
All Information About Kabaddi
कब्बडी खेळाविषयी नियम
कबड्डी या खेळाविषयी संपूर्ण माहिती मंडळी आज आपणजाणून घेणार आहोत.
खेळ एक नाव अनेक
कबड्डी हा खेळ भारतातील प्राचीन खेळांपैकी एक आहे. देशाच्या विभिन्न प्रांतामध्ये याला विविध नावानी ओळखले जाते. महाभारत काळापासून खेळाला जाणारा हा खेळ अतिशय लोकप्रिय राहिला आहे. त्या वेळी या खेळाला ‘श्वास’ या नावाने ओळखला जात होता. त्यानंतर हा खेळ ‘अभंग ‘या नावाने ओळखला जाऊ लागला. उत्तर प्रदेश मध्ये याला’ तो – तो ‘ या नावाने तर बिहार आणि बंगालमध्ये या खेळाला ‘हू- हू -हू ‘या नावाने खेळला जात होता. तामिळनाडू मध्ये हा खेळ ‘ चेंडूच्या’ नावाने तसेच कर्नाटक मध्ये ‘गुडू ‘ या नावाने ओळखला जात. भारताच्या विविध भागामध्ये ‘हू -तू- तू’ कुस्ती या नावाने ओळखला आणि खेळला जात होता.आता मात्र भारताच्या विभिन्न भागामध्ये कबड्डी या नावाने हा खेळ प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे .
आता जाणून घेऊया कब्बडी ची ऐतिहासिक पार्श्वभूमी(कबड्डी खेळाविषयी संपूर्ण माहिती)
कबड्डी खेळाविषयी सुरुवातीला कोणत्याही पद्धतीचे पक्के रीतिरिवाज नव्हते वेळेनुसार नियम बनवले गेले.आणि त्यामध्ये बदल केला गेला. इ.स. १९२० नंतर कबड्डी हा क्रीडा प्रकार खूप लोकप्रिय झाला.यासाठी नवीन नियम बनवले गेले.परांजपे यांनी या नियमांना अंतिम रूप दिले.ज्यांना डेक्कन जिमखाना यांनी प्रकाशित केले. इ.स. १९३३ मध्ये महाराष्ट्र शारीरिक शिक्षण मंडळ यांनी एक नवीन नियमावली बनवली गेली. ज्यामुळे १९३८ मध्ये प्रथम अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले गेले.आज राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय स्तरावर कब्बडी हा खेळ खूप लोकप्रिय झाला आहे. गावपातळीपासून सुरु झालेला हा खेळ जगभरातील मोठ्या शहरामध्ये प्रसिद्ध झाला आहे.
जाणून घेऊया कब्बडी खेळाचे मैदानाविषयी

कब्बडी खेळण्याकरिया एक समपातळीतील आणि नरम मैदान तयार केल्या जाते. हे मैदान तयार करण्यासाठी पोयटा माती, लाल माती इ. चा वापर पुरुष, महिला आणि जुनिअर वर्गाकरिता मैदान वेगवेगळ्या आकाराचे असते.
पुरुषांकरिता आणि जुनिअर गटाकरिता मैदानाचा आकार -१३मी x १० मी
महिलांकरिता मैदानचा आकार- १२मी .x ८ मी .
सबज्युनिअर करीत -११मी . X ८मी .
मैदानाच्या मध्यभागी मध्य रेषा टाकली जाते. मध्य रेषा मैदानाचे दोन भाग करते. पुरुषाकरिता आणि जुनिअर गटासाठी मध्यरेषा ६. ५० मी अंतरावर तर महिला आणि सबज्युनिअर गटासाठी मध्यरेषा ६ मी . अंतरावर असते. पुरुषाकरिता आणि जुनिअर गटाकरिता निदान रेषा क्रीडांगणाच्या मध्यरेषेपासून ३.७५ मीटर अंतरावर असते. महिला आणि सबज्युनिअरकरिता निदान रेषा क्रीडांगणाच्या मध्यरेषेपासून ३ मी . अंतरावर असते. निदान रेषेपासून १मी.अंतरावर अंतिम रेषेच्या बाजूस एक रेषा बोनस रेषा म्हणून आखले जाते. राखीव क्षेत्र क्रीडांगणाच्या दोन्ही बाजूस १मी. असते. पुरुषाकरिता सीटिंग बॉक्स ८मी. X १मी. असून अंतिम रेषेपासून २मीटर असतो. महिलांकरिता सीटिंग बॉक्स ६मी X १ मी. असून अंतिम रेषेपासून २मीटर अंतरावर असतात.
कसा असतो कब्बडी खेळाचा पोशाख (Uniform ) (कबड्डी खेळाविषयी संपूर्ण माहिती)
प्रत्येक खेळाडूने बनियान व हाफ पॅन्ट खेळण्यासाठी घालणे आवश्यक असते. पायात सॉक्स आणि कापडी बूट घालावा. प्रत्येक खेळाडूच्या बनियान वर नंबर लिहिलेला असतो. बनियनच्या छातीवर नंबर ४ इंच लांब आणि पाठीमागे ६इंच लांब नंबर लिहिलेला असतो. याशिवाय कुठल्याही अन्य वस्तू घालू नये. असे खेळाडूंना बंधन असते.असा असतो कब्बडी खेळाचा पोशाख.
आता जाणून घेऊया कब्बडी खेळाविषयी नियम
कब्बडी खेळ सुरु करण्यापूर्वी नाणेफेक केले जाते. नाणेफेक जिंकणारा संघ अंगण किंवा चढाई यापैकी एकाची निवड करतो. दुसऱ्या डावात अंगण बदलून अगोदर असतील तेवढेच खेळाडू घेऊन डाव सुरु करतात. त्यावेळी प्रथम ज्या संघाने चढाई केलेली नसते तो संघ चढाई करतो.
(कबड्डी खेळाविषयी संपूर्ण माहिती)
- चढाई करणाऱ्या खेळाडूने कब्बडी हा उच्चार स्पष्टपणे आणि सलग केला पाहिजे.
- चढाई करणाऱ्याने मध्यरेषा ओलांडण्यापूर्वी दम घालण्यास सुरुवात करावी, तसे ना आढळल्यास पंचानी विरुद्ध संघाला चढाईची संधी द्यावी.
- खेळ चालू असताना खेळाडूच कोणताही भाग अंतिम रेषेबाहेर जाऊ नये, तसा गेल्यास तो बाद ठरवला जाईल, परंतु झटापटीच्या वेळी तसे झाल्यास तो खेळाडू बॅड नसतो. अशा वेळेस शरीराचा कोणताही भाग आत असला तरी चालतो.
- झटापट सुरु झाल्यास राखीव क्षेत्राच्या क्रीडाक्षेत्रात समावेश होतो, झटापट संपल्यानंतर खेळाडूंनी आपापल्या क्षेत्रात परत जाताना राखीव क्षेत्राचा उपयोग करता येतो.
- खेळ चालू असताना खेळाडू अंतिम रेषेबाहेर गेल्यास बाद ठरवला जातो.
- चढाई करणारा आपल्या अंगणात गेल्यावर अथवा बाद झाल्यानंतर प्रतिपक्षाने ५ सेकंदात आपला खेळाडू चढाई साठी पाठवावा.
- चढाई करणार आक्रमक खेळाडू बचाव करणाऱ्या खेळाडूला स्पर्श करून आपल्या अंगणात परत जात असताना त्याचा पाठलाग करता येईल, परंतु चढाई करणारा पकडीतून सुटून जात असेल, अशा वेळी मात्र त्याचा पाठलाग करता येणार नाही.
- ढाई करणाऱ्या खेळाडूविरुद्ध अंगणात दम गेल्यास तो बाद ठरवला जाईल.
- चढाई करणारा बचाव करणाऱ्या एक किंवा अधिक खेळाडूंना केवळ स्पर्श करून जाता येत असेल तर त्याचा पाठलाग करता येईल.
- एकाच वेळी एकापेक्षा जास्त खेळाडूंनी चढाई केल्यास ती ग्राहय ना मानता प्रतिस्पर्धी संघास चढाईची संधी दिली जाते.
- वारंवार सूचना देऊन एकपेक्षा जास्त खेळाडू चढाईस जात असतील तर पंचानी प्रथम गेलेल्या खेळाडुखेरीज बाकी सर्व खेळाडूंना बाद ठरवावे.
- चढाई पूर्ण होईपर्यंत म्हणजेच चढाई करणारा आपल्या अंगणात जाईपर्यंत बचाव करणाऱ्या खेळाडूंपैकी कुणीही मध्यरेषा ओलांडू नये तसे केल्यास त्या खेळाडूला बाद केले जाते.
- चढाई सुरु असताना बचाव करणाऱ्या खेळाडूने मध्यरेषेला स्पर्श करून त्या चढाई करणाऱ्यास पकडले अथवा मदत केली तर बचाव करणारा बाद होईल.
- जो संघ लोन करेल त्या संघास दोन गुण मिळतात. लोन झाल्यास दहा सेकंदात सर्व संघ परत मैदानात आला नाही, तर प्रतिपक्षास एक गुण द्यावा, तसे करूनही जर संघ मैदानात येत नसेल,तर तो प्रत्येक पाच सेकंदाला एक या प्रमाणे सामन्याचा वेळ संपेपर्यत गन देत राहतील.
- वारंवार पाळी नसताना एखादा खेळाडू चढाईस जात असेल तर प्रतिस्पर्धी संघास एक गुण द्यावा.
- प्रतिपक्षाचा एक खेळाडू बाद झाल्यास एक खेळाडू एक खेळाडू आत येतो.
- पंच किंवा सरपंचाने एखादया संघाला अवांतर गुण दिल्यास त्या संघाला फक्त गुण मिळतात, परंतु त्याचे बाद झालेले खेळाडू उठू शकत नाहीत.
- कोणत्याही अडथळ्याने सामना बंद पडला व तो २० मी.च्या आता सुरु झाल्यास सामना उरलेल्या वेळातच खेळाडू व त्याच गुणसंख्येवर खेळवावे. मात्र त्यानंतर सुरु होत असल्यास सामना सुरुवातीपासून खेळवावा . त्यावेळी पूर्वीचेच खेळाडू असावेत, असे बंधन नाही.
- निलंबित किंवा बडतर्फ खेळाडूंसाठी बदली खेळाडू घेता येणार नाहीत, तसेच निलंबित वा बडतर्फ करण्याने कमी झालेल्या खेळाडूंची संख्या असताना बोनस रेषेचा नियम लागू होईल. तसेच लोन झाल्यास कमी असलेल्या खेळाडूंच्या संख्येइतके गुण,अधिक दोन गुण दिले जातील.
कब्बडी खेळामध्ये कोणत्या चुका ग्राह्य धरल्या जातात .
(Faults )
- चढाई करणाऱ्याचे तोंड बंद करणे तसेच गळा दाबून त्याचा श्वास जबरदस्ती थांबवण्याचा प्रयत्न करणे.
- कोणत्याही प्रकारे हिंसात्मक खेळ खेळणे.
- विरोधी खेळाडुद्वारे चढाई करणाऱ्याला कैची मारून पकडणे.
- क्रीडा क्षेत्राच्या बाहेरून एखादा खेळाडू अथवा कोचद्वारे कोचिंग करणे.
या स्थितीमध्ये पंच कार्डाचा उपयोग करतात ज्याचा प्रयोग या प्रकारे होतो.
1.हिरवे कार्ड – चेतावणी
2.पिवळे कार्ड – दोन मिनिटांकरिता सामन्यातून अस्थायी निलंबित
3.लाल कार्ड – सामन्यातून किंवा स्पर्धेतून निलंबित
अधिकारी (Officials)
प्रत्येक सामन्यात एक रेफरी,दोन umpire , एक स्कोरर आणि दोन लाईनमन, दोन सहाय्यक स्कोरर असतात. umpire चा निर्णय सर्वाना बंधनकारक असतो. तो कोणत्याही खेळाडूला चेतावणी किंवा अंक देऊ शकतो.