How To Boost Kids Immunity |मुलांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी उपाय

मुलांची प्रतिकार शक्ती कशी वाढवायची ?

तर मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत लहान मुलांची नैसर्गिक रित्या रोगप्रतिकार शक्ती कशी वाढवायची आणि काळजी कशी घ्याची.

रोगप्रतिकार शक्ती म्हणजे शरीरात प्रवेश करणाऱ्या विविध प्रकारच्या रोगजंतूंचा प्रतिकार करून त्या रोगजंतूंचा नायनाट करण्याची शक्ती निसर्गतः आपल्या शरीरात तशी व्यवस्था असते. साधारणपणे आपल्या रक्तातील पांढऱ्या पेशी हे आपल्या शरीराचे सैनिक असतात. शरीराच्या बाहेरून कोणत्याही प्रकारचे विषाणू आणि जीवाणू आपल्या शरीरात प्रवेश करतात. किंवा आपल्या शरीरातील यंत्रणेवर हल्ला करण्याची तयारी करतात, तेंव्हा त्यांच्यावर प्रतिहल्ला करून त्यांना परतवून लावण्याचे काम आपल्या रक्तातील पांढऱ्या पेशी करीत असतात.बाहेरून शरीरात प्रवेश करणाऱ्या रोगजंतूंना निष्प्रभ करण्याची आपल्या पांढऱ्या पेशींची ताकद म्हणजेच आपली रोगप्रतिकार शक्ती असते.ही रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आहारातून सर्व व्हिटॅमिन्स सोबतच प्रामुख्याने व्हिटॅमिन’सी ‘वर भर असावा. तसेच प्रथिनांमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास उपयुक्त ठरणारे अँटीबॉडीज तयार करण्यास मदत म्हणून बाळाच्या आहारात उच्च प्रतीचे प्रथिने असतात.

मुलांची प्रतिकार शक्ती कमी असते.

नुकत्याच जन्मलेल्या बाळापासून ते साधारणपणे 11 वर्ष वयापर्यंतच्या मुलांमध्ये प्रतिकार शक्ती कमी असते.नंतर ती वाढत जाते. उतारवयात म्हणजे साधारणतः साठीच्या आसपास ती कमी होऊ लागते. लहान मुलांची प्रतिकार शक्ती कमी असल्यामुळे आपल्या शरीरात प्रवेश करणाऱ्या सर्व प्रकारच्या रोगजंतूंचा ते योग्य प्रकारे प्रतिकार करू शकत नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या आजारांना लगेच बळी पडत असतात.लहान मुलांची प्रतिकार शक्ती वाढविणे सहज शक्य नसते. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा आजार होण्यापासून त्यांना वाचवण्यासाठी सोपी पद्धत म्हणजे विविध प्रकारचे रोगजंतू त्यांच्या शरीरात प्रवेश करणार नाहीत याची खबरदारी घेणे.

रोगजंतूंचा संसर्ग कसा थांबवायचा
कोणत्याही प्रकारचे रोगजंतू बाळाच्या शरीरात साधारणपणे तीन प्रकाराने पोहोचत असतात. अन्नातून,पाण्यातून आणि हवेतून. या तीन मार्गाने आपल्या बाळाच्या शरीरात कोणत्याही प्रकारचे रोगजंतू जाणार नाहीत याची काळजी घेणे म्हणजे बाळाला निरोगी ठेवणे असते. बाळाच्या शरीरात रोगजंतू गेलेच नाहीत, तर बाळ आजारी पडणार नाही

अन्नातून होणार रोगजंतूंचा प्रसार रोखण्यासाठी उपाय

लहान मुलांची रोग प्रतिकार शक्ती वाढविण्या अगोदर अन्नातून होणारा रोगजंतूंचा प्रसार रोखणं गरजेचं आहे.

  • मुलांना बाहेरचे किंवा उघड्यावरचे पदार्थ कधीही खायला देऊ याची खबरदारी घ्यावी ण्याची मुलांना सवय लावू नये.
  • मुलांना किती आहार दिला यापेक्षा किती पौष्टिक दिला याकडे जास्त लक्ष द्यावे.
  • मुलांच्या जेवणाच्या वेळा निश्चित करून त्यावेळी मुलांना ताजे आणि गरम पदार्थ करून खायला द्यावेत.
  • मुलाची खाण्यापिण्याची भांडी वेगळी आणि स्वच्छ असावीत.
  • मुलांच्या ताटात उरलेलं अन्न पुन्हा खायला देऊ नये. ते न ठेवता फेकून द्यावे.
  • बराच वेळ उघडे असलेले अन्न मुलांना खायला देऊ नये.
  • मुलांना खाऊ घालायच्या आधी आपले हात स्वच्छ धुवून घ्यावेत.
  • मूल स्वतः च्या हाताने खात असेल, तर त्याचे हात स्वच्छ धुवून घ्यावेत आणि धुतलेले हात स्वच्छ टॉवेलने कोरडे करावेत.
  • जेवताना काहीही खाताना मूल ताटातून वा हातातून निसटून जमिनीवर पडलेले पदार्थ खाणार नाही,याची खबरदारी घ्यावी.
  • मुलांना कोणतिही फळे खायला देण्यापूर्वी ती स्वच्छ धुवून घ्यावीत.
  • चिरून जास्त वेळ ठेवलेली फळे मुलांना खायला देऊ नयेत.
  • हाताला लागणारी कोणतीही वस्तू उचलून तोंडात घालण्याची मुलांना सवय असते. त्यामुळे मुलांसाठी घातक असलेल्या वस्तू मुलांच्या हाताला लागणार नाहीत अशा ठिकाणी ठेवाव्यात. तसेच मुल कोणत्या वस्तूसोबत खेळते आहे, त्याने हातात काय घेतले आहे, याकडे दुर्लक्ष करू नये.

पाण्यातून होणार रोगजंतूंचा प्रसार रोखण्यासाठी

लहान मुलांची रोग प्रतिकार शक्ती वाढविण्या अगोदर पाण्यातून होणार रोगजंतूंचा प्रसार रोखणं गरजेचं आहे.

  • मुलांना अनेक आजार केवळ पाणी पिल्यामुळे होण्याची शक्यता आल्यामुळे अशा प्रकारच्या आजारापासून वाचवण्यासाठी त्यांना शुद्ध आणि स्वच्छ पाणी प्यायला देणं गरजेचं असते.
  • दोन वर्षापर्यंत लहान मुलांना शक्यतो उकळून गार केलेलं पाणी द्यावे. पाणी साधारणपणे वीस मिनिटे उकल्यानंतर गार करावे म्हणजे पाण्यात कोणत्याही प्रकारचे रोगजंतू राहत नाही.
  • मुलांचे पाणी पिण्याचे भांडे वेगळे असावे आणि त्याने पाणी पिल्यानंतर प्रत्येक वेळी ते स्वच्छ करून स्वच्छ जागी ठेवावे.
  • बाहेरच्या ज्युस व पदार्थामध्ये पाणी असते म्हणून घरीच फळांचे रस घ्यावेत.
  • घराबाहेर दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी मुलांना घेऊन जाताना मुलांसाठी एका बाटलीत आपले घरातील पाणी सोबत न्यावे.
  • शक्यतो मुलांच्या पिण्याच्या पाण्यात बदल होणार नाही, असे पाहावे

हवेतून होणारा रोगजंतूंचा प्रसार रोखण्यासाठी

  • वातावरणात अचानक होणारा मोठा बदल मुलांना सहन होत नाही.अशा वातावरणात ऋतू संक्रमणाच्या काळात मुलांची योग्य पद्धतीने काळजी घ्यावी
  • थंडीच्या दिवसात मुलांना गरम कपडे घालावेत, तसेच उन्हाळयाच्या दिवसात त्यांना उष्णतेचा त्रास होणार नाही . याची काळजी घ्यावी.
  • पावसाळ्याच्या दिवसात मुले पाण्यात भिजणार नाहीत, त्यांच्या अंगावर ओले कपडे राहणार नाहीत याची काळजी घ्यावी.
  • पावसाळ्यात भिजल्या नंतर मुलाचे डोके लगेच कोरडे करावे.
  • पावसाळ्याच्या दिवसात किंवा अन्य कुठल्याही साथीचे रोग पसरलेल्या दिवसात मुलांना बाजार, बाग, चित्रपटगृह, सार्वजनिक कार्यक्रम अशा ठिकाणी शक्यतो नेऊ नये.
  • साथीचे रोग पसरलेल्या दिवसात प्रवासाला जाऊ नये, तसेच मुलांच्या नेहमीचे सवयीचे असलेले ठिकाण बदलू नये.
  • काही साथी पसरलेल्याला असताना खबरदारीचा उपाय म्हणून मुलांना आवश्यक लसी किंवा औषधोपचार करावेत.
  • आजारी व्यक्तीला भेटण्यासाठी इस्पितळात जाताना लहान मुलांना सोबत नेऊ नये.
  • घरात कुणी व्यक्ती आजारी असेल तर, त्याचा संसर्ग मुलांना होणार नाही याची काळजी घ्यावी.

प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहार

  • ६ ते ८ महिन्यानंतर बाळाला रोज चिमूटभर शतावरी त्याबरोबर अश्वगंधा पावडर द्यावी .
  • मुलांची रोगप्रतिकारशक्ती मुळात कमी असली आणि त्यामुळॆ ते कोणत्याही प्रकारच्या आजारांना बळी पडण्याची शक्यता अधिक असली तरीही मुलांना पौष्टिक आणि सकस आहार जाणीवपूर्वक देऊन मुलांची प्रतिकार iशक्ती योग्य प्रमाणात वाढविता येते.
  • आईचे दूध घेतल्यामुळे बाळाची रोगप्रतिकार शक्ती खूप वाढते.

मुलांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी पालक पुढील प्रमाणे काळजी घेऊ शकतात.

  • मुलांना खाऊ म्हणून उघड्यवरचे पदार्थ विकत न देता, त्यांना रोज १ केळी द्या.
  • हिरव्या पालेभाज्या, कोबी, अळू, शेवगा वगैरे बाळ व आई दोघांसाठी उपयुक्त असतात.
  • हरभरा, करडी मेथी , पालक इत्यादींची पाने भाजीसाठी वापरावीत.
  • लोखंडी भांड्यात अन्न शिजवल्याने भांड्यातील लोह अन्नात उतरते व शरीराची लोहाची गरज भरून निघते.
  • रोजच्या जेवणात साखरेचा वापर न करता गुळाचा वापर करावा. बाळाला कुठल्या ना कुठल्या प्रकारे ‘क ‘ जीवनसत्व लिंबू , आवळा , संत्री, मोसंबी अशा फळामध्ये ते भरपूर असते. मुबलक प्रमाणात द्यावे.

How To Boost Kids Immunity |मुलांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी उपाय

निरोगी राहण्यासाठी आहार

सकस आहार

  • बाळ निरोगी राहावे यासाठी बाळाला नियमित स्वरूपात चांगल्या आणि सकस अन्नाची गरज असते. अपुऱ्या आणि निकृष्ट दर्जाच्या आहारमुळेच बाळाला विविध प्रकारचे आजार होत असतात. वजन न वाढणे,योग्य प्रकारे शारीरिक वाढ न होणे, हाता पायावर सूज येणे, हालचाली मंदावणे तसेच केस विरळ आणि पिंगट होणे इ. लक्षणे बाळाचे योग्य प्रकारे पोषण होत नसेल तर आढळून येतात.
  • जुलाब होणे, कान दुखणे, डोके दुखणे , हिरड्यातून रक्त येणे, नाकातून रक्त येणे, पोटाचे विकार होणे या आजारांच्या मुळाशीही अयोग्य आहार असतो.
  • मुख्य म्हणजे योग्य आणि सकस आहार बाळाला मिळत नसेल तर बाळाची रोगप्रतिकार शक्ती कमी होते आणि त्याला होणाऱ्या संसर्गाचे प्रमाण वाढते.
  • अशक्त मुलाला हागवणीचा आजार होण्याची शक्यता असते. तसेच गोवर, टी. बी., क्षय हे आजार गंभीर स्वरूप धारण करण्याची शक्यता असते. सर्दीसारखा आजार सुद्धा अशा बाळाला सारखा होतो आणि एकदा झाल्यानंतर अनेक दिवस टिकतो.
  • बाळाला पुरेशा प्रमाणात सकस आहार योग्य प्रमाणात मिळाला तर त्यामुळे काही आजार बरे होतातच शिवाय अनेक आजारांना प्रतिकार करण्याची त्याची क्षमता अनेक पटीने वाढते.
  • बाळ आजारी पडल्यावर तसेच त्याला जुलाब होत असताना सकस आहार आवश्यक द्यावा. आजारी बाळाला सकस आहाराची अधिक गरज असते त्यामुळे तो देण्यासाठी सतत प्रयत्न करावा.
  • चांगल्या आरोग्यासाठी सकस आहार आणि स्वच्छता या गोष्टी खूप आवश्यक असतात.

शरीर निरोगी ठेवणारे खाद्यपदार्थ

खाली अन्नपदार्थांचे चार मुख्य गट दिले आहेत.बाळ निरोगी राहण्यासाठी या प्रत्येक गटातील एक तरी पदार्थ बाळाच्या रोजच्या जेवणात असायलाच हवा.

१. प्रमुख अन्न

लहान मूल किँवा बाळ सतत काही ना काही करीत असते. या सर्व क्रिया करण्यासाठी खुप मोठी शक्ती खर्ची पडत असते. हि शक्ती भरून काढण्यासाठी उपयुक्त ठरणारे अन्न म्हणजे प्रमुख अन्न असते. त्यामुळे या गटातील अन्न पदार्थाचा बाळाच्या जेवणात प्रामुख्याने समावेश असावा. तसे झाले नाही तर बाळ अशक्त होईल आणि अनेक आजारांना बळी पडण्याची शक्यता वाढेल. या अन्नपदार्थात तांदूळ, गहू, ज्वारी, मका, बाजरी, कडधान्ये, बटाटा,रताळी या पदार्थाचा तसेच भरपूर गर असलेल्या फळांचा समावेश करावा.

२.अधिक प्रथिने देणारे अन्नपदार्थ

शरीराची वाढ होण्यासाठी तसेच शरीर बांधेसूद होण्यासाठी प्रथिने आवश्यक आहेत. बाळ सदृढ आणि निरोगी राहण्यासाठी बाळाच्या आहारात उच्च प्रतीची पुरेशी प्रथिने असावीत. कारण प्रथिनांमधून प्रतिकार शक्ती वाढवण्यास उपयुक्त ठरणारे अँटीबॉडीज तयार व्हायला मदत होते. एकदल आणि द्विदल धान्ये,तेलबिया,हिरव्या पालेभाज्या, दूध,दही, अंडी, मटण आणि मासे यामध्ये भरपूर प्रमाणात असतात. सोयाबीन आणि शेंगदाणे यांच्यामध्ये भरपूर प्रथिने असल्यामुळे बाळाला रोजच्या जेवणा शिवाय भिजवलेले शेंगदाणे खायला द्यावेत.

३.जास्त ऊर्जा देणारे अन्नपदार्थ

तेल तूप यासारखे स्निग्ध पदार्थ तसेच साखर हे अन्नपदार्थ जास्त ऊर्जा देणारे आहेत.बाळाच्या रोजच्या जेवणात थोड्या फार प्रमाणात तरी या पदार्थचा समावेश असावा. पनीर , चीज,भुईमूग, काजू, बदाम,पिस्ता, मध आणि गूळ हे पदार्थ बाळाला खाण्यासाठी द्यावेत. साखरेऐवजी लहान मुलांना गूळ खणायची सवय लावावी कारण गुळात साखरेच्या बरोबरीने लोहही पुरेशी प्रमाणात असते.

४. भरपूर जीवनसत्व आणि खनिजे असणारे अन्नपदार्थ

जीवनसत्व हे बाळाच्या शरीराचे राखणदार असतात.सीमेवर सैनिकांचा पहारा असेल तर शत्रूच्या आक्रमणाची भीती नसते. त्याच प्रमाणे आजाराच्या शत्रूपासून शरीराचे रक्षण करण्याचे काम जीवनसत्व करीत असतात. रक्त, हाडे, दात मजबूत आणि चांगले राहण्यासाठी खनिजांची आवश्यकता असते. हिरव्या पालेभाज्या, पालक, मेथी, शेवगा यामध्ये जीवनसत्व असतात . भोपळा, टोमॅटो यातही जीवनसत्व असतात. पपई,लिंबू, आंबा, चिंच ,संत्री हि फळेही जीवनसत्व पुरवतात. मटण,अंडी ,कोंबडी, मासे, आणि दूध यातही जीवनसत्व असतात. खनिजे, बाजरी,नाचणीत लोह आणि कॅल्शिअम असते. गूळ आणि चिंचेत तसेच हिरव्या पालेभाज्यातही लोह हे खनिज पुरेशा प्रमाणात असते.

हे पण वाचा-सुंदर मराठी सुविचार

हे पण वाचा-क्रिकेट खेळाविषयी अधिक माहिती

हे पण वाचा-लहान मुलांचा पौष्टिक आहार