All Information about Wrestlling कुस्ती विषयी सर्व माहिती

कुस्ती विषयी सर्व माहिती मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत

All Information about Wrestlling कुस्ती विषयी सर्व माहिती

प्राचीन परंपरा लाभलेल्या कुस्ती खेळाने इतर खेळांपेक्षा आपले वेगळेपण जतन करून ठेवले आहे. जगातील बहुतेक सर्वच देशांत कुस्ती हा खेळ वेगवेगळ्या स्वरूपात खेळला जातो. आधुनिक काळात ‘फिला’ सारख्या जागतिक कुस्ती संघटनेने कुस्तीच्या आंतरराष्ट्रीय स्वरूपाला नियमबद्ध करून एकरूप करण्याचा प्रयत्न केला. आधुनिक कुस्ती हा जागतिक स्तरावर एका निश्चित तंत्राने व विशिष्ट नियमांनी खेळवली जाते. बालउपासनेसाठी कुस्ती खेळाला प्राचीन काळापासून महत्व प्राप्त झाले आहे. निरोगी शरीर हे मानसिक स्वास्थ्यासाठी पायाभूत मानले जाते. शास्त्रीय दृष्टिकोनातून व्यक्ती च्या सर्वांगीण विकासासाठी कुस्ती हा खेळ महत्वपूर्ण ठरतो.

कुस्तीची ऐतिहासिक पार्श्वभूमी (Historical Background Of Wrestling)

आदिमानव काळात पशूंसोबत झालेला संघर्ष कुस्ती खेळाचा प्रारंभ असल्याचे मानले जाते. खेळ म्हणून नव्हे तर गरजेचे रूपांतर पुढे कुस्ती खेळात झाले. जागतिक दृष्टिकोनातून विचार केल्यास जगातील सर्वच प्राचीन सांस्कृतिक जगाच्या विविध प्रांतातील प्राचीन शिळा, चित्रकला, महाकाव्य या माध्यमातून प्राचीन कुस्तीने पारंपरिक स्वरूप लक्षात येते. भारताप्रमाणे इतर प्राचीन संस्कृतीत कुस्तीचे वर्णन आढळते. कुस्तीगीरांनी त्याकाळी समाजात विशिष्ट स्थान होते. तेंव्हा सर्वसामान्य जगात सर्वत्र कुस्ती खेळली जात असे असा उल्लेख आढळतो. ग्रीक संस्कृतीत कुस्ती बरीचशी प्रसिद्ध झाली होती. मात्र या काळातील कुस्तीचे स्वरुप काहीसे क्रूर असल्याचे दिसते. ग्रीस संस्कृतीचा ऱ्हास झाल्यानंतर रोमन संस्कृतीत उदयाला आली. रोमन लोकांनी ऑलिम्पिक खेळाचे पुनर्जीवन करून त्यांचे संघटन अधिक नियमबद्ध केले. ग्रीस कुस्तीमधील बरेच दुखापत करणारे डावपेच नियमबाह्य ठरून कुस्ती जास्त कौशल्यपूर्ण बनवली.

शाहू महाराजांचा कालखंड हा आधुनिक भारतीय कुस्ती परंपरेसाठी सुवर्ण युग ठरला आहे. शाहू महाराज हे निष्ठावंत बलोपासक होते. त्यांनी गावोगावी आखाडे -तालमी स्थापन करण्यास सढळ हाताने मदत केली. शाहू महाराज केवळ मदत करण्यास किंवा मैदान भरविण्यास उत्सुक नव्हते,तर ते कुस्तीच्या मैदानात स्वतःहजर राहत असे. कुस्तीच्या विकासाची विचारपूर्वक दहा कलमी योजना शाहू महाराजांनी आखली व ती पद्धतशीरपणे कार्यवाहीत आणली. त्यामुळे कोल्हापूर हे मलल विद्यचे माहेरघर बनले. कुस्तीसाठी कोल्हापूर मध्ये भव्य मैदान महाराजांनी बांधले. कुस्तीगिरांबाबत त्यांच्याइतके कल्याणकारी धोरण दुसऱ्या कोणत्या राजाने राबविल्याचे आढळत नाही. कुस्ती क्षेत्रात सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांचे धोरण होते.

कुस्ती खेळाचे पारंपरिक रूप काळाप्रमाणे बदलत असल्याचे दिसते.मात्र प्राचीन काळापासुन कुस्तीचा मुख्य गाभा, शक्ती व युती यांचा सुरेख संगम हाच राहिला आहे. प्रदीर्घ ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या या खेळास आधुनिक काळात मोठया प्रमाणात बदल झाला आहे. पूर्वी तासनतास चालणारी कुस्ती आज सहा मिनिटांवर आली आहे. पूर्वी स्त्रियांना बघण्यासाठी बंदी असलेली कुस्ती आज स्त्रियात खेळवली जाते. आजच्या या महिलाच्या कुस्तीगिरांच्या तोडीस तोड महिला कुस्तीगीर औरंगाबाद शहरानजीकच्या हर्सूल या गावी १८७६ला जन्मलेल्या सखुबाई सुरे नावाच्या स्त्रीने महिलेशीच कुस्ती न खेळता पुरुषाशी सुद्धा कुस्ती खेळल्याचा दाखला आहे. आज आधुनिक मॅटवरील कुस्तीत फ्री style व ग्रीकोरोमन style या दोन प्रकारात स्पर्धा घेण्यात येतात. आधुनिक कुस्ती वेगवान आहे. वेळेत चितपट झाली नाही तर गुणांच्या आधारे बचावात्मक खेळ करत असेल किंवा खेळात कुचराई करत असेल तर त्यास ताकीद गुण दिला जातो.म्हणून आज कुस्ती केवळ ताकदीचा खेळ राहिला नसून चांगली शक्ती,वेग तंत्रशुद्धता व झटपट निर्णय घेण्याची क्षमता त्यास अंतर्भुत असाव्या लागतात.

कुस्ती प्रकार(Types Of Wrestling)

आधुनिक कुस्तीला फ्री style,ग्रीकोरोमन style असे दोन प्रकार आहेत. फ्री style कुस्तीमध्ये हात आणि पाय चा उपयोग करून विरोधी प्रतिस्पर्ध्यावर डाव प्रतिडाव करून गुणांवर किंवा चितपट विजय प्राप्त करायचा असतो तर ग्रीकरोमन कुस्ती खेळताना कमरेच्या वरील भागाचा उपयोग करून प्रतिस्पर्ध्यावर डाव प्रतिडाव करून विजय प्राप्त करायचा असतो. विशेष म्हणजे या कुस्तीत कमरेच्या खालील भागाचा (पायांचा) उपयोग डावासाठी किंवा प्रतिडावासाठी करायचा नसतो ते नियमबाहय असते.

वयोगट आणि वजन गट(Age Group & Weight Group)

आधुनिक कुस्ती विविध वयोगटात आणि वजन गटात खेळला जाते.ते पुढीलप्रमाणे

१४ वर्षे आतील मुले१७ वर्षे आतील मुले१९ वर्षे आतील मुली १९ वर्षे आतील मुलेप्रौढ गट पुरुषप्रौढ गट महिला१६ वर्ष खालील ग्रामीण मुले 
32 Kg
35 Kg
38 Kg
41 Kg
45 Kg
49 Kg
55 Kg
42 Kg
46 Kg
50 Kg
54 Kg
58 Kg
63 Kg
69 Kg
75 Kg
85 Kg
100 Kg
42 Kg
46 Kg
50 Kg
55 Kg
60 Kg
66 Kg
74 Kg
76 Kg
96 Kg
120 Kg
44 Kg
48 Kg
51 Kg
55 Kg
59 Kg
63 Kg
67 Kg
84 Kg
55 Kg
60 Kg
66 Kg
74 Kg
84 Kg
96 Kg
120 Kg
48 Kg
51 Kg
55 Kg
59 Kg
63 Kg
67 Kg
72 Kg
38 Kg
40 Kg
42 Kg
45 Kg
48 Kg

All Information about Wrestlling कुस्ती विषयी सर्व माहिती

गणवेश/पोशाख (uniform)

कुस्तीगीराला स्पर्धेत कुस्ती खेळण्यासाठी विशिष्ट गणवेशाची आवश्यकता असते.ते प्रमुखयाने कॉस्ट्यूम व शुज आहेत. कॉस्ट्यूम हा लाल आणि निळ्या रंगाचा असे दोन्ही असावेत.कुस्तीगीराने घोट्यापर्यंत बंद असतील,असे खास कुस्तीसाठी तयार केलेले बूट वापरावे.

कुस्ती मॅट (Wrestling Mat)

कुस्ती स्पर्धा घेण्यासाठी विशिष्ट रबरफोमची आंतरराष्ट्रीय बनावटीची कुस्ती मॅट असते. तिची लांबी व रुंदी १२ x १२ मीटर असते. मॅटची जाडी जवळपास ८ ते ते १० सेमी असावी मॅट जमिनीपासून १.१० मीटर उंचीवर लावावी. मॅट च्या बाजूला कमीत कमी २ मीटर जागा मोकळी असावी.

पंच (Referee)

कुस्ती स्पर्धेसाठी पुढील प्रकारच्या पंचाची आवश्यकता असते. एक आखाडाप्रमुख,एक सरपंच, एक साईड पंच , एक वेळाधिकारी आणि एक मॅट कंट्रोलर अशा प्रकारे पाच पंचाची आवश्यकता असते.

कुस्तीची वेळ (Timing Of The Wrestling)

प्रौढ पुरुष,महिला आणि १९ वर्षातील मुले व मुली गटाच्या कुस्तीचा कालावधी २ मिनिटाच्या ३ फेऱ्या असतात. प्रत्यके फेरीनंतर ३० सेकंदाची विश्रांती राहील. प्रत्येक फेरीच्या शेवटी त्या फेरीचा विजेता घोषित केला जातो. तीन फेऱ्यांत विजयी होणाऱ्यास कुस्तीचा विजेता घोषित केला जातो. कोणत्याही फेरीत कुस्ती चितपट झाल्याने कुस्ती थांबवली जाते. शालेय १४ ते १७ वर्ष गटासाठी कुस्तीची वेळ १. ३० मिनिटांच्या ३ फेऱ्या असतात व प्रत्यक फेरीनंतर ३० सेकंदाची विश्रांती राहील. बाकी सर्व नियम वरीलप्रमाणे असतात.

कुस्तीची सुरुवात (Starting Of Wrestling)

कुस्ती स्पर्धेसाठी नवे पुकारलेल्या खेळाडूंनी सुचवलेला लाल किंवा निळा कॉस्ट्यूम घालून निर्देशित कोपऱ्यात उभे राहावे. त्यानंतर दोन्ही कुस्तीगीर मॅटच्या मध्यात येऊन हस्तांदोलन करतील व सरपंचानी शिटी वाजविताच कुस्तीला सुरुवात होते.

कुस्तीचा शेवट (End Of The Wrestling)

कोणत्याही फेरीत कुस्ती चितपट झाल्यास कुस्ती थांबवली जाते. तसेच कुस्ती चितपट न झाल्यास तीन फेऱ्यांपैकी दोन फेऱ्यात विजयी होणाऱ्या कुस्तीगिरास कुस्तीचा विजेता घोषित केला जातो. कुस्तीच्या एका फेरीतील विजयासाठी गुणाधिक्य ज्याचे गुण त्यास विजयी घोषित करावे.

कुस्ती विजयाचे प्रकार पुढीलप्रमाणे-

१) चितपट
२) तीन फेऱ्यांपैकी दोनफेऱ्या विजयी होणाऱ्या
३) दुखापत , निवृत्ती , चूक
४) प्रतिस्पर्धी बाद किंवा गैरहजर राहिल्यास

मूल्यमापन आणि गुण (Evalation and Point)

कुस्तीगीरांनी कुस्ती खेळताना पुढील स्थितीत एक गुण दिला जातो.

एक गुण

  • कुस्तीगीराने डाव करून पाठीवर गेल्यानंतर प्रतिस्पर्ध्याला खाली मॅटवर धरून आणून नियंत्रण मिळवले तर एक गुण दिला जातो.दोन्ही हात किंवा दोन्ही पायांचे गुडघे या चार भागांपैकी कोणतेही तीन भाग मॅटवर टेकविले असतील, त्यावेळी ताबा असल्याचे मानले जाते व एक गुण दिला जातो.
  • कुस्तीगीराने उभ्या स्थितीत किंवा बैठया स्थितीत योग्य डाव केला असेल , परंतु त्यास धोकादायक स्थितीत नेले नसेल तरी एक गुण दिला जातो.
  • प्रतिस्पर्ध्याच्या नियंत्रणातून सुटून त्याच्या पाठीमागे जाऊन त्यावर नियंत्रण मिळवले तर एक गुण मिळतो.
  • प्रतिस्पर्धी कुस्तीगिरास जेंव्हा मॅटवर चितपट करण्यासाठी समोरून दाबतो,तेंव्हा त्याचे दोन्ही किंवा एक हात सरळ मॅटवर ताणले असतील व पाठ मॅटकडे असेल तर एक गुण दिला जातो.
  • प्रतिस्पर्धी कुस्तीगीर पकड करण्यापासून नियमबाह्य रोखून धरीत असेल, परंतु तरीसुद्धा पकड करण्यास कुस्तीगीर यशस्वी झाल्यास एक गुण दिला जातो.
  • एखाद्या कुस्तीगीराने उभ्या स्थितीत आपला एक पाय संरक्षण क्षेत्रामध्ये ठेवल्यास त्याच्या प्रतिस्पर्ध्याला एक गुण मिळेल.
  • प्रतिस्पर्ध्यास धोकादायक स्थितीत पाच सेकंद दाबून धरले असेल तर एक गुण दिला जातो.
  • सद्यस्थिती चालू असल्याप्रमाणे उभ्या अथवा बैठ्या स्थितीत मॅटवरून बाहेर पळणे अथवा डावातून बाहेर पळणाऱ्या कुस्तीगीरांच्या प्रतिस्पर्ध्याला एक गुण दिला जातो.
  • क्लिकच्या सुरुवातीस जो कुस्तीगीर चूक करीत असल्यास प्रथम सांगितल्यानंतर परत चूक केल्यास एक गुण दिला जातो

दोन गुण

कुस्तीगिरांना कुस्ती खेळताना पुढील स्थितीत दोन गुण दिले जातात.

  • बैठ्या स्थितीत कुस्तीगीर असताना योग्य डाव करून प्रतिस्पर्ध्यास धोकादायक स्थितीत नेतो, हि धोकादायक स्थिती चितपटासारखी, परंतु हि तत्कालीन असते. तेंव्हा दोन गुण दिले जातात.
  • प्रतिस्पर्धी कुस्तीगिरास दोन खांद्यावर फिरवले जाते, तेंव्हा दोन गुण दिले जातात.
  • आक्रमक कुस्तीगीराने प्रतिस्पर्ध्यास पकड करून धोकादायक शरीर स्थितीत नेले तर तो त्या पकडीतून उडी मारून मॅटच्या बाहेर गेला, तर आक्रमक कुस्तीगिरास दोन गुण मिळतात.
  • आक्रमण करणाऱ्या कुस्तीगिरास त्याने करीत असलेला डाव पूर्ण करण्यात नियम बाह्य पकडून प्रतिबंध केल्यास दोन गुण दिले जातात.
  • आक्रमण करणारा कुस्तीगीर डाव करत असताना स्वतः धोकादायक स्थितीत किंवा दोन्ही खांदे क्षणभर मॅटवर टेकले असतील तेंव्हा बचाव करणाऱ्या कुस्तीगिरास दोन गुण मिळतात.
  • जो कुस्तीगीर आपल्या प्रतिस्पर्ध्यास खड्या स्थितीत डाव करण्यास प्रतिबंध करीत असेल व आक्रमक कुस्तिगीरच धोकादायक स्थितीत गेल्यास बचाव करणाऱ्या कुस्तीगिरास दोन गुण दिले जातात.
  • उभ्या अथवा बैठ्या स्थितीत मॅटवरुन बाहेर पळणे अथवा डावातून बाहेर पळणाऱ्या कुस्तीगिराच्या प्रतिस्पर्ध्यास परिस्थितीप्रमाणे एक अथवा दोन गुण दिले जातात.

तीन गुण

कुस्तीगिरांना कुस्ती खेळताना पुढील स्थितीत तीन गुण दिले जातात.

  • कुस्तीगीर उभ्या स्थतीतुन डाव करून प्रतिस्पर्ध्यास मॅटवर धोकादायक स्थितीत टाकले तेंव्हा तीन गुण मिळतात.
  • प्रतिस्पर्ध्यास बैठ्या स्थितीतून कोणताही डाव वापरून थोडे उचलून आपला एक किंवा दोन्ही गुडघे स्वतः मॅटवर टेकवून ताबडतोब त्यास मॅटवर धोकादायक स्थितीत नेतो, तेंव्हा डाव करणाऱ्या कुस्तीगिरास तीन गुण मिळतात.
  • डाव करीत असताना जर बचाव करणाऱ्या कुस्तीगीराचा मॅटशी एका हाताने संबंध असेल, परंतु ताबडतोब धोकादायक स्थितीत गेल्यास आक्रमण करणाऱ्या कुस्तीगिरास तीन गुण मिळतात, उच्च डाव हवेतून अर्धवर्तुळ करून प्रतिस्पर्धी धोकादायक स्थितीत गेला नाही तरी आक्रमण करणाऱ्या कुस्तीगिरास तीन गुण मिळतात.
  • जो कुस्तीगीर एका फेरीत तीन गुणांच्या दोन पकडी करील,त्यास फेरीचा विजेता घोषित केले जाते. पूर्वीच्या गुणांचा विचार केला जात नाही.

पाच गुण

कुस्तीगिरांना कुस्ती खेळताना पुढील स्थितीत पाच गुण दिले जातात.

  • उच्च कौशल्यपूर्ण डावाचा उपयोग कुस्ती उभ्या स्थितीत असताना डाव करून प्रतिस्पर्ध्यास धोक्याच्या स्थितीमध्ये नेल्यास आक्रमक खेळाडूस पाच गुण दिले जाते.
  • प्रतिस्पर्ध्यास बैठया स्थितीतून उचलून कौशल्य वापरून तत्काळ प्रतिस्पर्ध्यास धोक्याच्या शरीर स्थितीमध्ये नेल्यास आक्रमक खेळाडूस चितपटाचे गुण दिले जातात.
  • ज्या कुस्तीगीराने उच्च कलात्मक डाव करून एका वेळी पाच गुण मिळविले असतील,त्यास फेरीचा विजेता घोषित करतात.

कुस्तीच्या विविध परिस्थितीत एक,दोन,तीन व पाच कुस्तीगिरांना दिले जातात, असेच एका फेरीत दोन वेळेस तीन गुण घेणारा,एकदा पाच गुण घेणारा, दोघाच्या गुणातील फरक सहा अथवा सहापेक्षा जास्त झाल्यास जादा गुण असलेल्या कुस्तीगीराला फेरीचा विजेता घोषित करतात.

चितपट

बचाव करणाऱ्या कुस्तीगिराचे दोन्ही खांदे आक्रमण करणाऱ्या कुस्तीगीराने एकाच वेळी मॅटवर टेकविले असतील व त्या नियंत्रित चितपट शरीर स्थितीचे निरीक्षण करण्यास पुरेसा अवधी सरपंचास मिळाला असेल तर अशा स्थितीतील नवीन हालचाल देखील चितपट म्हणून ग्राहय धरलं जाते. मॅटच्या कडेवरील कुस्ती चितपट ठरवण्यासाठी चीत होणाऱ्या खेळाडूचे डोके व खांदे निष्क्रिय पट्ट्याच्या मर्यादा रेषेच्या आत असलेल्या पाहिजे. चितपट कोणत्याही फेरीत झाल्यास तेथे कुस्ती संपेल. त्या कुस्तीच्या फेऱ्यांमधील विजयाचा विचार केला जात नाही.

क्लिंच नियम (Clinch Rule)

अपवादात्मक परिस्थितीत दोन मिनिटांचा कालावधी संपल्यानंतरही गुण ०-० असल्यास दोन मिनिटांची निर्धारित वेळ संपल्यानंतर क्लिंचची स्थिती दिली जाते. क्लिंचची पकड प्रथम कोणी करावयाची यासाठी सरपंच नाणेफेक करतील. क्लिंच जास्तीत जास्त ३० सेकंद चालेल. क्लिंचच्या ३० सेकंदातही डाव न झाल्यास,क्लिंचधरण्यास ज्यास प्रथम संधी दिली आहे. त्याच्या विरोधात एक गुण दिला जातो.

ग्रीकरोमन कुस्तीमध्ये क्लिंच
या कुस्तीत क्लिंच धरताना दोन्ही कुस्तीगिरांना मध्यभागीच्या वर्तुळात पाय घेतील, असे उभे करावे. त्यांची छातीस छाती लागलेली असावी. नाणेफेक जिंकणारा स्पर्धक प्रथम क्लिंचची पकड करेल आणि सरपंचाच्या शिटीनंतर डाव करेल, अशा वेळेस त्याच्या प्रतिस्पर्ध्याने क्लिंचधरली नसली तरी चालेल.

फ्री style कुस्तीमध्ये क्लिंच
या कुस्तीत क्लिंचची पकड वेगळ्या प्रकारची असेल नाणेफेक हरणारा स्पर्धक उभ्या स्थितीत उभा राहील. त्याच्या एका पायाची पकड नाणेफेक जिंकणारा स्पर्धक करेल. नाणेफेक हरणारा स्पर्धक त्याचे दोन्ही हात प्रतिस्पर्ध्याच्या पाठीवर ठेवेल. सरपंचाने शिट्टी वाजविल्यावरच कुस्ती सुरु होईल. हि क्लिंच सुद्धा दोन मिनिटांच्या निर्धारित वेळेनंतर दोघांनाही ०-० गुण असल्यानंतर दिली जाईल. हि क्लिंच ची स्थिती ३० सेकंदापर्यंत चालेल.

व्हॉलीबॉल ची माहिती जाणून घ्या

टेबल टेनिस ची माहिती जाणून घ्या