Cricket Rules and Information/ क्रिकेट खेळाविषयी अधिक माहिती

Cricket Rules and Information/ क्रिकेट खेळाविषयी अधिक माहिती

क्रिकेट ची ऐतिहासिक पार्श्वभूमी

क्रिकेट खेळाविषयी अधिक माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.क्रिकेट जगभरात सर्वात जास्त खेळल्या जाणाऱ्या खेळपैकी एक आहे . क्रिकेट चा जन्म इंग्लंड मध्ये झाला.इंग्लंड मध्ये हळूहळू क्रिकेटची लोकप्रियता वाढत जाऊन क्रिकेट मोठ्या प्रमाणात खेळाला जाऊ लागला .आणि पाहता पाहता क्रिकेट लोकप्रियतेमध्ये प्रथम स्थानावर आला . भारतामध्ये जेंव्हा ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली त्यावेळी काही इंग्रजी कर्मचारी, नामांकित आणि उच्च कुळा तील लोक भारतात क्रिकेट खेळत असे .भारतामध्ये पारसी लोकांनी क्रिकेटला सर्वात जास्त पसंद केले. त्यावेळी १९७२ मध्ये कोलकाता क्रिकट क्लब ची स्थापना केली गेली. यापासूनच भारतात खरी क्रिकेटची सुरुवात झाली. हळूहळू हा खेळ भारतात वाढत गेला आणि लोकप्रिय होत गेला.

खेळ

क्रिकेट खेळाची माहितीमध्ये आत्ता आपण बघूया क्रिकेट खेळ दोन प्रकारे खेळला जातो. एकदिवसीय क्रिकेट सामने आणि टेस्ट क्रिकेट सामने. दोन संघामध्ये याचे सामने होतात. प्रत्येक संघाचे ११-११ खेळाडू प्रत्यक्ष खेळतात. प्रत्येक संघाचा एक कर्णधार, एक उपकर्णधार, एक विकेटकिपर, काही गोलंदाज आणि काही फलंदाज असतात. खेळ सुरु करण्यापूर्वी दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेक करून हे निर्धारित करतात कि कोणता संघ पहिली फलंदाजी किंवा क्षेत्ररक्षण करेल. एकदिवसीय क्रिकेट सामने मर्यादित षटकांचे असतात

क्रिकेटचे मैदान (Cricket Field)

मध्ये आत्ता आपण बघूया क्रिकेट खेळ गोलाकार स्टेडियम किंवा ओपन मैदानामध्ये खेळला जातो.मैदानाच्या केंद्रामध्ये (मधोमध ) कडक मातीचे पीच बनवले जाते. ज्याच्या दोन्ही बाजूला ३-३स्टॅम्प लावल्या जातात. पिचची एका बाजूपासून दुसऱ्या बाजूपर्यंत लांबी २२यार्ड (२०. १२ मीटर) आणि रुंदी १० फूट असते. पिचवर गावात नसते त्याला खोदून सिमेंटचे मिश्रण भरून मैदान तयार केले जाते. बाकीच्या मैदानावर गावात उगवले जाते. ज्यमुळे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या खेळडूला मदत मिळते. क्रिकेटच्या सिद्धांतानुसार सर्व मैदानामध्ये एक निर्धारित सीमा रेषेच्या आत खेळल्या जाते. सीमा रेषेला bondry म्हणतात

स्टम्प (stamps)

क्रिकेट खेळाची माहितीमध्ये आत्ता आपण बघूया क्रिकेट चा सामना दोन्ही स्टम्पच्या मध्ये खेळलाजातो. पिचच्या दोन्ही बाजूला ३-३ स्टम्प लावले जातात. या स्टम्पची लांबी ७१. १ सेंमी आणि तिन्ही स्टम्पची रुंदी २२.९६सेमी असते.दोन्ही स्टम्पच्या वर दोन दोन बेल्स ठेवल्या जाते. त्याची लांबी १.३सेमी असते. स्टम्प आणि बेल्स लाकडाने बनलेल्या असतात. आजकाल आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये मधल्या स्टम्पमधे कॅमेरा बसवलेला असतो . तो बऱ्याच वेळा उपयोगी पडतो

क्रिकेट बॅट (Cricket Bat)

क्रिकेट बॅट (Cricket Bat )
बल्लेबाज करण्यासाठी लाकडापासून बनणाऱ्या बॅट चा उपयोग केला जातो. बॅट ची लांबी ९६.सेमी (हँडलसहित )आणि रुंदी १०.सेमी असते. लगभग एका बॅट चे वजन २ते ४ पौंड असते. कारण बॅटच्या वजनासंबंधी काही पक्का नियम नाही. फँलंदाज कोणत्याही प्रकारच्या हलक्या किंवा जड बॅटचा खेळण्यासाठी प्रयोग करू शकतो. हलकी बॅट उचलण्यासठी सोपी असते. आणि score बनवण्यामध्ये पण अडचण येत नाही. उलट जड बॅट उचलण्यासाठी जड असते. परंतु ती लवकर शॉट मारण्यासाठी कामी येते.क्रिकेट संघासाठी सर्व बॅट लाकडाच्या असल्या

क्रिकेट बॉल (Cricket Ball )
क्रिकेट चा बॉल लाल किंवा पांढऱ्या चामड्यापासून शिवलेला असतो. ज्यामध्ये आत ठोस कॉर्क भरलेला असतो. या बॉलचे वजन १५५.gm ते १६३gm पर्यंत असते. या बॉलचा व्यास २२. सेमी असतो. खेलाच्या दरम्यान जर बॉल हरवलं किंवा खराब झाला तर तो नवीन बॉलचा प्रयोग करू शकतो

पोशाख .
दोन्ही संघाचे सर्व खेलाडू पॅंट, शर्ट , बूट , स्वेटर घालतात . Abdominal gard घालणे प्रत्येक खेळडुकरिता बंधनकारक असते. विकेटकिपर दोन्ही हातांमध्ये gloves,पायावर किपींग पॅड घालतात. पायाच्या रक्षणासाठी प्रोटेक्टरचा उपयोग केला जातो. दोन्ही फलंदाज बॅटिंग gloves, बॅटिंग पॅड , गार्ड, हेल्मेट इ. साहित्य घालतात.. क्रिकेट संघाकडून ठरवून दिलेल्या पोषाखाशिवाय कोणताही खेलाडू खेळू शकत नाही. क्रिकेट खेळण्यासाठी चामड्याचा आणि कापडी बुटाचा वापर होताना दिसतो जो पायासाठी आरामदायक असतो.

अम्पायर (umpires )

क्रिकेट खेळाची माहितीमध्ये आत्ता आपण बघूया क्रिकेटच्या स्पर्धेसाठी तीन umpire लागतात. सामन्याच्या नियमाचे पालन होण्यासाठी दोन umpire मैदानात तर एक umpire मैदानाबाहेर सर्व स्पर्धेवर नियंत्रण ठेवतो. umpire चा निर्णय हा सर्वसामान्य आणि अंतिम निर्णय असतो. साधारणपणे जो व्यक्ती umpire म्हणून नियुक्त केला जातो. तो माजी खेलाडू असतो. umpire संकेत इशारा देऊन आपला निर्णय देत असतो.

स्कोरर (Scorer )
फलंदाजी करणानार संघ आपल्या बारीच्या दरम्यान जेवढ्या धावा काढतात ,त्या सर्व स्कोरर द्वारे नोंदवल्या जातात. स्कोरर ला या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे लागते. कि umpire चा काय संकेत आहे, सर्वसामान्य एकूण गन खेलाडूचे व्यक्तीगत गुण,त्यांचा आऊट होण्याचा क्रम, एकूण लगावले छक्के आणि चौके काय होते. प्रत्येक match मध्ये दोन स्कोरर नियुक्त केले

क्षेत्ररक्षक- फिल्डिंग (Filding )
सामना सुरु होण्या अगोदर प्रथम नाणेफेक करून या गोष्टीचा निर्णय घेतला जातो कि कोणता संघ फलंदाजी आणि कोणता संघ गोलंदाजी करेल. फलंदाजी करणाऱ्या संघाचे दोन खेलाडू विकेटवर खेळण्यासाठीं येतात. आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचे सर्व खेलाडू मैदानामध्ये वेगवेगळ्या दिशांमध्ये जाऊन आपापले क्षेत्र सांभाळतात.क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या प्रत्येक खेलाडूच हा प्रयत्न असतो कि ते फलंदाजी करणाऱ्या खेळाडूला कमीत कमी धावा घेऊ दयाव्यात. गोलंदाजी करणाऱ्या खेलाडूचा पण हा प्रयत्न असतो कि तो लवकरांत लवकर फलंदाजी करणाऱ्या खेलाडूला आऊट करावे.

गोलंदाजी (Bowling )
क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूकडे दुसऱ्या दिशेने जो खेलाडु बॉल फेकतो. त्याला गोलंदाज म्हणतात. एक गोलंदाज एका ओव्हरमध्ये सहा बॉल फेकू शकतो. ज्याला ओव्हर म्हणतात.

नो बॉल (No Ball )
क्रिकेट खेळाची माहितीमध्ये आत्ता आपण बघूया गोलंदाजी करताना प्रत्येक गोलंदाजांना आपल्या नियमांचे पालन करणे आवश्यक असते. बॉल विकेटच्या पुढे बनवलेल्या क्रीजच्या आतून फेकला जातो. क्रीजच्या बाहेरून फेकलेल्या बॉलला नो बॉल म्हणतात. आणि फलंदाजी करणाऱ्या संघाला एक अधिकच गुण दिला जातो. फक्त runout ला सोडून फलंदाजाला कोणत्याही दिशेला या बालकडून आऊट मानला जात नाही. या नो बॉल च्या बदल्यात गोलंदाजाला बॉल फेकण्यासाठी एक अतिरिक्त संधी दिल्या जातात.

वाईड बॉल (Wide Ball )
जेंव्हा गोलंदाजाकडून फेकलेला बॉल फलंदाजाच्या खेळ सीमेच्या बाहेर जातो. तेंव्हा त्याला वाईड बॉल असे म्हणतात. अशा वेळी umpire आपले दोन्ही हात खांदयाच्या सरळ रेषेत करून वाईड बॉलचा संकेत देतो. umpire ने संकेत दिल्यानंतर जर कोणत्याही खेळाडूने या बॉलला मारले तर तो wide राहत नाही. wide बॉलच्या दिशेमध्ये एक अतिरिक्त गुण फलंदाज करणाऱ्या संघाला दिला जातो. आणि गोलंदाजाला पण एक अतिरिक्त bal फेकावा

डेड बॉल (Dead Ball )
बॉल ला खालील परिस्थितीमध्ये डेड समजल्या जाते.
१)फलंदाजाकडून बॉल खेलण्यापूर्वी स्टम्पच्या वर ठेवलेले बेल्स आपोआप पडले तर
२)गोलंदाजाने बॉल तर फेकलं पण फलंदाज तो खेळण्यासाठी तयार नव्हता आणि त्याने बॉल खेलण्याचा प्रयत्न केला नाही.
३)जलद बॉल फेकण्यासाठी येणाऱ्या गोलंदाजाच्या हातून बॉल फलंदाजाच्या दिशेने फेकण्यापूर्वीच त्याच्या हातून निघून गेला.
४)गोलंदाजी करताना बॉल umpire ला लागून इजा झाली किंवा तो खाली पडला.

फलंदाजी (Batting )
फलंदाजी करणे संपूर्ण क्रिकेट खेळामध्ये सर्वात महत्वपूर्ण कार्य आहे. फलंदाजी जितकी तांत्रीक दृष्टीने खेळली जाईल तेवढी जास्त विकसित होते. त्याचे सर्वात महत्वपूर्ण कार्य असते कि, अधिकाधिक वेळात विकेटवर टिकून राहणे, आणि जास्तीतजास्त धाव प्राप्त करने. फलंदाजाकडून ५० धावा पूर्ण केल्यावर अर्धशतक आणि १०० धावा पूर्ण केल्यावर शतक झाले असे मानले

फलंदाजाच्या आऊट (batsman out )
क्रिकेट च्या सामन्यांमध्ये एक फलंदाज पुढील प्रमाणे आऊट होतो.
१)बोल्ड (bold )
फलंदाज फलंदाजी करताना गोलंदाजाने टाकलेल्या बॉल ला खेळू शकला नाही. आणि बॉल जाऊन तिन्हीपैकी कोणत्याही स्टम्पला किंवा बेल्सला लागला तर फलंदाज क्लीन बोल्ड झाला असं समजलं जाते.

२.Catch आऊट
फलंदाजाने शॉट मारल्यावर किंवा बॉल फलंदाजाच्या बॅटला लागून हवेत उडल्यावर टप्पा खाण्याअगोदर तो कोणत्याही क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूने १० sec पर्यंत पकडला तर तो catch आऊट मानला जातो.

३ रण आऊट (run out )
फलंदाज ज्यावेळेस बॉल ला मारून run बनवण्यासाठी धावतो. त्या वेळेस दुसरा फलंदाज धावतो. अशा वेळी क्षेत्ररक्षण करणाऱ्या कोणत्याही खेळाडूने बॉल स्टॅम्पला लावल्यास आणि त्यावेळी फलंदाज क्रीज च्या बाहेर आल्यास तो रन आऊट होतो.

४.स्टम्प आऊट (Stumpout )
फलंदाजी करताना खेळाडू क्रीजच्या बाहेर बऱ्याचवेळी जातो. त्यावेळी बॉल सुटून विकेटकिपर किंवा इतर क्षेत्र रक्षकाकडे जातो. व त्याच्याकडून तो फलंदाज क्रीजच्या बाहेर असताना बॉल स्टॅम्पला लागल्यास फलंदाज stampout होतो.

५.एल बी डब्लू (L.B.W. )
एल.बी. डब्लू म्हणजे ‘लेग before विकेट ‘ बऱ्याच वेळी फलंदाज स्टॅम्पवर जाणारा बॉल जाणूनबुजून पॅड ने किंवा पायाने थांबवतो, त्यावेळी तो फलंदाज एल बी डब्लू मानला.

६.हिट विकेट (Hit Wicket)
फलंदाजी करताना फलंदाज्याकडून बॅट स्टॅम्पला लागल्यास किंवा शरीराचा कोणताही भाग स्टॅम्पला लागल्यास ती हिट विकेट मानली

७.बॉल ला दोन वेळा खेळणे (Hit the Ball Twice )
फलंदाजी करत असताना एकवेळ बॉल मारला आणि लगेच दुसऱ्या वेळी जाणूनबुजून किंवा अनावधानाने बॉल मारला जातो. त्यावेळी फलंदाज आऊट मानला जातो.

८. बॉल ला पकडणे (Handling The Ball )
गोलंदाजद्वारे टाकलेला बॉल जेंव्हा फलंदाज त्याच्या हातात पकडतो. किंवा स्पाय करो अशा वेळी फलंदाज या नियमाने आऊट मानला जातो.

९.क्षेत्ररक्षणामध्ये अडथळा (Obstrunction in the FIeld )
फलंदाजाचे फलंदाजी करताना क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या कोणत्याही खेळाडूचा रास्ता रोखाने, क्षेत्ररक्षणमध्ये बाधा उत्पन्न करणे असे जाणीवपूर्वक करत असेल तर तो फलंदाज आऊट मानलं जातो.

१०. टाईम आऊट (Time आऊट)
कोणताही एक फलंदाज आऊट झाल्यानंतर जर दुसरा फलंदाज दोन मिनिटांनी मैदानामध्ये न आल्यास umpire त्याला time आऊट देऊ शकतात. एखादे महत्वाचे कारण असल्यास तो आऊट दिला जात नाही.

Bye अँड लेग Bye

क्रिकेट खेळताना जेंव्हा कधी बॉल फलंदाजाच्या बॅटला न लागताच किंवा फलंदाजाच्या शरीराला लागून किंवा न लागून बॉल दूर जातो अशावेळी फलंदाज धावा काढतो त्यांना leg bye run असे म्हणतात.

डाव समाप्तीची घोषणा (Declaration Of End Of Innings)
संघाचा कर्णधार तसेच मॅनेजर किंवा coach तिघेही खेळाची रणनीती तयार करत असतात. फलंदाजी करताना संघाचा कर्णधार जेंव्हा हे समजतो कि, आपल्या संघाने एकूण विशाल score तयार केले आहे,त्यावेळी तो त्याच्या डावाची समाप्तीची घोषणा करू शकतो. डावाच्या समाप्तीची घोषणानंतर १० min मध्ये दुसऱ्या संघाची फलंदाजी सुरु होते. एकावेळी डाव घोषित केला असताना कर्णधार त्याचा निर्णय बदलू शकत नाही.

मैदान ,हवामान आणि प्रकाश (Ground ,Weather,Light )
क्रिकेट सामन्याच्यावेळी मैदान खेळाला अनुकूल, स्वच्छता, हवामान साफ असणे इ .अनेक गोष्टी दोन्ही umpire आणि दोन्ही संघाचे कर्णधार आपापसांत एकत्र येऊन निर्णय घेतात. हवामान आणि प्रकाशाच्या खराब परिस्तिथीमध्ये काही फेरबदल केला जातो. पावसामुळॆ खेळसुद्धा थांबवला जातो.

हे पण वाचा- कबड्डी खेळाविषयी माहिती