
Phrases and their use in sentences|वाक्यप्रचार आणि त्यांचे वाक्यात उपयोग
- अटकेपार झेंडा लावणे- खूप पराक्रम करणे
मराठ्यांनी अटकेवर झेंडा लावताच शत्रू नामोरहरम झाले
2.अत्तराचे दिवे लावणे- भरपूर उधळ पट्टी करणे
वामनरावांनी आता अन्नान दशा झालीय, पण एकेकाळी या घरात अत्तराचे दिवे लागत होते
3.अंग धरणे- गुटगुटीत होणे
ते मुल आता जरी अशक्त वाटलं तरी टॉनिक देताच चांगलं अंग धरील
4.अग्नी दिव्य करणे- फार मोठ्या संकटातून बाहेर पडणे
भारताला स्वातंत्र्य फुकट नाही मिळालं,त्यासाठी आपल्या स्वर्गीय नेत्यांना अग्नी दिव्य करावे लागले
5.अळंटळंम करणे- टाळाटाळ करणे
वासूला अभ्यासाचा कंटाळा असल्याने तो अभ्यासाची अशीच अळंटळंम करतो
6.अक्कल पुढे धावणे- बुद्धीचा भलताच उपयोग करणे
अरे,त्याला काही सांगू नको,त्याची अक्कल फारच पुढे धावते
7.अमर होणे- कायमची कीर्ती प्राप्त होणे
बाबू गेनूने स्वदेशासाठी प्राण अर्पण केले आणि तो अमर झाला
8.असंगाशी संग होणे- वाईट माणसाशी संबंध येणे
माझ्या एका शेजाऱ्याने असंगाशी संग केल्याने त्याच्या प्राणावरच बेतले
9.अवलंब करणे- अनुसरणे
चांगल्या गुणांचा अवलंब केला,तर त्याचे फळ चांगलेच मिळते
10.अनुग्रह करणे- उपदेश करणे
संतांनी अनुग्रह केल्याने दुष्टांचाही उद्धार झाल्याची उदाहरणे आहेत
11.अंग काढणे- संबंध तोडणे
आपल्या मित्रांची कुमार्गाकडे होत असलेली वाटचाल पाहून रघूने मंडळातून आपले अंग काढून घेतले
12.अंकित करणे- पूर्ण ताब्यात घेणे
नोकर अंकित केल्याशिवाय मालकाचा तरणोपाय नाही
13.अंतर देणे- त्याग करणे
मुलाच्या भल्यासाठी आईला त्याला अंतर दयावे लागते
14.अंतर्धान पावणे-गुप्त होणे
देवाने भक्ताला दर्शन देऊन तो अंतर्धान पावला.
15.अंगावर काटा उभा राहणे- खूप भीती वाटणे
वाघाला पाहून वाटसरूच्या अंगावर काटा उभा राहिला
16.अंगाची लाही लाही होणे- मनाचा जळफळाट होणे
मुलांनी अपमान केल्यावर माधवरावांच्या अंगाची लाही लाही झाली
17.आगीत तेल ओतणे- भांडणात भर घालणे
उमीची सासू म्हणाली बरं का राधाबाई तुमच्या या शिकवणुकीमुळे आगीत तेल ओतले जाईल
18.अंगाचा तिळपापड होणे-खूप चडफडाट होणे
शत्रूचे सैन्य नजरेसमोरून घर दार धुवून नेताना पाहून बंदिस्त वीरांच्या अंगाचा तिळपापड होत होता
19.आयत्या पिठावर रेघोट्या मारणे- कष्टाशिवाय चैन नाही
वडिलांनी कष्ट करून माया जमा केली,पण दत्तक पुत्राला त्याचे काय, तो तर आयत्या पिठावर रेघोट्या ओढणारा
20.आयत्या पिठावर रेघोट्या मारणे- कष्टाशिवाय चैन नाही
वडिलांनी कष्ट करून माया जमा केली,पण दत्तक पुत्राला त्याचे काय, तो तर आयत्या पिठावर रेघोट्या ओढणारा
21.आमूलाग्र बदलणे- संपूर्णतया बदलणे
लहानपणी खोडकर रामी आता पुढारी झाल्याने आमूलाग्र बदलला आहे
22.अभय देणे- सुरक्षितपणाची हमी देणे
गुंडाना मंत्र्यांनी अभय दिल्यामुळं त्यांनी नुसता हैदोस घातला आहे
23.अनुमान करणे-तर्क करणे
अनुभवाशिवाय अनुमान करणे व्यर्थ आहे
24.आयुष्याची दोरी तुटणे-मृत्यू येणे
माणसाची आयष्याची दोरी तुटली कि कोणाचं काही चालत नाही
25.आकाश फाटणे- मोठे संकट येणे
मथुरा बाईंना पती देवाघरी गेल्यावर त्यांचं सांत्वन करणाऱ्या वाहिनी म्हणाल्या रडू नका मथुराबाई आकाश फाटले त्याला कोण काय करणार
26.ओहोटी लागणे-कमतरता येणे
संपतरावांची शेती कुळांनी घेल्यापासून त्यांच्या सांसाराला जणू ओहोटीच लागली
27.इंगा जिरवणे-गर्व नाहीसा होणे
भीम्याला कुस्तीत चारीमुंड्याचित केल्यापासून त्याचा इंगा जिरला आहे
28.इकडचा डोंगर तिकडे करणे- फार मोठे काम करणे
नापीक जमिनीतून पीक काढताना इकडचा डोंगर तिकडे करावा लागतो तेंव्हा चार दाणे दिसतात
Phrases and their use in sentences|वाक्यप्रचार आणि त्यांचे वाक्यात उपयोग
29.उदक सोडणे- आशा सोडणे
भाऊ बंदानी इस्टेटीचा ताबा मिळताच घरादारावर उदक सोडून गणेश पंतांनी मुंबईची वाट धरली
30.उधाण येणे- भरती येणे
शाळेला सुटी पडताच विध्यार्थ्यांच्या खेळाला उधाण आले
31.उचल बांगडीकरने – जबरदस्तीने हलविणे
सरकारी जागेत बांधलेल्या झोपडीवाल्यांची पोलिसानी उचल बांगडी केली
32.अंग चोरणे- कुचराई करून काम करणे
काही आळशी माणसे अंग चोरून आपले काम करतात
33.अंग झाकणे-एखाद्या कामाशी आपला असलेला संबंध उघड न करणे
स्वातंत्र्य चळवळीशी आपला संबंध नाही असे भासवण्यासाठी पुष्कळ सरकारी नोकरी अंग झाकून वागत नसत
34.अंग झाडणे- नाकबूल करणे
कोर्टात खेटे घालावे लागणार असे दिसताच पुष्कळ जण अंग झाडून टाकतात
35.अंगावर घेणे- पत्करणे
भावंड सांभाळणार दुसरं कोणी वडीलधारी माणूस घरात नसल्यामुळे दादाला सर्व जबाबदारी अंगांवर घ्यावी लागली
36.उर दडपणे- स्तब्ध होणे
सभेत श्रोत्यांनी अलोट गर्दी पाहून वक्त्यांचा ऊर दडपून गेला
37.उर फोडून घेणे- फार श्रम घेणे
अकाली पडलेल्या संसाराची जबाब्दारी पार पडताना सतीशचा उर फुटून गेला
38.उर बडविणे- दुःखाने छाती पिटून घेणे
जवाहरलाल नेहरूंच्या निधनाची बातमी येताच कित्येक भारतीयांनी उर बडवून घेतला
39.उरावर घेणे-जबाबदारी स्वीकारणे
कृष्णरावांनी संस्था चालविण्याची जबाबदारी उरावर घेऊन पार पडली
40.उराशी धरणे-प्रेमाने कवटाळणे
परीक्षेत पहिला क्रमांक मिळाल्याचं एकूण आईने राजुला उराशी धरले
41.उरापोटी धरणे – नम्रपणे समजूत घालणे
गडगडाटाला घाबरलेल्या लहानग्या संतूला ताईने उरापोटी धरले
42.ओटीत घालणे- जबाबदारीं दुसऱ्यावर सोपवावे
देवाघरी जाताना बाळाची आई बहिणीला म्हणाली,माझ्या लेकराला तुझ्या ओटीत घालते त्याचा सांभाळ कर
43.ओटी भरणे- जिव्हाळ्याच्या माणसाला सदिच्छा देणे
वैद्यबुवा,माझ्या लाडक्या लेकाला बरे करून माझी ओटी भरा
44.ओटीत घेणे- दत्तक घेणे
विहीणबाई माझ्या लाडक्या लेकीला तुमच्या ओटीत घालते तिचा सांभाळ करा
45.ओटाबाहेर काढणे- बोलून दाखवणे
मी दिलेली बातमी गुप्त ठेव ओटाबाहेर काढू नकोस
46.उघडा पडणे- निराधार होणे
माझ्या शिरावरच वडिलांचं छत्र नाहीसे झाल्यामुळे मी उघडा पडलो आहे
47.उपदेशाचा डोस पाजणे-उपदेश करणे
मूर्ख माणसाला प्रत्येक गोष्टीत उपदेशाचा डोस पाजावा लागतो
48.उतराई होणे- उपकाराची फेड करणे
मामांनी माझ्यासाठी सारं काही केलं,त्यांचा कसा उतराई होऊ
49.ऊर भरून येणे- अंतःकरनात भावना दाटून येणे
मुलींची सासरी पाठवणी करताना प्रत्येक आईचा ऊर भरून येतो
50.एक घाव दोन तुकडे- चटकन निर्णय घेणे
एक घाव दोन तुकडे करणे सगळ्यांनाच जमते असे नाही
Phrases and their use in sentences|वाक्यप्रचार आणि त्यांचे वाक्यात उपयोग
51.उच्चाटन करणे- हकालपट्टी करणे
देशातून अज्ञानाचे उच्चाटन करण्यासाठी लोकांनी सरकारला सहकार्य दिले पाहिजे
52.उपसर्ग होणे-त्रास होणे
शहरातील लोकांना वाहनांचे आवाज,गिरण्या यांचा सतत उपसर्ग होत असतो
53.औषधालाही नसणे अजिबात नसणे
क्रूर माणसाजवळ दया माया औषधालाही नसते
54.औषध नसणे- उपाय नसणे
हट्टी माणूस आपला हेका कधीही सोडायला तयार नसतो, मग वाटत स्वभावाला औषध नाही हेच खरे
55.अकांड तांडव करणे- रागाने अट्टाहासपूर्ण भाषण करून थेईमान घालणे
आपल्या पक्षातील आमदारांनी विरुद्ध पक्षाला मतदान केल्याचे ऐकून रामरावांनी अकांड तांडव केले
56.उखाळ्या पाखाळ्या काढणे- एकमेकांच्या बऱ्यावाईट गोष्टी काढणे
कित्येक लोकांना दुसऱ्याच्या उखाळ्या पाखाळ्या काढण्यातच धन्यता वाटते
57.उन्हाची लाही फुटणे- अतिशय कडक ऊन करणे
वैशाखातल्या कडक उन्हातून फिरताना वाटत उन्हाची लाही फुटलीय जणू
58.उध्वस्त होणे- नाश पावणे
युद्धाच्या काळात कित्येक राष्ट्रे उद्धवस्त होतात
59.उन्मळून पडणे- मुळासकट उपटले जाऊन कोसळणे
चक्रीवादळात कितीतरी वृक्ष उन्मळून पडतात
60.कळस होणे- शिखर होणे
ब्रिटिशांच्या काळात भारतीय आंदोलकांवर अगदी अन्यायाचा कळस झाला होता
61.कपाळ फुटणे- दुर्दव ओढवणे
लग्नाला पुरती दोन वर्ष झाली नाहीत तोच दुर्दैवाने नलिनी ताईचा नवरा अपघातात वारल्याने त्यांना कपाळ फुटल्यासारखं झालं
62.करार मदार होणे- आपसात एखादी गोष्ट ठरविणे
करार मदार केल्याशिवाय कोणताही व्यवहार कायदेशीर समजला जात नाही
63.कसूर न करणे- कशाची कमी न करणे
वासूने अभ्यासात कसूर केले नाही तरीही तो नापास झाल्याचे एकूण वाईट वाटले
64.कचखाने- माघार घेणे
प्रसंग उद्भवला असताना कचखाने ध्येयवादी माणसाला शोभत नाही
65.करुणा भाकरने- दयेची याचना करणे
दुष्काळाच्या दिवसात शेतकरी वरुण राजाची करूना भाकतात
66.कणिक तिंबणे- खूप मारपीट करणे
घरात चोरीचा माल सापडताच पोलिसानी चोरांची कणिक तिंबली
67.कपाळाला आठ्या पडणे- नाराज होणे
मी गड्याला कोणतेही काम सांगितले तर तो कपाळाला आठ्या पडतो
68.कलम करणे- निरुपयोगी काढून टाकणे
पूर्वीच्याकाळी चोरीसारखे गुन्हे करणाऱ्याचे हात कलम करून ठेवीत असत
69.काट्याचा नायटा करणे- क्षुल्लक करणावरून अनर्थ करणे
चावडीवर गप्पा मारता मारता तो प्रसंग इतका विकोपास गेला तेंव्हा वाटलं काट्याचा नायटा होतो कि काय .
70.काया पालट होणे- संपूर्ण बदल होणे
सरकारने सुरु केलेलया निरनिराळ्या योजनांमुळे अनेक गावांचा कायापालट झाला आहे
71.काटा काढणे-खोड मोडणे
साधूचे ढोंग उघडकीस येताच जमावानी त्याचा काटा काढला
72.काखा वर करणे- ऐनवेळी अंग काढून घेणे
सामान्यांच्या ऐनवेळी कर्णधाराने काखा वर केल्यामुळे संघाची फारच पंचाईत झाली
73.कानोसा घेणे- चाहूल घेणे
आपल्याविषयी समोरच्या माणसाचं काय मत आहे याचा मी कानोसा घेतला
74.काळे करणे- निघून जाणे
आपलं काही चालणार नाही असं पाहून भविष्य सांगणाऱ्याने जमावातून तोंड काळे केले
75.काळजाचे कोळसे होणे- सर्व इच्छा उमेद नष्ट होणे
किल्ला सर होंत नाही असे दिसताच शत्रूच्या काळजाचे कोळसे झाले
76.कपोतवृत्तीने वागणे- संचयकरून आपत्काली उपयोग करण्याच्या वृत्तीने वागणे
आपल्या मुलाबाळांच्या उदरनिर्वाहासाठी कपोत वृत्तीने वागून वडिलांनी धनसंचय करून ठेवला
77.कानाडोळा करणे- दुर्लक्ष करणे
लहान मुलांच्या वाईट गोष्टीकडे थोरांनी कानाडोळाक करणे चांगले नाही
78.कान भरणे- चहाड्या करणे
लेकीने आईचे कान भरल्यामुळे ती सुनेला त्रास देऊ लागली
79.काळावर नजर ठेवणे- भविष्यकाळ जाणून घेणे
माणसाला प्रत्येक वेळी मागचा हवाला देऊन चालत नाही त्याला काळावर नजर ठेवावी लागते
80.काहून माजणे-विचार व भावनांचा गोंधळ होणे
आपणास नोकरीवरून काढून टाकलंय हे कळताच गोपूच्या मनात विचारांचे काहून माजले होते
81.काम उपसणे – खूप काम करणे
नावडत्या माणसाने कितीही काम उपसले तरी त्याच्या चुका काढण्यासाठी सगळे तयार असतात
82.कास धरणे- आधार घेणे
विद्यार्थ्याने अभ्यासाची कास धरल्याशिवाय त्याला परीक्षेत यशाची आस करता येत नाही
83.कागदी घोडे नाचविणे- कागदी पत्रव्यवहाराचा पराक्रम करणे
आपला राजीनामा देऊन दोन-तीन वर्ष झाली तरी हिशोबाचा पत्ता नाही म्हणून खवळलेले गणेशपंत कडाडले नुसते कागदी घोडे किती नाचवणार
84.काडीमोड घेणे- संबंध तोडणे
चकोर पत्नीला अतिशय छळू लागला म्हणून तिने काडीमोड केला
85.कान उघडणी करणे- चुकीची वा दोषाची जाणीव करून देणे
मालकाने गैरहजेरी करणाऱ्या नोकरांची चांगलीच कान उघडणी केली
86.किडून घोळ होणे-संपूर्णतः किडून जाणे
मध्येच पडलेल्या पावसामुळे आंबे किडून घोळ झाले आहेत
87.कुत्र्याने हाल न खाणे- कुणीही न विचारणे
फुटपाथवर सापडणाऱ्या बेवारशी प्रेतांचे कुत्रा सुद्धा हाल खात नाही
88.केसाने गळा कापणे- विश्वास घात करणे
कंपनीच्या मालकाने मॅनेजरवर विश्वास टाकला पण मॅनेजरने त्याचा केसाने गळा कापला
89.कुरापत काढणे-भांडण उकरून काढणे
भांडकुदळ माणसांना काहीतरी कुरापत काढल्याशिवाय चैन पडत नाही
90.कुंपणाने शेत खाणे- विश्वासू माणसाने घात करणे
विश्वस्तानीचं इस्टेट हडप केली तेंव्हा वाटले, कुंपणाने शेत खाल्ले त्याला कोण काय करणार?
91.कोपरापासून हात जोडणे- संबंध न यावा म्हणून प्रार्थना करणे
रामरावांनी संस्थेचे अध्यक्ष पद स्वीकारावं म्हणून त्यानं गळ घालण्यात आली, पण त्यांनी कोपरापासून हात जोडले
92.कपाळ उठणे- पीडा देणे
सुटीच्या दिवशी मुलांनी घरात घातलेले हैदोस बघून लक्षमीबाईंचे कपाळ उठले
93.कपाळावर हात मारणे- नशिबाला दोष देणे
रोगराईच्या साथीत एकामागे एक दुभत्या गाई गोठ्यात प्राण सोडला हे पाहून सखाराम पंतांनी कपाळावर हात मारून घेतला
94.कान किटने- तीच तीच गोष्ट वारंवार ऐकूनकंटाळून जाणे
गिरणीच्या त्या कर्कश भोंग्याने माझे कान कंटाळून गेले
95.कान टवकारून ऐकणे- लक्ष पूर्वक ऐकणे
आपल्यविषयी कोणीतरी बोलत असले कि बहिरेसुद्धा कान टवकारून ऐकतात
96.कान टोचणे- एखाद्याला एखादे काम करण्यास चिथावणे
दुसऱ्याने कान टोचले कि सुरळीत चाललेली कामे बिघडतात
97.कान लांब होणे- अक्कल कमी होणे
नको, ते सांगून आईला छळू लागलेल्या अविला आई म्हणाली तुझे काम लांब होऊ लागले आहे
98.काळजाला घरे पडणे- मनाला वेदना होतील असे बोलने
सविता दुसर्यांच्या काळजाला घरे पडतील असे बोलत होती
९९.कंठ दाटून येणे- गहिवरून येणे
अतिरेक्यांनी चालवलेली निरपराधी लोकांची हत्या ऐकून कंठ दाटून येतो
100.कानावर हात ठेवणे- ऐनवेळी जबाबदारी टाळणे
पुष्कळ माणसे प्रसंग येण्यापूर्वी आश्वासने देतात, पण प्रसंग येताच कानावर हात ठेवतात
101.कानाला खडा लावणे- पुन्हा एखादी चूक न करण्याचा निश्चय करणे
आता कोणत्याही अमिषाला भाळून जबाबदारी स्वीकारायची नाही असा कानाला खडा लावला आहे असे विलासराव म्हणाले
Phrases and their use in sentences|वाक्यप्रचार आणि त्यांचे वाक्यात उपयोग
हे पण वाचा-मराठी म्हणी संग्रह आणि त्याचे अर्थ
हे पण वाचा–मुलांच्या विकासासाठी योगासने