Prime Minister Atal Bihari Vajpeyi|पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी

Prime Minister Atal Bihari Vajpeyi|पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी

जन्म

तो दिवस होता २५ डिसेंबर १९२५ चा मध्यरात्री वेळ. प्रभू येशूचा जन्मसोहळा साजरा होत होता.मात्र आज प्रभू येशूच्या जन्मसोहळ्या बरोबरच आणखी एका बालकाचाही जन्म सोहळा साजरा होत होता. तसा कृष्ण बिहारींचा हा काही पहिला मुलगा नव्हता. तीन मुलांच्या पाठीवर जन्मलेला अवधबिहारी,सदाबिहारी आणि प्रेमबिहारींच्या पाठोपाठ झालेला. त्याचं नाव ठेवलं ‘अटलबिहारी’. मुलगा पुढे नावाप्रमाणे निघाला. अटल म्हणजे कधीही न ढळणारा,ठाम असलेला, तर बिहारी म्हणजे सर्वत्र विहार करणारा. आज अटलजी नावाप्रमाणेच दिसून येतात. तेच आपले लाडके माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी.वडिलांच्या नजरेखाली अटलजी वाढत होते. मुलाने शिस्तीने वागावे, राहावे असे त्यांना वाटत असे. अशा प्रकारे अटलजींवर शिस्तीचे, स्वयं शासनाचे संस्कार होत होते.

संस्कारांची पायाभरणी

अटलजी शाळेत असतानाच आर्यकुमार सभेत नियमाने जात असत. त्या वेळी ग्वालेहरमध्ये नारायण तरटे नावाचा तरुण संघशाखा चालवीत होता. बरीच मुले शाखेत जाऊ लागली होती. साधे सरळ अटलजी नारायण तरटे ना खूप आवडू लागले. त्या वेळी त्या संघशाखेत शारीरिक शिक्षणाबरोबर लष्करी शिक्षणही दिले जायचे. खऱ्या शस्त्रांनी शिक्षण देणारी ती संघाची एकमेव शाखा होती. नारायणजी तरटे हे कुशल संघटक सरळ, साध्या स्वभावाचे होते. त्यांचा फार मोठा प्रभाव अटलजींवर पडला. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचे नाते दृढ झाले. संघाची शिस्त,तेथील कार्यपद्धती आणि बंधुत्वाची भावना, याचाही जबरदस्त चांगला परिणाम अटलजींवर होत होता.शिक्षणाबरोबर अटलजी संघाचेही काम करू लागले. दिवसेंदिवस ते संघकार्यात जास्तच गुंतत चालले होते. ते शाखेचे कार्यवाह झाले. संघाचे मुख्य कार्यालय नागपूरला असे. स्वयंसेवकांसाठी संघाच्या परीक्षा असत. १९४१ साली अटलजी पहिल्या वर्षाची परीक्षा पास झाले.काव्यगुणांचा विकास होत असताना अटलजींच्या वक्तृत्व कलेलाही बहर येऊ लागला. लहानपणापासूनच ते खूप छान मुद्देसूद बोलायचे. त्यामुळे संघशाखेवर एखाद्या विषयावर बोलण्याचे काम त्यांच्याकडे यायचे. त्यांची मुंज होती,त्यावेळी ते संघ कार्यालयातच होते.

सरस्वतीची उपासना

देशाच्या स्वातंत्र्याचे रणकुंड धडाडून पेटले होते. गांधीजींच्या ‘चले जाव’ आंदोलनाला सारा देश पेटून उठला होता. अटलजी त्यावेळी लखनौच्या शिबिरातून संघ कार्याची दुसरी परीक्षा पास झाले होते. त्यावेळी स्वातंत्र्य चळवळीला उधाण आले होते. अटलजींचे रक्तही स्वातंत्र्याच्या उर्मीने सळसळू लागले होते. वेळ पडली तर,त्यांनी तुरुंगात जायचीही तयारी केली होती. शिक्षणाबरोबर त्यांनी पुन्हा संघ-कार्यालाही सुरुवात केली. १९४४ साली ते संघ कार्याची तिसरी परीक्षा पास झाले. त्या वेळी अटलजी ग्वाल्हेरच्या राणी लक्ष्मीबाई कॉलेजात बी.ए. पास झाले. त्यांना शिष्यवृत्तीहि मिळाली. एम.ए. चा अभ्यास करण्यासाठी अटलजी मग कानपूरला आले.

स्वतः चा नव्हे राष्ट्राचा संसार

समाजाचे मनोधैर्य टिकवण्यासाठी, राष्ट्राच्या नवनिर्माणाला वाहून घेण्यासाठी अटलजी पुढे सरसावले. अटलजींनी संघाच्या नवसमाज निर्मितीच्या कार्यात स्वतःला झोकून दिले. ते संघाचे प्रचारक बनले. लखनौजवळील एका गावात त्यांनी आपल्या कार्याला सुरुवात केली. एका धर्मशाळेत त्यांनी मुक्काम ठोकला. तेथेच ते आजारी पडले असता इतर स्वयंसेवकांनी त्यांची सेवा शुश्रूषा केली. बरे होताच त्यांनी पुन्हा आपल्या सेवाकार्याला सुरुवात केली. त्या काळी समाज खूप विस्कळीत झाला होता. लोकांचा माणुसकीवरील विश्वास उडाला होता.आपली संस्कृती, आपल्या परंपरा समाज विसरू लागला होता. अशा वेळी लोकांच्या मनात राष्ट्राभिमान, धर्माभिमान, राष्ट्रीय अस्मिता आणि सामाजिक बंधुभाव वाढवण्याची खूप गरज होती. हे काम काही सोपे नव्हते. त्यासाठी जीवाचे रान करावे लागते. तहान भूक विसरून काम करावे लागते. स्वतःचा संसार न करता राष्ट्राचा संसार उभा करावा लागतो. हे कार्य म्हणजे जशी सुळावरची पोळी. ऐतिहासिक काळात ज्यांनी ज्यांनी समाज जागृतीचे प्रयत्न केले,त्यापैकी अनेकांना आपला जीव गमवावा लागला,त्यांचे संसार धुळीला मिळाले,कोणावर विष घेऊन मरण्याची वेळ आली,तर कोणाला मायभूमी सोडून परागंदा व्हावे लागले. अटलजींना हे सर्व माहित होते. जे जे कष्ट उपसावे लागतील,त्यासाठी त्यांनी मनाची तयारी केली होती. भारतीय संस्कृतीवर पडलेली काळी छाया दूर करण्यासाठी लोकांच्या विचारत बदल करणे आवश्यक होते. समाजप्रबोधन करण्यासाठी लोकांच्या मनातील राष्ट्रवाद चेतावण्यासाठी अटलजींनी मग आपल्या सर्वस्वाचा त्याग केला. ते राष्ट्राचा संसार रथ पुढे नेण्याच्या कामाला लागले.

Prime Minister Atal Bihari Vajpeyi|पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी

आयुष्याला नवे वळण

आता अटलजी एका नव्या वाटेवर चालू लागले. शिक्षकांचे काम करू इच्छिणाऱ्या अटलजी बनले संपादक.संपादक म्हणजे भरपूर पगार असे काही नव्हते. उलट त्यांच्यावर कामाची आणखी जबाबदारी पडली होती. नेहमीचे प्रचारकाचे काम करून वर संपादकाचे काम करायचे होते. अंकासाठी मजकूर जमवायचा,कधी स्वतःच काही लेखन करायचे,अंकाची बंडले बांधायची ,अशी सर्व कामे अटलजींनाच करावी लागत. पण एके दिवशी हे सर्व थांबले. राष्ट्रपिता गांधीजींची हत्या झाली. संघावर सरकारने बंदी घातली. राष्ट्रधर्माच्या कार्यालयाला टाळे लागले. दिनदयाळ उपाध्याय यांना सरकारने अटक केली.तर अटलजी भूमिगत झाले. ते भूमिगत राहून संघाचे कार्य करू लागले.राष्ट्रकार्याच्या उच्चभावनेने प्रेरित झालेल्या अटलजींना टाकीचे घाव सोसावे लागणार होते. धान्याच्या राशी उभ्या राहाव्यात,लोकांना पोटभर अन्न मिळावे, म्हणून काही बीजांना जमिनीत गाडून घ्यावेच लागते. अटलजींनी असेच सतीचे वं घेतले होते. संघावरची बंदी उठली. अटकेत असलेले दीनदयाळ उपाध्याय बाहेर पडले. ‘ राष्ट्रधर्म’ मासिक पुन्हा सुरु झाले. अटलजी मासिकाच्या कामात पुन्हा गढून गेले.

संपादक ते राजकारणी

अटलजी मासिकाचे संपादक होते. ते चालविण्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले. ते संपादक असल्यामुळे त्यांना अनेक कार्यक्रमांना हजर राहावे लागे. तिथे त्यांच्या मासिकाविषयी,संघाच्या कार्याविषयी अनेक गैरसमज असल्याचे दिसून येई. त्या वेळी अटलजी संघ कोणकोणती लोकोपयोगी कार्य करतो, ते समजावून सांगत. त्यामुळे लोकांच्या मनातील गैरसमज दूर होण्यास मदत होत असे. त्यांनतर आणखी एक साप्ताहिक काढण्याचे ठरले.त्याचीही जबाबदारी अटलजींवर येऊन पडली. ‘पाश्चाजन्य’ हे नवे साप्ताहिक प्रकाशित झाले. दरम्यान राष्ट्रपिता गांधीजींची हत्या झाली. त्यामुळे संघाबद्दल अनेक गैरसमज निर्माण झाले. संघावरचा कलंक दूर करून संघाचा लोकसेवेचा,राष्ट्रसेवेचा खरा दृष्टिकोन लोकांसमोर आणायचा होता. अटलजी दिवस रात्र ते काम करायचे. रात्री झोप आली,तर तिथे थोडा वेळ झोपायचे. जेवायचे देखील त्यांना आठवण राहत नसे. अशा काठीण अवस्थेतही ऐन उन्हाळयात चाफयाला भर यावा, तशी अटलजींचीलेखणी चालत होती. त्यांच्या लेखाचे मान्यवर साहित्यिक कौतुक करीत होते. साहित्यक्षेत्रात त्यांना मान मिळू लागला होता. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा ‘स्वदेश’ नावाचे दैनिक सुरु करण्यात आले. सगळीकडे त्यांचे नाव झाल्यावर ते दिल्लीला आले. त्यांची आणि श्याम प्रसाद मुखर्जीची ओळख झाली. मुखर्जी एक नावाजलेले राष्ट्रीय नेते होते. त्यांनी ‘जनसंघ’ या नव्या पक्षाची स्थापना केली होती. त्यांना एक हुशार आणि राष्ट्रप्रेमी मदतनिसाची गरज होती. अटलजी त्यांना मदत करू लागले. अटलजींच्या आयुष्याचा सांधा बदलला.त्यांच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळाली. पत्रकार संपादकाचे ते राजकारणी बनले.

जीवनातील नवा अध्याय

संपादक म्हणून कार्यरत असताना अचानक त्यांच्या आयुष्याने वेगळे वळण घेतले. पत्रकार म्हणून कार्यरत असताना राजकारण ते जवळून पाहत होते. परंतु राजकारणात पडावे,असे त्यांना कधी वाटले नाही. पण श्यामप्रसादजी भेटले आणि अटलजी राजकारणाकडे ओढले गेले. हिंदू हिताचे रक्षण करणारा,परंतु सर्व जाती धर्माच्या लोकांना मुक्त प्रवेश असणारा ‘जनसंघ ‘हा राष्ट्रीय पक्ष स्थापन झाला. अटलजी पक्षाचे काम करू लागले मानवतावादी आणि राष्ट्रीय हिट जोपासणारा पक्ष म्हणून हळूहळू त्याची वाढ होऊ लागली. पक्षाकडे पैसा नव्हता,पण लोकांचे अडचणीचे प्रश्न हाती घेऊन ते सोडवायला घेतल्यामुळे पक्षाचा पाया मजबूत होऊ लागला. १९५४ साली सरकारने सामुदायिक शेतीचा ठराव मांडला. सामुदायिक शेती पद्धती शेतकऱ्याना पचनी पडेल, असे वाटत नव्हते. त्यामुळे शेतीबरोबर शेतकरी नष्ट होण्याची भीती होती. अशा वेळी शेतीत सहकार हवा,पण सहकारी शेती नको,असे म्हणत जनसंघाने उग्र आंदोलन उभारले. शेतकरी जागा झाला. त्याला आपले हित कशात आहे, ते कळले. सरकारला तो ठराव मागे घ्यावा लागला. अशा प्रकारे जनसंघाने शेतकऱ्याचा मोठा प्रश्न सोडविला.त्यांना जनतेचे प्रश्न माहित होते. हे प्रश्न लोकसभेत मांडून ते सोडवण्याची त्यांची जबरदस्त इच्छा होती. अन्यायाशी झगडण्याची तयारी होती. राजकारण करायचे,ते जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी, केवळ मिरवण्यासाठी नव्हे, अशी अटलजींची विचारसरणी होती.संकटाशी लढण्याचा त्यांचा स्वभाव होता. आपल्या कार्याने आणि हजारजबाबीमुळे ते लोकसभेत आपली छाप पाडू लागले.

सर्वोत्कृष्ट संसदपटू

पाण्यात पडले कि माणूस हात-पाय हालवून पोहायचा प्रयत्न करतो. लोकसभेत पहिल्यांदाच निवडून आलेले अटलजी नवखे असले, तरी राजकारण त्यांना नवे नव्हते. देशाच्या लोकसभेत ते आपल्या मताची,विचारांची छाप पाडू लागले. लोकसभेचे कामकाज कसे चालते,हे थोड्याच दिवसात ते शिकले. लोकसभेच्या कामात ते मनापासून भाग घेऊ लागले. खासदार म्हणून लोकसभेत कार्य करीत असताना आपल्या पक्षाची ध्येय धोरणे लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम त्यांना करावे लागत होते. १९६८ साली अटलजी जनसंघाचे अध्यक्ष झाले. पक्षाची जबाबदारी घेण्यास ते समर्थ होतेच. देशाच्या तळागाळातल्या लोकांपर्यंत जाऊन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे प्रश्न सोडविले पाहिजे,अशी त्यांनी घोषणा केली.ते संसद गृहात अनेक विषयांवर अभ्यासपुर्ण भाषणे करीत असत. आपले विचार त्यांनी नेहमीच परखडपणे मांडले आहेत. ते जे विचार मांडत,ते भविष्यात अनेक वेळा खरे ठरत प्रत्येक प्रश्नावर मग ते प्रश्न शेतीविषयी,अर्थसंकल्प विषयी,परराष्ट्रसंबंधीउद्योगधंदे असे कोणतेही असोत,त्यांनी अचूक मार्गदर्शन केले.सर्वोत्कृष्ट संसदपटू म्हणून अटलजींचा गौरव झालेला आहे. अनेक वेळा परदेशी जाणाऱ्या शिष्टमंडळाचे नेतृत्व त्यांनी केले आहे. जनतेच्या प्रश्नांवर एकमेकांशी वाद घालत असलो,तरी परदेशात गेल्यावर मात्र आपण सर्व एक आहोत असाच विचार त्यांनी नेहमी केला.

प्रखर राष्ट्रवादी पंतप्रधान

देशात नेहमीच राजकीय घडामोडी होत असतात. एका पक्षाचे राज्य जाऊन त्या जागी दुसऱ्या पक्षाचे राज्य होऊ शकते.अटलजी आपल्या देशातील खूपच लोकप्रिय नेते. १९९६ रॅली पंतप्रधानपद त्त्यांच्याकडे चालून आले,परंतु त्यावेळी त्यांना या पदावर जास्त काळ काम करता आले नाही. १९९९ साली ते पुन्हा भारताचे पंतप्रधान म्हणून निवडले गेले.

हे पण वाचा:-सावित्रीबाई फुले यांच्याविषयी माहिती

हे पण वाचा:-शांतिनिकेतन रवींद्रनाथ टागोर