बॅडमिंटन एक लोकप्रिय खेळ

Badminton Is a very popular sprots in world.बॅडमिंटन एक लोकप्रिय खेळ आहे . तो संपूर्ण परिवारासोबत सहजपणे खेळला जाऊ शकतो. शाळा,महाविद्यालय , क्लब,हॉटेल,आणि सार्वजनिक ठिकाणी खेळणाऱ्या लोकांसाठी हा एक मनोरंजनाचा आणि रोमांचकारी खेळ आहे.
बॅडमिंटन एक लोकप्रिय खेळ|Badminton a Popular Sports
- 1) बॅडमिंटनची ऐतिहासिक पार्श्वभूमी
- 2) खेळ
- 3) कोर्ट मैदान
- 4) जाळी
- 5) रॅकेट
- 6)शटल
- 7) पोशाख
- 8)रेफरी आणि लाईनमन
- 9)सर्व्हिस
- 10)foul
- बॅडमिंटनची ऐतिहासिक पार्श्वभूमी
बॅडमिंटन हा लोकप्रिय खेळ इंग्लंड या देशाची देणगी आहे.असे मानले जाते. ‘पुना ‘किंवा ‘बॅटलडोअर ‘ या नावाने हा खेळ इंग्लड मध्ये खेळला जातो. पुना याचा अर्थ शटलकॉक . इंग्लंडच्या सेना अधिकाऱ्याला हा खेळ खूप आवडत असे. पाहता पाहता हा खेळ सर्व देशामध्ये लोकप्रिय होत गेला.भारतात याची सुरुवात इंग्रजांनी केली. हा खेळ केवळ उच्च अधिकारी वेळ घालवण्यासाठी व आपली आवड पूर्ण करण्यासाठी करत. परंतु आज सात आठ वर्षाचा मुलगा पण बॅडमिंटन खेळून आपली आवड पूर्ण करतो.’संघटन व असोसिएशन ऑफ इंग्लड‘ नावाच्या संस्थेने सर्वप्रथम या खेळावर नियंत्रण व नियमावली तयार केली. या संस्थेची स्थापना सर्वप्रथम १८९३ मध्ये झाली.१८९३ मध्ये झाली. भारतामध्ये नवव्या आशियाई खेळानंतर हा खेळ खूप लोकप्रिय झाला.
2)खेळ
बॅडमिंटन हा खेळ लोकप्रिय खेळ आहेआणि चार व्यक्तीमध्ये खेळला जातो. हा खेळ पुरुष आणि महिला दोन्ही वर्गाकडून खेळला जातो. दोन खेळादूद्वारे खेळला जाणारा खेळ सिंगल (single ) आणि चार खेळादूद्वारे खेळला जाणारा खेळ डबल्स (Doubles )असे संबोधले जाते.यामध्ये प्रत्येक संघात दोन दोन खेळाडू असतात .बॅडमिंटन खेळण्याकरिता एक जाळीदार बॅट ज्याला रॅकेट असे म्हणतात.रॅकेट मारण्यासाठी पंखाखाली शटल ची आवश्यकता असते.जिच्या सहाय्यतेने बॅडमिंटन शटलला विरोधी खेळाकडून मारले जाते. दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये एक जाळी बांधली जाते. खेळाची मुख्य अट म्हणजे शटल जमिनीवर पडला नाही पाहिजे. आणि नेटलाही नाही लागले पाहिजे. जर असे झाले तर एक गुण विरोधकाला मिळतो. अशा प्रकारे शटल रॅकेटच्या या बॅडमिंटन खेळामध्ये ज्या संघाचे जास्त गुण होतात तोच संघ विजेता घोषित केला.
3) कोर्ट (Court )
बॅडमिंटन खेळाच्या मैदानाला कोर्ट (Court )असे म्हणतात. कोर्टचा पृष्ठभाग लाकडी असतो. कोर्ट आयताकृती असून ते पृष्ठभागावर ठळकपणे दृष्टीस पडतील असे रंगीत आखावे. प्रत्येकरेषा ४० मिलिलिटर इंच रुंदीची असते. एकेरी खेळासाठी कोर्टची लांबी १३. ४० मीटर असून रुंदी ५. १८ मीटर असते. दुहेरी खेळासाठी कोर्टची लम्बी ४४ फूट असून रुंदी २०फूट असते. एका मध्यरेषेने कोर्टचे दोन भाग केले जातात. त्या मध्यरेषेवर जाळी बांधली जाते. प्रत्येक कोर्टच्या अंतिम रेषा एकेरी खेळासाठी कमाल सर्व्हिस मर्यादा रेषा मानली जाते. त्याच प्रमाणे जाळीपासुन १. ९८ मीटर अंतरावर आणि जाळ्यावर अशी किमान सर्व्हिस मर्यादा रेषा आखली जाते. या किमान सर्व्हिस मर्यादा रेषा च्या दरम्यान असलेल्या ४. ७२ मीटर लांब याला सर्व्हिस क्षेत्र असे म्हणतात. कोर्टवरील छत कमीत कमी ९ मीटर उंच असणे आवश्यक आहे .
4)जाळी (Net )
बॅडमिंटन कोर्टच्या मध्यभागी जाळी (Net )बांधली जाते. जाळीची रुंदी ०. ७६ मीटर असते. तर लांबी पूर्ण मैदानावरील दोन खांबाच्या अंतराएवढे म्हणजे २० ते २२ फूट असावी. जाळी ताणून बांधल्यानंतर त्याची मध्यावर उंची ५ फूट आणि दोन खांबाजवळ उंची ५. फूट असावी. जाळीच्या वरच्या बाजूस ३ इंच रुंदीची पांढऱ्या रंगाची पट्टी असते. जाळीच्या मधले छिद्र व चौकोन कमीत कमी १५ मिलीमीटर आणि जास्तीत जास्त २० मिलीमीटर रुंद असावेत
5)रॅकेट (Racket )
बॅडमिंटन रॅकेटची रुंदी जास्तीजास्त २३० मी. मी. असते. रुंदी २०मी.मी. असते. रॅकेट ची लांबी ६८०मी.मी. आणि गॅटींगच्या भागाची लांबी २७मी.मी. असते अश्या प्रकारे रॅकेट चे वजन कमीतकमी असते.
6)शटल (Shuttle )
बॅडमिंटन खेळण्यासाठी वापरण्यात येणारे शटल सिंथेटिक सामग्रीपासून बनवले जाते. शटल बुचच्या तुकड्याला १६ पिसे जोडलेले असतात. बुचाच्या तुकड्याचा व्यास २५ मिलीमीटर ते २८मिलीमीटर असावा. पिसांची unchi ६४ मिलीमीटर ते ७० मिलीमीटर याच्या दरम्यान असावी. खालच्या बाजूला दोरीने बांधलेली असतात. आणि वरच्या बाजूला फुलांप्रमाणे पसरलेले असतात. त्याचा व्यास किमान ५८ मिलीमीटर ते ६८ मिलीमीटर च्या दरम्यान आणि शटलचे वजन कमीतकमी ४. ०३ ग्रॅम ते जास्तीतजास्त ५. ५० ग्रॅम इतके असते.
7)पोशाख (Uniform )
बॅडमिंटन कोर्टवर बॅडमिंटन खेळण्यासाठी कपडे आरामदायी असावे. त्यामुळे हालचाली, विविध क्रिया आरामात करू शकेल. या करिता बॅडमिंटन खेळणारे पुरुष खेळाडू टी शर्ट , हलके बूट आणि पांढरे सॉक्स घालतात . स्त्रिया स्कर्ट आणि ब्लॉउज किंवा टी शर्ट, हलके बूट , पांढरे सॉक्स घालतात.
8)रेफरी आणि लाईनमन
बॅडमिंटन खेळाला व्यवस्थित रूपाने चालवण्यासाठी एक रेफरी सोबत दोन लाईनमन असतात. रेफरीचा निर्णय हा अंतिम असतो. आणि तो सर्वाना मान्य करावा लागतो. एखादा खेळाडू एखाद्या मतभेदाच्या स्थितीमध्ये अपील करतो तेंव्हा रेफरीला पुढच्या सर्व्हिसच्या अगोदर आपला निर्णय द्यावा लागतो.
9)सर्व्हिस (Service )
जो खेळाडू किंवा संघ टॉस जिंकतो तो संघ सर्व्हिस तसेच दिशेची निवड करतो जेंव्हा एक खेळाडू दुसरीकडे उभ्या खेळाडूंकडे शटल मारतो तेंव्हा ती सर्व्हिस मानली जाते. कोणताही खेळाडू उजव्या किंवा डाव्या कोणत्याही क्षेत्रातून सर्व्हिस करू शकतो. सर्व्हिस एकाच वेळी केली जावी ज्यावेळी समोरचा खेळाडू तयार आहे.
सर्व्हिस बरोबर करण्याकरिता खालील गोष्टी लक्षात ठेवणे महत्वाचे असते.
१. सर्व्हिस करणाऱ्या खेळाडूने तो पर्यंत सर्व्हिस करू नये , जो पर्यंत दुसरीकडे उभा खेळाडू सर्व्हिस करण्यासाठी तयार नसेल.
२.सर्व्हिस करताना खेळाडूने त्याच्या सर्व्हिस कोर्टाच्या उजव्या किंवा डाव्या बाजूनेच सर्व्हिस करावी.
३. या गोष्टीकडे लक्ष ठेवले पाहिजे कि शटल खेळाडूच्या कंबरेच्या खाली रॅकेटला लागते कि नाही.
४.सर्व्हिस नेहमी अंडर आर्म केली जावी.
५.जोपर्यंत सर्व्हिस होत नाही तो पर्यंत खेळाडूने आपल्या दोन्ही पायांवर स्थिर उभे राहिले पाहिजे.
६.कोणत्याही खेळाडूच्या मनात सर्व्हिस देण्याच्या अगोदर किंवा सर्व्हिस देताना विरोधी खेळाडूला कोणत्याही प्रकारचा धोका देण्याची इच्छा नसावी.
७.सर्व्हिस वेळी शटल तिरपे जातीवरून विरोधी खेळाडू अथवा संघाच्या कार्टमधे मारावे
Fouls
बॅडमिंटन खेळात सर्व्हिस चे महत्व पूर्ण कार्य मानले जाते. सर्व्हिस करताना सर्व्हिस पक्षाच्या खेळाडूचे पाय ठीक अर्ध्या क्षेत्रात नसावे.
सर्व्हिस करताना शटल सर्व्हिस करणाऱ्याच्या कंबरेच्या वर गेली नाही पाहिजे.सर्व्हिस केल्यानंतर शटल चुकीच्या अर्ध्या क्षेत्रात पडते किंवा छोट्या सर्विस रेषेपर्यंत लांब सर्व्हिस रेषेच्या पुढे जाऊन पडते.बॅडमिंटन एक लोकप्रिय खेळ सर्वत्र आवडीने खेळला जातो