Table Tennis in Marathi / टेबल टेनिस खेळाविषयी संपूर्ण माहिती

तर मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत टेबल टेनिस खेळाविषयी संपूर्ण माहिती

टेबल टेनिस खेळाविषयी संपूर्ण माहिती

टेबल टेनिस ची संपूर्ण माहित तेही मराठी मध्ये

  • Table Tennis in Marathi / टेबल टेनिस खेळाविषयी संपूर्ण माहिती

टेबलटेनिस ची ऐतिहासिक पार्श्वभूमी (Historicale Background Of Table टेनिस)

टेबलटेनिस ची ऐतिहासिक दृष्टिकोनातून पहिले असता टेबल टेनिस हा क्रीडा प्रकार जास्त जुना नाही. या खेळाची सुरुवात इंग्लंड मध्ये झाली. इंग्लंड मध्ये हा खेळ ‘पिगपॉंग’ नावाने ओळखला जात होता. हे नाव त्या व्यक्तीकडून दिल्या गेले जे या खेळाचे उपकरण बनवत होते.काही ठिकाणी या खेळाला ‘गोस्सीम’ म्हणून संभोधले जाते. हा खेळ हळूहळू संपूर्ण जगात प्रसिद्ध होऊ लागला. जपान, चीन, इंडोनेशिया इ. देशांमध्ये याची लोकप्रियता विशेष वाढली गेली. ‘टेबल टेनिस’ असे नाव इ.स. १९२२ मध्ये दिले गेले. १९२६-२७ मध्ये लंडन मध्ये आयोजित एका राष्ट्रीय प्रतिनिधी संमेलनच्या टेबलटेनिस या खेळाच्या नव्या विधानाला स्वीकृती दिली गेली.यावर्षी लंडन मध्ये पहिल्या वेळेस राष्ट्रीय स्तरावरील टेबलटेनिस स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. १९६६ मध्ये टेबलटेनिस स्पर्धेचे आयोजन वेम्ब्लेमध्ये झाले. यास्पर्धेमधे जगभरातील एकूण ३३ देशांनी भाग घेतला होता.
भारतामध्ये सर्वप्रथम राष्ट्रीय टेबलटेनिस चॅम्पिअनशिप चे आयोजन १९३८ मध्ये करण्यात आले होते. हि स्पर्धा कलकत्याला आयोजित केली होती. या स्पर्धेत एम .आयुब हा खेळाडू विजेता झाला होता. याव्यतिरिक्त भारतामध्ये वेळोवेळी विविध स्पर्धेचे केले जाते. जसे सहारा राष्ट्रीय चॅम्पियनशिप,कॉरबिलियन कप, बरना बेल्लाव कप .

टेबल(Table)Table Tennis in Marathi / टेबल टेनिस खेळाविषयी संपूर्ण माहिती

टेबलटेनिस साठी आवश्यक टेबलची लांबी ९फूट आणि रुंदी ५फूट असते.टेबलचा सर्व पृष्ठभाग एकसारखा जमिनीपासून २. ६फूट उंचीवर असावा. पृष्ठभागावर चेंडू पडल्यास मिळणारी उंची सारखीच असावी. पृष्ठभाग गडद, काळ्या किंवा निळ्या, हिरव्या रंगाने रंगवलेला असतो.पृष्ठभागावर चकाकी नसावी आणि पृष्ठभागावर २ से. मी. जाडीची पांढरी किनार असावी. पृष्ठभागाचे दोन भाग लांबीच्या बाजूने आणि रुंदीच्या बाजूनें ३ मी.जाडीच्या पांढऱ्या पट्टीने केलेले असतात. रुंदीच्या बाजूला बाजू रेषा आणि लांबीच्या बाजूला अंतिमरेषा असे म्हणतात.

जाळी /नेट (नेट)

टेबलटेनिसच्या टेबच्या मध्यभागी ६ इंच उंचीची जाळी असते. जाळीची लांबी ६ फूट असते, टेबलची रुंदी ५ फूट आणि दोन्ही बाजूला ६-६ इंच असते. जाळी तारेने किंवा दोरीने ताणून आधाराला बांधली जाते. जाळीची वरची बाजू ६ इंच वरती व खालची बाजू टेबलच्या लगत असते. प्रकाश १००० लक्ष समप्रमाणात संपूर्ण कोर्टमधे युनिट टेबलावर आणि ४ मीटर उंचीवर लाईट्स असतात.

चेंडू /बॉल (Ball)

टेबल टेनिस खेळण्यासाठी चेंडू गोलाकार आणि पृष्ठभाग गुळगुळीत नसलेला असावा. चेंडू कचकड्याचा बनलेला असतो. चेंडूचा व्यास ४० मिलीमीटर पेक्षाjजास्त आणि ३८मिलीमीटर पेक्षा कमी नसावा. चेंडूचे वजन २. ५०ग्रॅम असते.

रॅकेट (Racket)

रॅकेटसाठी आकाराची आणि वजनाची मर्यादा नाही. रॅकेट लाकडी असते. लाकडाच्या पृष्ठभागावर उंचवाट्याने रबर लावलेले असेल तर उंची २m.m. पेक्षाजास्त नसते आणि जर रबराच्या खाली स्पंज लावले असेल तर उंची ४मी.मी .पेक्षाjजास्त नसावी.रॅकेट च्या एका बाजूला लाल आणि एका बाजूला काळपट रंग असावा. एका बाजूला उंचवट्याचे रबर व दुसऱ्या बाजूला सपाटअसावे.दोन्ही बाजूला सपाट व उंचवट्याचे रबर चालू शकते.मात्र चकाकी देणारा नसावा. रॅकेट चे दोन्ही पृष्ठभाग लाकडी असतील तर त्याचा रंग काळसर असावा.ग्रीपबद्दल कोणत्याही मर्यादा नाहीत.

क्रीडा क्षेत्र (Playing Area)

क्रीडा क्षेत्राबद्दल असा कोणताही नियम नाही जो की ठराविक क्षेत्राबद्दल असेल; परंतु एक गोष्ट अवश्य सांगता येईल कि, खेळाडूला मोकळ्या हालचाली, कौशल्य करता येईल अशी जागा असावी.आणि त्या संपूर्ण जागेवर लाइटची व्यवस्था असावी. राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय स्पर्धेदरम्यान क्रीडाक्षेत्राच्या चारही बाजूलाएक डार्क रंगाचा कपडाआणि भिंतीचा पांढरा रंग चकाकी असणारा नसावा.

प्रकाशव्यवस्था (Lighting)

टेबल टेनिस हा क्रीडा प्रकार इनडोअर खेळ आहे. जो मोट्या बंद इनडोअर स्टेडियम , स्पोर्ट्स क्लब आदी ठिकाणी खेळल्या जातो.चार भिंतीच्या आत खेळला जात असल्यामुळे योग्य प्रकाश व्यवस्था तेथे असणे महत्वाचे असते.

फरशी (Floor)

टेबल टेनिसक्रीडा क्षेत्राची फरशी अशी असावी कि, जिच्यावार खेळाडू आरामात खेळू शकेल.खेळताना खेळाडूला बऱ्याच प्रकारच्या action कराव्या लागतात. त्यामुळॆ लाकडी फरशी वीट ,सिमेंट किंवा दगडी फरशीपेक्षा वेगळी मानली जाते. हि फरशी लाकडी पट्या पासून बनवली जाते. फरशी चमकणारी किंवा चिकणी असू नये.असल्यास खेळाडूचा पाय घसरून दुखापत होऊ शकते. जर फरशी सिमेंटची असेल तर त्याला छोटे छोटे होल मारलेले किंवा खडबडीत असावे.

खेळाडूचा पोशाख (Uniform Of Players)

प्रत्येक खेळाडूला नियमानुसार अर्ध्या बाह्याचा टि शर्ट, निकर तसेच स्पोर्ट्स बूट आणि सॉक्स घालणे बंधनकारक असते.पोशाख कोणत्याही रंगाचा असेल तरी चालेल,केवळ पांढरा रंग सोडून थंडीच्या दिवसात स्वेटर घालण्यास परवानगी आहे. कपड्यावरती देशाचे क्लबचे,असोसिएशन, कंपनी इ.सिम्बॉल छापता येतात.

सर्व्हिस (Service)

सर्व्हिस करताना सर्व्हिस करणारा खेळाडू चेंडूला आपल्या तळहातावर ठेवतो.ह्या अवस्थेमध्ये हाताची बोटे जोडलेली असतात आणि अंगठा वेगळा असतो. सर्व्हिस करणारा चेंडूला हवेत फेकतो आणि चेंडू खाली येताना रॅकेटने मारून दुसऱ्या खेळाडूंकडे मारले जाते .पहिल्या सर्व्हिस देणाऱ्या खेळाडूच्या कोर्टमधे टप्पा खाऊन जाळीच्या पलीकडे जातो. तिकडून दुसरा खेळाडू त्याच्या रॅकेटने चेंडूला टोलवून वापस पहिल्या खेळाडूकडे मारतो.सर्व्हिस करताना जेंव्हा चेंडू रॅकेटला लागला तेंव्हा सर्व्हिस करणाऱ्या खेळाडूच्या कोर्टच्या आतील रेषा आणि त्याच्या दोन्ही बाजूच्या काल्पनिक विस्ताराच्या पाठीमागे राहिल्या तरी चुकीच्या पद्धतीने फेकलेल्या चेंडूचा रॅकेटला स्पर्श न होणे या दोन्ही गोष्टीमुळे खेळाडूला एक अंक गमवावा लागतो.

दुहेरी सर्व्हिस (Double Service)

दुहेरी खेळामध्ये सर्व्हिसच्या दरम्यान चेंडू प्रथम टेबलच्या उजव्या अर्ध्या कोर्टमधे स्पर्श करतो आणि नंतर तिरका होऊन जाळीच्या पलीकडील कोर्टात जातो. जरी चेंडूने केन्द्ररेषेवर टप्पा खाला तरी त्याला योग्य मानला जातो. पहिल्या पाच अंकापर्यंत सर्व्हिस करणारा खेळाडू उजव्या कोर्टातून बदलून डाव्या कोर्टात जातो आणि त्याचा दुसरा खेळाडू त्याच स्थानी येतो. अशा प्रकारे १-२ आणि ३-४ खेळाडूंमध्ये सर्व्हिस क्रम चालतो .

सर्व्हिस रिटर्न(Service Return)

जेवढ्या कुशलतेने सर्व्हिस करणारा चेंडूने सर्व्हिस करतो.दुसऱ्या कोर्टामध्ये उभा असलेला खेळाडू तितक्याच कुशलतेने परत करतो, असे केंव्हापर्यंत चालते जोपर्यंत एखादा खेळाडू चेंडू खेळण्यांमध्ये असफल होत नाही. असफल झाल्यानंतर त्याला एक अंक गमवावा लागतो. चेंडूला योग्य प्रकारे परतवने याचा अर्थ खेळाडू चेंडू त्याच्या कोर्टमधे चेंडूचा एक टप्पा घेणे. चेंडूचा दुसरा टप्पा पाडण्याअगोदर त्याला रॅकेटने हिट केले जाणे बंधनकारक असते.

गुण (Points)

खालील अवस्थेमध्ये खेळाडू अंक गमावतो .

  • जेंव्हा सर्व्हिस करणारा खेळाडू सर्व्हिस करण्यामध्ये असफल झाला.
  • जेंव्हा एक खेळाडू चेंडूला योग्य प्रकारे परतवण्यामध्ये असफल झाला.
  • जेंव्हा खेळाडू चेंडूला दोन वेळेस रॅकेटने मारतो.
  • चेंडू एका खेळाडूच्या कोर्टमध्ये दोन वेळेस टप्पा खातो.
  • चेंडू खेळताना खेळाडूच्या हाताचा टेबल ला स्पर्श झाला असेल तर
  • खेळाडू चेंडूला टप्पा न पडताच वापस करत असेल तर
  • दुहेरी खेळामध्ये सर्व्हिस देणारा किंवा घेणारा खेळाडू अनुक्रमाशिवाय चेंडूला मारला असेल तर
  • चेंडू रॅकेट किंवा फलकाच्या कोणत्याही भागाला स्पर्श करत असेल तर
  • जेंव्हा woly होत असेल किंवा चेंडूला अडथळा निर्माण झाला तर
  • रॅली उशिरा झाल्यावर पण खेळाडूला अंक गमवावा लागतो.

लेट (Let)

सर्व्हिस झाल्यानंतर पंच ओळखून घेतो कि दुसऱ्या बाजूचा खेळाडू किंवा संघ तयार नव्हता. सर्व्हिस प्राप्त करणारा खेळाडू किंवा त्याचा साथीदार पण चेंडूला मारण्याचा प्रयत्न करतनव्हता. अश्या परिस्थितीमध्ये पंच ‘लेट’ म्हणतो आणि सर्व्हिस पुन्हा दिली जाते.सर्व्हिस चा चेंडू जाळीच्या वरील भागाला स्पर्श करून किंवा जाळीच्या कोणत्याही भागाला स्पर्श करून जातो तेंव्हा रॅली लेट होते. सर्व्हिस प्राप्त करणाऱ्या किंवा परतवणाऱ्या खेळाडूंकडून कोणत्याही प्रकारची अडचण किंवा अटकाव झाला तर चेंडू woly होतो. खेळताना चेंडू तुटला किंवा खेळाडू त्याला परतवण्यामध्ये असुविधा झाली तर पंच खेळ थांबवतो. हा खेळ लेट मनाला जातो.

खेळामध्ये चेंडू (Ball In Game)

सर्व्हिस करताना जेंव्हा हात पुढे केला जातो त्यावेळा नंतर चेंडू खेळामध्ये येतो,अटी खेळण्यांमध्ये तेंव्हापर्यंत मानले जाते जेंव्हापर्यंत

  • चेंडू एका कोर्टमधे दोन वेळा स्पर्श करत नाही.
  • चेंडू जाळी किंवा जाळीच्या खांबांना सोडून कोणत्याही अन्य वस्तूला लागला तर.
  • चेंडू टप्पा खाल्याशिवाय आला तर
  • चेंडूने कोणत्याही खेळाडू किंवा त्याचे कपडे याना स्पर्श केला तर
  • दुहेरी खेळामध्ये, सर्व्हिस मध्ये सर्व्हिस करणारा किंवा सर्व्हिस स्वीकारणाऱ्याचा हात कोर्टाला स्पर्श झाला असेल तर
  • दुहेरी खेळामध्ये संघातील खेळाडूंशिवाय कोणत्याही बाहेरच्या खेळाडूने चेंडूला मारले तर
  • चेंडूने कोणत्याही खेळाकडून एकापेक्षा अधिक वेळा सलग मारला गेला नसेल तर

Out Of Order

जर कोणत्याही खेळाडूने त्याची वेळ आल्यानंतर आपली दिशा बदलली नाही,जेंव्हा खेळाच्या नियमानुसार त्याला आपली दिशा बदलली पाहिजे नाहीतर पंच खेळ थांबवतो आणि दोन्ही खेळाडूंची बाजू परस्पर बदलतो. या नंतर खेळ पुन्हा सुरु केला जातो. अशा कोणत्याही त्रुटींची वेळ आली तर अंक वैध मानला जातो, जेंव्हापर्यंत ती चूक लक्षात येत नाही तोपर्यंत.

खेळ आणि सामना(Game and Match)

या खेळात तोच संघ किंवा खेळाडू जिंकतो जो सर्वप्रथम २१अंक प्राप्त करतो. दोन्ही खेळाडू किंवा संघाचे २०-२० अंक झाल्यानंतर डुयस होतो आणि दोन्ही खेळाडू किंवा संघाला क्रमानुसार एक एक सर्व्हिस ची संधी दिली जाते. जो खेळाडू किंवा संघ दोन अंक प्राप्त करतो तो विजयी होतो. प्रत्येक सामना तीन किंवा पाच पायऱ्यामध्ये खेळला जातो. जास्त अंक जिंकणारा खेळाडू विजयी होतो. पाच डावाच्या सामन्यांमध्ये कोणताही खेळाडू,तिसऱ्या आणि चौथ्या डावांमध्ये पाच मिनिटापेक्षा अधिक आराम घेऊ शकत नाही.

अधिकारी (Officars)

स्पर्धा घेणारी संस्था स्पर्धेच्या निर्णय प्रक्रियेसाठी आणि सुयोग्य स्पर्धा पार पाडण्यासाठी एक उत्तरदायी निर्णायक नियुक्त करतात, तो निर्णायक संपूर्ण खेळाच्या संचालनाचा umpire सहाय्यक umpire ची नियुक्ती करत असतो. खेळाची वेळ, आवश्यक साहित्य,पुरस्कार इ. बाबींचा सूत्रधार सुद्धा निर्णायक असतो. कोणत्याही प्रकारच्या संकटाच्या वेळी खेळ थांबवत असतो, त्याचप्रमाणे खेळाडूच्या गैरवर्तनावर शासनसुद्धा करू शकतो.

तर मंडळी हि आहे टेबल टेनिस या खेळाची संपूर्ण माहिती, आशा आहे हि माहिती आपल्याला उपयुक्त होईल.

वाचा क्रिकेट खेळाविषयी

वाचा बॅडमिंटन खेळाविषयी संपूर्ण माहिती