरिया)
व्हॉलीबॉल खेळाची सुरुवात सर्व्हिस ने केली जाते. सर्व्हिस क्षेत्र दोन रेषेद्वारे निर्धारित केली जाते. या रेषा ६ इंच लांब आणि २ इंच जाड असतात.

चेंडू (Ball )
व्हॉलीबॉल खेळण्यासाठी वापरला जाणारा चेंडू हा कातड्याचा गोलाकार असावा. त्याचा रंग सर्व बाजूने सारखाच असावा. आता मात्र दोन तीन रंगामध्ये चेंडू चालतो. चेंडूचा परीघ किमान ६५ सेमी ते ६७ सेमी असावा. वजन कमीत कमी २६०ग्राम ते जास्तीजास्त २८० ग्राम असावे. इनडोअर हॉलमध्ये खेळणारे संघ विविध रंगाचे चेंडू वापरताना दिसतात.

खेळाडू (Players )
व्हॉलीबॉल हा खेळ दोन संघामध्ये खेळला जातो. प्रत्येक संघामध्ये १२ खेळाडू असतात. यातील प्रत्यक्ष सामन्यांमध्ये भाग घेणारे ६ आणि बदली खेळाडू ६ असतात. सामना सुरु करण्यापूर्वी त्या खेळाडूची नावे गुणपत्रकात नोंदवली गेली असतील त्याच खेळाडूला सामन्यात भाग घेता येईल. ६ पेक्षा कमी खेळाडूंना सामना सुरु करता येत नाही. संघातील एकूण १२ खेळाडूंपैकी एक विशेष खेळाडू/ लिबेरो खास बचावात्मक असतो. लिबेरो हा संघाचा captian होऊ शकत नाही. लिबेरो हा खेळाडू संघातून केंव्हाही बाहेर येऊ शकतो व आत जाऊ शकतो.

पोशाख (युनिफॉर्म)
व्हॉलीबॉल खेळाडू स्पर्धेत खेळताना जर्सी व शॉर्ट घालून खेळतात. सर्व संघाचे गणवेश एकसारखे असावे.खेळाडूने परिधान केलेल्या पोशाखावर ४ सेमी उंच पुढे आणि पाठीमागे १५सेमी उंच नंबर ठळक आणि स्पष्ट टाकलेला असावा. संघचालकाने आपला नंबर बरोबर २ सेमी x १. ५ सेमी चे बोधचिन्ह जर्सी च्या निराळ्या रंगात लावलेला असतो. लिबेरो खेळाडूंचा पोशाख संघातील इतर खेळाडू पेक्षा वेगळ्या रंगाचे असणे आवश्यक असते.

बदली खेळाडू (Substitue Player )
बदली खेळाडू कोणत्याही आजारी,स्थाई किंवा अस्थाई खेळाडूच्या स्थानावर खेळात प्रवेश करू शकतात. सर्व बदली खेळाडू आणि प्रशिक्षक व्हॉलीबॉल कोर्टाच्या एका बाजूला पंचाच्याविरुद्ध बाजूला असतात. प्रत्येक खेळाडूने खेळामध्ये प्रवेश करताना किंवा मैदानाच्या बाहेर येताना पंचांची परवानगी घेणे आवश्यक असते. तसेच गुणलेखकांना सूचना द्यावी लागते. कोणताही खेळाडू खेळामध्ये केवळ एका वेळेसच बदली खेळाडूंकडून बदलला जाऊ शकतो. खेळात असणारा खेळाडू खेळातून बाहेर आल्यावर त्याच पारीमध्ये खेळात प्रवेश करू शकत नाही. खेळाडू बदलण्याची क्रिया नेहमीच बॉल डेड झाल्यावर केली जाते. एखाद्या संघातील खेळाडूला दुखापतीमुळे बाहेर बसावे लागले तर तो संघ अपूर्ण होतो. या परिस्थिती राखीव खेळाडूतील कोणताही खेळाडू क्रीडांगणात जाऊ शकतो

खेळाडूची स्थिती (Players Position )
व्हॉलीबॉल खेळ सुरु होताना दोन्ही संघाच्या खेळाडूंनी तीन – तीन च्या दोन रांग करून आपापल्या अंगणात उभे राहायचे असते. सर्व्हिस रेषेजवळ १ नंबर त्याच्या डाव्या बाजूला ६ नंबर , त्याच्या डाव्या बाजूला ५ नंबरच खेळाडू असेल, ५नंबरच्या पुढे ४ नंबरचा ,६ नंबरच्या पुढे ३ नंबरचा व १ नंबरच्या पुढे २नंबरचा खेळाडू असेल, १ नंबर सर्व्हिस झाल्यावर २ नंबर सर्व्हिस करेल. १ नंबर च्या जागी ६ नंबर ,३ number २ च्या जागी जातील व तो गेम संपेपर्यंत असेच परिभ्रमण चालेल, वर दिलेली नंबर हे खेळाडूचे jersy नंबर नसून त्या जागेचा क्रमांक आहे.खेळाडूच्या स्थितीसंबंधी कोणतीही चूक झाल्यास चुका करणाऱ्या संघाच्या विरुद्ध संघास एक गुण दिला जातो. जर सर्व्हिस संघाकडून खेळाच्या स्थितीसंबंधी चूक झाली असेल तर विरोधी संघाला एक गुण आणि सर्व्हिस असे दोन्ही फायदे मिळतातं . सर्व्हिस झाल्यानंतर खेळाडू अंगणांत कुठेही जाऊ शकतो. मात्र प्रत्येक गुणांसाठी सर्व्हिस करताना व परतवताना योग्य त्या नोंदवलेल्या परिभ्रमण क्रमातच प्रत्येक खेळाडू आला पाहिजे.

जाणून घ्या व्हॉलीबॉल ची माहिती मराठी मध्ये

सर्व्हिस (Service )
व्हॉलीबॉल सर्व्हिस करणारा खेळाडू ९ मी लांब असलेलया अंतिम रेषेच्या पाठीमागून सर्व्हिस करतो. नियमानुसार संपूर्ण ९ मी लांब अंतिम रेषेमागून सर्विस करणे वैध आहे. पंचाची शिटी वाजताच चेंडूला बंद मुठीने किंवा हाताने टॉस करून खेळाडू अशा प्रकारे मारतात कि , चेंडू मध्यरेषेवरील जाळीवरून विरोधी संघाच्या अंगणात जाईल . सर्व्हिस करणाऱ्यास गुण मिळतात, पंचाची शिटी वाजल्यानंतर पाच सेकंदाच्या आता सर्व्हिस करावी लागते.

सर्व्हिस संबंधी चुका (Service Faults )
खालील चुका झाल्यावर पंच शिटी वाजवून सर्व्हिस change करतात.

१) सर्व्हिस केलेला चेंडू नेटवरून किंवा नेटला लागून प्रतिस्पर्धी संघाच्या अंगणाच्या बाहेर पडल्यास.
२)सर्व्हिस केलेला चेंडू अँटिनाच्या बाहेरून गेल्यास किंवा लागल्यास.
३)सर्व्हिस करताना अंतिम रेषेला सर्व्हिस करणाऱ्या खेळाडूंचं स्पर्श झाल्यास.
४)सर्व्हिस केल्यानंतर चेंडू जाळीत अडकल्यास किंवा चेंडू जाळीखालून गेल्यास.
५)सर्व्हिस केल्यानंतर विरोधी संघाच्या अंगणात चेंडू पोहोचण्यापूर्वी सर्व्हिस करण्याच्या संघातील खेळाडूला स्पर्श झाल्यास.

स्कोर (Score)
व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये प्रत्येक परीचा विजेता तोच संघ मानला जातो, जो विरोधी स्पर्धकापेक्षा कमीत कमी दोन अंक अधिक घेईल, तसेच सर्वप्रथम २५ अंक प्राप्त करेल,
पुढील परिस्थितीत एक संघ एक गुण मिळवतो.
१)खेळताना विरोधी संघाच्या कोणत्याही खेळाडूने दुसऱ्या संघातील कोणत्याही खेळाडूला खेळताना अडथळा आणल्यास.
२)सर्व्हिस करताना अंतिम रेषेला स्पर्श झाल्यास त्याच्या विरोधी संघास एक गुण दिला जातो.
३) चेंडू अँटिनाला लागल्यास किंवा अँटिनाच्या बाहेरून चेंडू गेल्यास प्रतिस्पर्ध्यास एक गुण दिला जातो.
४)चेंडू मैदानाच्या बाहेर पडल्यास सर्वात शेवटी ज्या संघाच्या खेळाडूचा स्पर्श चेंडूला झाला असेल त्याच्या विरोधी संघास एक गुण मिळतात.
५)सर्व्हिस करताना रोटेशन चुकणाऱ्या संघाच्या विरोधी संघास एक गुण मिळतो.
६)टॉस न करत सर्व्हिस केल्यास सर्व्हिस करणाऱ्या संघाच्या विरोधी संघास एक गन मिळतो

चेंडू मारणे (Ball Contacts )
प्रत्येक संघाविरोधी संघाच्या क्षेत्रात चेंडूला पोहोचवण्यासाठी तीन वेळा मारू शकतो. चेंडू शरीराच्या कोणत्याही भागाला एकावेळी स्पर्श करू शकते. चेंडू कमरेच्या वरील कोणत्याहि भागाने मारला जाऊ शकतो. जर चेंडू कोणत्याही खेळाडूच्या हातामध्ये काही वेळपर्यंत ठेवला जातो तेंव्हा त्याला चेंडू पकडला असे मानले जाते. चेंडूला खालून दोन्ही हाताने एकाच वेळेस मारले गेले पाहिजे. जेंव्हा कोणताही खेळाडू एकापेक्षा अधिक वेळा लागातार आपल्या शरीराच्या कोणत्याही भागाद्वारे चेंडूला स्पर्श करतो.तेंव्हा पंच शिटी वाजवून त्याच्या विरोधातील संघाला एक गुण देतात.

खेळाडूचे आचरण (Conduct Of Players )
व्हॉलीबॉल खेळाच्या सर्व नियमांची माहिती असणे सर्व खेळाडूकरिता आवश्यक असते. तसेच त्या नियमाचे पालन करणेही महत्वाचे असते. कोणताही खेळाडू त्याच संघाच्या कर्णधारामार्फत पंचाशी बोलू शकतो.
पुढील प्रकारच्या चुकीच्या आचरणावर खेळाडूला शिक्षा असते.
१)पंचाच्या परवानगीशिवाय खेळ चालू असताना मैदानाबाहेर किंवा आत जाणे.
२)पंचाच्या निर्णयावर त्याच्याशी वाद घालणे.
३)विरोधी खेळाडूस अपशब्द बोलणे.
४)पंचांना अपशब्द बोलणे.
५)पंचाच्या निर्णयाला प्रभावित करण्यासाठी अनुचित व्यवहार करणे.
६)चेंडूला स्पर्श होताच टाळी वाजवणे, ओरडणे तसेच कोणत्याही प्रकारच्या नियमाविरुद्ध आचरण करणे.

शिक्षा (Penalty )
साधारण प्रकारच्या चुकीकरिता साधारण चेतावणी दिली जाते. जर तीच चूक पुन्हा पुन्हा केली जाते तर पंचाद्वारे त्या खेळाडूला लाल कार्ड म्हणजे व्यकीतगत शिक्षा दिली जाते, यामुळे त्या संघ एक गुण गमावतो किंवा सर्व्हिस चा अधिकार दुसऱ्याला दिला जातो. गंभीर स्वरूपाच्या चुकीबद्दल खेळाडूच्या विरुद्ध गुणपत्रिकेवर चेतावणी लिहिली जाते.यामुळे त्याचा संघ एक गन किंवा सर्व्हिस चा अधिकार पुन्हा एकदा गमावू शकतो.तरीसुद्धा तो खेळाडू पुन्हा चुका करत असेल तर खेळाडूला एक परी किंवा संपूर्ण खेळातून बाहेर केल्या जाते

जाळीवर खेळ (Play at The Net )
१)सर्व्हिस आणि इतर वेळेस जेंव्हा चेंडू जाळीला (नेटला )शिवून दुसऱ्या अंगणात जातो तेंव्हा तो Foul नसतो.
२)जेंव्हा दोन विरोधी खेळाडू जाळीला (नेटला ) एकदाच स्पर्श करतात तेंव्हा दुहेरी चूक (Double Foul ) मानला जातो.३)खेळ चालू असताना मैदानाच्या बाहेरून मात्र जाळीवरून आणि दोन्ही अँटिनामधून आलेला चेंडू वैध मानला जातो.४)जेंव्हा चेंडू अधिक वेगाने जाळीवर जाऊन आदळतो त्या वेळी जाळी विरोधी खेळाडूला स्पर्श करू शकते. अशा वेळी त्या खेळाडूला जाळीच्या स्पर्शाबद्दल जबाबदार मानत
४)जेंव्हा चेंडू अधिक वेगाने जाळीवर जाऊन आदळतो त्या वेळी जाळी विरोधी खेळाडूला स्पर्श करू शकते. अशा वेळी त्या खेळाडूला जाळीच्या स्पर्शाबद्दल जबाबदार मानतनाहीत.५)व्हॉलीबॉल खेळताना एका टीमच्या खेळादूद्वारे तीन वेळा चेंडू खेळल्या गेला असेल, आणि चौथ्या वेळी पुन्हा त्याच संघाकडून खेळला गेला५)व्हॉलीबॉल खेळताना एका टीमच्या खेळादूद्वारे तीन वेळा चेंडू खेळल्या गेला असेल, आणि चौथ्या वेळी पुन्हा त्याच संघाकडून खेळला गेला अथवा जाळीला लागून lखाली पडला जाळीला लागून तर पंच शिटी वाजवून नियमभंग झाल्याचे दर्शवतात .

मध्य रेषा पार करणे
व्हॉलीबॉल खेळताना जर एखाद्या खेळाडूच्या शरीराचा भाग विरोधी संघाच्या क्षेत्रामध्ये गेला तर तो Foul आहे. या प्रकारे नेटखालून पुढे जाणे, विरुद्ध संघातील खेळाडूला विचलित करण्यासाठी नेटच्या स्पर्श मध्यरेषेला स्पर्श करणे Foul मानले जाते. पंचाची शिटी वाजण्यापूर्वी विरोधी संघाच्या अंगणात जाणेसुद्धा Foul मानले जाते.

चेंडू खेळातून बाहेर (Ball Out Of Play )
जेंव्हा चेंडू क्रीडांगणाच्या marking केलेल्या भागाच्या बाहेर किंवा अँटिनाच्या बाहेर जातो तेंव्हा त्याच्यामुळे त्रुटी झाली असे मानले जाते. चेंडू जमिनीवर पडला, बाहेर कोणत्याही वस्तूवर पडला, मैदानावर पडला तर आऊट मानला जातो. रेषेला स्पर्श करणारा चेंडू बरोबर मानला जातो. पंचाची शिट्टी वाजल्यानंतर खेळ

ब्लॉकिंग (Blocking )
प्रतिपक्षाने मारलेला चेंडू हात उचलून परतवणे अथवा योग्य त्या दिशेस परतवणे, या कौशल्यास ब्लॉकिंग असे म्हणतात. विरोधी संघाने स्मॅश मारल्यामुळे किंवा इतर पद्धतीमध्ये मारल्यामुळे जोरात आलेल्या चेंडूपासून बचाव करण्यासाठी या कौशल्याचा वापर करण्यात येतो. ब्लॉक करण्याच्या तीन पद्धती आहेत. एका खेळाडूने ब्लॉक , दोन खेळाडूंनी ब्लॉक , तीन खेळाडूंनी ब्लॉक. ब्लॉकिंग प्रकारात वेगवान हालचालींना खूप महत्व आहे. आपल्या अंगणात येणारा चेंडू व त्याचा वेग पाहून ब्लॉक करण्याची जागा निश्चित करावी लागेल कारण स्मॅशरची हालचाल आणि खाली उतरणाऱ्या चेंडूची दिशा लक्षात घेऊन ब्लॉक करणाऱ्या खेळाडूने तिथे पोहोचून स्वतःची स्थिती घ्यावी, उडी मारण्यापूर्वी ब्लॉकरने आपल्या खांद्याइतके अंतर दोन पायात घ्यावे. तसेच नेट व ब्लॉकर यांच्यात सर्वसाधारण अर्धा मीटर अंतर असावे,गुडघे किंचित वाकवून शरीराचे वजन चवड्यावर द्यावे.कोपऱ्याजवळ हात वाकवून खालच्या बाजूस आणावे. येणाऱ्या चेंडूची दिशा, नेटपासून चेंडूचे अंतर,स्मॅशरची हालचाल काळजीपूर्वक सावधतेने पाहून ब्लॉकिंगसाठी उडी घ्यावी.

खेळाचा अवधी (Game Period )
व्हॉलीबॉलचा प्रत्येक खेळ पाच सेटचा असतो. पाचपैकी तीन सेट जिंकणार गट विजेता ठरत असतो. पहिला सेट संपल्यानंतर दुसरा सुरु करण्यापूर्वी आणि दुसरा, तिसरा सेट संपल्यानंतर दोन मिनिटांचा विश्रांती कालावधी दिला जातो. मात्र चौथ्याआणि पाचव्या खेळाच्या दरम्यान पाच मिनिटाचाच विश्रांती कालावधी दिला जातो.एखादा खेळाडू जखमी असल्यास खेळ तीन मिनिटापर्यंत थांबवलाजातो.कधी कधी हवमान खराब् होण्यमुले खेल थांबवला जातो.

विश्रांती काळ (Time आऊट)
मार्गदर्शक किंवा संघनायक यांच्या विनंतीनुसार चेंडू डेड झाल्यानंतर पंच विश्रांतीचा वेळ देतात. हा विश्रांती काळ ३०सेंकंदाचा असतो,विश्रांती काळ खेळाडूच्या विश्रांतीसाठी किंवा बदली खेळाडू घेण्यासाठी वापरण्यात येतो

व्यवस्थापन (Management )
कोणत्याही संघाच्या अनुशासनाकरिता त्या संघाचा कर्णधार, प्रशिक्षक, व्यवस्थापक असतात. व्यवस्थापक पंचाच्या निर्णयात हस्तक्षेप करू शकत नाही. मार्गदर्शक पंचांच्या निर्णयाबद्दल विचारपूस करू शकतो.

जाणून घेऊया अधिक माहिती क्रिकेट विषयी वाचा