
The Information about jijabai|राजमाता जिजाऊ यांच्याविषयी माहिती
जिजाबाई (इतर नवे : जिजामाता, जिजाऊ, राजमाता, मांसाहेब ) (१२ जानेवारी इ.स. १५९८-१७ जून, इ.स. १६७४) ह्या मराठी साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या. सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील व आईचे नाव म्हाळसाबाई होते. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. डिसेंबर इ.स. १६०५ मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह झाला.
जिजाबाई शहाजीराजे भोसले
राजमाता
पूर्ण नाव:- जिजाबाई शहाजीराजे भोसले
जन्म :- जानेवारी १२, इ. स. १५९८ सिंदखेडराजा, बुलढाणा
मृत्यू:- जून १७, इ.स. १६७४ पाचाड, रायगडचा पायथा
वडील:- लखुजीराव जाधव
आई:- म्हाळसाबाई उर्फ गिरिजाबाई
पती:- शहाजीराजे भोसले
राजघराणे :- भोसले
मुलांचे संगोपन व राजकारभार
शिवाजी महाराज १४ वर्षाचे असताना शहाजीराजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्त केली. अर्थातच जहागिरीची वहिवाट लावण्याची जबाबदारी जिजाबाईंवर येऊन पडली. कुशल अधिकाऱ्यांसमवेत जिजाबाई आणि शिवाजी पुण्यात येऊन दाखल झाले. निजामशाही, आदिलशाही आणि मुघलांच्या सततच्या स्वार्यांमुळे पुण्याची अवस्था
अतिशय भीषण होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी दादोजी कोंडदेव यांच्या सोबत नेटाने पुणे शहराचा पुनर्विकास केला. सोन्याचा नांगर घडवून त्यांनी शेतजमीन नांगरली, स्थानिक लोकांना अभय दिले. शिवाजी राजांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलली. जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना पारतंत्र्यात सुरु झालेल्या आणि स्वातंत्र्यात संपलेल्या रामायण, महाभारतातील गोष्टी सांगितल्या. सीतेचे हरण करणाऱ्या रावणाचा वध करणारा राम किती पराक्रमी होता, बकासुराचा वध करून दुबळ्या लोकांची सुटका करणार भीम किती पराक्रमी होता, वगैरे. जिजाबाईंनी नुसत्या गोष्टीच सांगितल्या नाहीत तर सदरेवर शेजारी बसवून राजकारणाचे पहिले धडेही होते.
शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकतानाच जिजाबाईंनी त्यांना राजनीतीही शिकवली. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचे धाडस दिले शस्त्रशस्त्रांचं प्रशिक्षणावर स्वतः बारकाईने लक्ष ठेवले. शहाजीराजांची कैद व सुटका, अफजलखानाचे संकट,आग्रा येथून सुटका अशा अनेक प्रसंगात शिवरायांना जिजाबाईंचे मार्गदर्शन लाभले. शिवराय मोठ्या मोहिमेवर असताना, खुद्द जिजाबाई राज्यकारभारावर बारीक लक्ष ठेवत असत. आपल्या जहागिररीत त्या जातीने लक्ष घालत. सदरेवर बसून स्वतः तंटे सोडवत.
जीवन
शहाजीराजे बंगळुरात वास्तव्यास असताना शिवाजीराजांच्या आई व वडिलांची चोख जबाबदारी जिजाबाईंनी मोठया कौशल्याने पेलली. सईबाईच्या पश्चात संभाजी राजांची संपूर्ण जबाबदारी त्यांनी उचलली. राजांच्या प्रथम पत्नी, सईबाईंचे भाऊ बजाजी निंबाळकर यांना जुलमाने बाटवण्यात आले होते. त्यांची हिंदू धर्मात परत येण्याची इच्छा होती,राजांचाही त्याला पाठिंबा होता. या धर्मराजकारणात जिजाबाई राजांच्या पाठीशी ठाम पणे उभ्या राहिल्या. एवढेच नव्हे तर राजांची कन्या सखूबाईना, बजाजी निंबाळकरांच्या मुलाला देऊन त्यांनी राज- सोयरीक साधली आणि बजाजींना पूर्णपणे धर्मात परत घेतले. या संपूर्ण प्रकरणात त्यांचा द्रष्टेपणा व सहिष्णुता दिसून येते.
राजांच्या सर्व स्वाऱ्यांचा, लढायांचा तपशील त्या ठेवत . त्यांच्या खलबतांत सल्ला मसलतीत भाग घेत. राज्यांच्या गैरहजेरीत स्वतः राज्याची धुरा वहात. शिवाजी राजे आग्र्याच्या कैदेत असताना स्वराज्याच्या सीमा वाढवत रांगणा किल्ला जिंकून घेतला. जिजाबाईंनी पूर्णतः जबाबदारी उतारवयातही कौशल्याने निभावून नेली.
शिवाजी राजांचा राज्याभिषेक व हिंदवी स्वराज्याची स्थापना पाहून राज्याभिषेकानंतर बारा दिवसांनी १७ जून, इ. स. १६७४ ला त्यांनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात शेवटचा श्वास घेतला, आपल्या वयाच्या ७६व्या वर्षी जिजाबाईंचे रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी वृद्धापकाळाने निधन झाले, या गावी राजमाता जिजाबाईंची समाधी आहे.
जिजाबाई हि आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणाऱ्या राजमाता होय.
हे पण वाचा:-अहिल्याबाई होळकर यांचे चरित्र
हे पण वाचा:-स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जीवन प्रवास