Aglyaveglya Mhani|आगळ्यावेगळ्या म्हणी

Aglyaveglya Mhani|आगळ्यावेगळ्या म्हणी

1.अंग मेहनतीचे काम,तेणे मिळे आराम

2.आंधळी पाण्याला गेली,घागर फोडून घरी आली

3.आंधळ्याने पांगळा वाहिला,पांगळ्याने मार्ग दाविला

4.अभ्यास करेल त्याची विद्या,जपेल त्याची लक्ष्मी

5.अरे चे उत्तर कारे,अहो चे उत्तर काहो

6.अपकीर्ती झाली जणी,तो अर्ध मेलामानी

7.अग अग म्हशी मला कुठे नेशी

8.अडला नारायण,धरी गाढवाचे पाय

9.अति तिथे माती

10.अति राग,भीक माग

11.असतील शिते तर जमतील भुते

12.असंगाशी संग म्हणजे प्राणाशी गाठ

13.अतिशहाणा त्याचा बैल रिकामा

14.असून अडचण,नसून खोळंबा

15.अघटित वार्ता,कोल्हा गेले तीर्था

16.असेल तेंव्हा सोहळे,नसेल तेंव्हा

17.अडजीभ खाये,पडजीभ वाट पाहे

18.आधी पोटोबा,मग विठोबा

19.आईचा हात, गोड लागे शिळाभात

20.आगीतून निघाला,फुफाट्यात पडला

21.आजा मेला,नातू झाला

22.आधी गुंतू नये आणि गुंतल्यावर कुंथु नये

23.आळशाला आजाराचे निमंत्रण

24.आधी देव,मग जेव

25.आप मेले,जग बुडाले

26.आपण हसतो लोकाला,शेमबुड आपल्या नाकाला

27.आपल्या तो बाळ्याद,दुसऱ्याचे ते कार्टे

28.आपला हात जगन्नाथ

29.आपलेच ओठ अन आपलेच दात

30.आपले ठेवायचे झाकून,दुसऱ्याचे पाहायचे वाकून

31.आपले ते गोजिरवाणे,दुसऱ्याचे ते लाजिरवाणं

32.आपले मन जिंका तो धन्य म्हणावा तिन्ही लोकी

33.आपले गणे,घोडा खाई दाणे

34.आयत्या बिळात नागोबा

35.आमंत्रण दिले साऱ्या गावा ,वादळ सुटले घरी जेवा

36.आयत्या पिठावर रेघोट्या

37.आयत खाऊ न लांडग्यांचा भाऊ

38.आल्यावर विपत्ती,कवे मैत्री आहे किती

39.आवड असली कि सवड मिळते

40.आवडीने केला नवरा,त्याच्या पायात भवरा

41.आई जेऊ घालीना,बाप भीक मागू देईना

42.आधा दूध,आधा पाणी,जादा डाले तो बेईमानी

43.आला चेव अन केला देव

44.अवघड जागी दुखणे अन जाईव वैद्य

45.इकडे आड तिकडे विहीर

46.ईश्वराची करणी,नारळात पाणी

47.उंदराचा जीव जातो ना मांजराचा खेळ होतो

48.उचलली जीभ अन लावली टाळ्याला

49.उघड्यापाशी नागडे गेले,सारीरात हिवाने मेले

50.उडाला तर कावळा अन बुडाला तर बेडूक

51.उतावळा नवरा,अन गुडघ्याला बाशिंग

52.उथळ पाण्याला,खळखळाट फार

53.उदयोगाचे घरी,रिद्धी सिद्धी पाणी भरी

54.ऊस गोड झाला म्हणून मुळासकट खाऊ नये

55.एक गाव बारा भानगडी

56.एक घाव दोन तुकडे,काम कारवे रोकडे

57.एकटा जीव सदाशिव

58.एक ना धड भाराभर चिंध्या

59.एकपट विद्या,दस पट गर्व

60.एका हाताने टाळी,कधी न वाजे कोण्या काळी

61.एकाची होळी तर दुसऱ्याची दिवाळी

62.एकाने करायचे,साऱ्यांनी भरायचे

63.एकादशी घरी शिवरात्र पाहून आली

64.एक सदैव पानाचे लक्षण,वाया जाऊ देऊ नये एकही क्षण

65.ऐकावे जनाचे,करावे मनाचे

66.ऐकून घेत नाही,त्याला काही सांगू नये काही

67.कठीण समय येता,कोण कामास येतो

68.कर गया दाढीवाला,पकडा गया मूछीवाला

69.कर नाही त्याला,डर कशाला

70.करावे तसे भरावे

71.करून करून भागाला,अन देव पूजेला लागला

72.कला कौशल्य ज्याचे हाती,त्याची होई जगात ख्याती

73.कसायाच्या घरी सण आणि शेळ्या मेंढ्यांचे मरण

74.कशात काय अन फाटक्यात पाय

75.कशी मागावी भीक तर तंबाखु खायला शिक

76.कहां राजा भोज,कहां गंगू तेली

77.कामा पुरता मामा,ताकापुरती आजी

78.काखेत कळसा,गावाला वळसा

79.कावळ्याच्या शापाने गायी मरत नाहीत

80.काळ आला होता पण वेळ आली नव्हती

81.काग बाई रोड,तर म्हणे गावाची ओढ

82.कुठेही गेले तरी पळसाला पाने तीनच

83.कुत्ता धोबीका,घर का न घाट का

84.कुत्र्याचे जिने,फजितीला काय उणे

85.कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ

86.केर डोळ्यात नि फुंकर कानात

87.कोकणात नारळ फुकट

88.कोणाच्या संगतीने काशी नि कोणाच्या संगतीने फाशी

89.कोणी निंदा कोणी वंदा,आमचा स्वहिताचा धंदा

90.कोणाच्या म्हशी,कोणाला उठाबशी

91.कोंबडे झाकले म्हणून तांबडे फुटायचे राहत नाही

92.खऱ्याचे खोटे लबाडाचे तोंड मोठे

93.खटपट करी,तोच पोट भरी

94.खऱ्याच दास नि खोट्याचा वस्ताद

95.खान तशी माती,गहू तशी रोटी

96.खाणे थोडे,मचमच फार

97.खाऊन पिऊन सुखी,हरिणाम मुखी

98.खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी

99.खायला फार भुईला भार

100.खाली मुंडी पातळधुंडी

101.गरज सरो वैद्य मरो

102.गरिबांचा वाली परमेश्वर

103.गर्जेल तो पडेल काय,बोलेल तो करेल काय

104.गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली

105.गाढवापुढे वाचली गीता,कालचा गोंधळ बरा होता

106.गाव करी ते राव न करी

107.गाढवास काय?गुळाची चव

108.गाड्या बरोबर नळ्याची जत्रा

109.गोगल गाय नि पोटात पाय

110.घटकेची फुरसत नाही दमडीची मिळकत नाही

111.घरात घन म्हणे बायको माझी गोरीपान

112.घरा सारखा गुण,सासू तशी सून

113.घर जळाल्यावर बोंब अन नाटक संपल्यावर सोंग

114.घर धन्याचे हाल अन फुकटयाचे वर गाल

115.घर नादार देवळी बिऱ्हाड

116.घरचे झाले थोडे अन व्याह्याने धाडले घोडे

117.घरात दांडगाई अन बाहेर कोरडे खाई

118.घरात नाही दाना अन म्हणे मला बाजीराव म्हणा

119.घरात नाही लोटा अन दिमाख मोठा

120.घरोब्याला घर खा अन हिशोबाला चोख रहा

121.घर पाहावे बांधून अन लग्न पाहावे करून

122.घाल पाणी कर कालच्यावानी

123.घेमणी डोरले अन तुहे माहे सरले

124.घोडी मेले ओझ्याने अन शिंगरू मेले हेलपाट्याने

125.चढणीस घोडा अन उतरणीस रेडा

126.चव ना ढव दडपून जेव

127.चकाकते ते अवघे सोने नसते

128.चावल्याशिवाय गिळत नाही,अनुभवल्याशिवाय कळत नाही

129.चित्त नाही थारी,बावन तिथे करी

130.चोरतो चोर अन वर शिरजोर

131.चोराची नाहीत चोराची हाताची लंगोटी

132.चोराच्या उलट्या बोंबा

133.चोराच्या सुटका अन सगळ्यांना फटका

134.चोराच्या मनात चांदणे

135.चोराला डसला विंचू तो करीन हूं का चू

136.चोर सोडून संन्याशाला फाशी

137.चोरीचा मामला हळूहळू बोंबला

138.छडी लगे छमछम,विद्या येई घमघम

139.जगनाथाचा भात सर्व जगभर पसरे हात

140.जावा तेथे दावा,सवती तेथे हेवा

141.जसे दान, तसे पुण्य

142.जात कळते पण मत कळत नाही

143.जातीची खावी लाथ पण परजातीचा खाऊ नये भात

144.ज्याची जळे त्याला कळे

145.ज्याची करावी कीव,तोच घेतो जीव

146.ज्याला नाही अक्कल,त्याची घरोघरी नक्कल

147.ज्याला नाही लाज त्याला पृथ्वीचे राज

148.जित्याची खोड मेल्यावाचून जात नाही

149.जिकडे गेली वांज तिकडे झाली सांज

150.जीव जावो पण जिलबी खाओ

151.जुनं ते सोनं

152.जुन्याला लाथा अन नव्याच्या चरणी माथा

153.जो बायकोशी भला,तो खाई दही काला

154.जो बोलण्यात बोलका, तो कृतित हलका

155.झाकली मूठ सव्वालाखाची,उघडली म्हणजे फुकाची

156.झोपला धोंडा,भुकेला कोंडा

157.झोपणा मांगे बिछाना,भूक न मांगे छबिना

158.ढवळ्या शेजारी बांधला पवळI बांधला वाण नाही पण गुण लागला

159.ढोकणाच्या संगे हिराही भंगे

160.तपकेल्यास बळ,वृक्ष लावल्यास फळ

161.तहान लागल्यावर विहिर खोदणे

162.तळहाताने सूर्य झाकत नाही

163.ताकापुरती आजी

164.ताकापुरते रामायण

165.ताकाला जाऊन भांडे लपवणे

166.तुझे माझे जमेना तुझ्या वाचून करमेना

167.तुझे राहूदे तिकडे माझे घे कडे

168.तुला न मला घाल कुत्र्याला.

169.तेल गेले तूप गेले हाती धोपटणे आले

140.तोंड चोपडा,मनात वाकडा

141.तोंड दाबून,बुक्यांचा मार

142.तोंडावर गोड मनात फोड

143.तोंडावर हांजी हांजी आणि मागे दगलबाजी

144.थोडे खाणे लज्जतीचे फार खाणे फजितीचे

145.थोरा घरचे शान त्या सर्वही देती मान

146.दमडीची कोंबडी,चार रुपयांचा मसाला

147.दात कोरल्याने पोट भरत नाही

148.दाम करी काम,बीबी करी सलाम

149.दिवसभर चरते,मंगळवार धरते

150.दिवसभर वाचली गीता,कालचा गोंधळ बरा होता

151.दिव्याखाली अंधार

152.दिवाळी दसरा हात पाय पसरा

153.दिसते तसे नसते म्हणून जग फसते

154.दिसतो मोठा अकलेचा तोटा

155.दिसायला भोळा मुद्दलावर डोळा

156.दुष्काळात तेरावा महिना

157.दुःख सांगावे मना,सुख सांगावे जना

158.दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिये

159.दुर्योधन कृष्णाच्या उशाशी अर्जुन बसे पायाशी

160.दुर्गुण आणि विपत्ती आळसापासन उत्पत्ती

161.दुधाची तहान ताकाने भागवणे

162.दुधात काल विते मीठ,हा स्वभाव नाही नीट

163.दुरून डोंगर साजरे

164.दुरून बगळा दिसतो साधा ,आत कपटाची बाधा

165.देखल्या देवा दंडवत

166.देव नाही देव्हारी,धुपाटणे उड्या मारी

167.देह देवळात,चित्त खेटरात

168.दे दान,सुटे गिऱ्हाण

169.देरे हरी,पलंगावरी

170.देव तारी त्याला कोण मारी

171.देश तसा वेष

172.दैव देते कर्म नेते

173.दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ

147.धटाई खाई मिठाई,गरीब खाई गचांड्या

148.धनगर बसला जेवाया,ताकाबरोबर शेवया

149.धरले तर चावते,सोडले तर पळते

150.न खात्या देवाला,नैवद्य फार

151.न पढा,न लिखा नाम विद्यसागर

152.न राहे बाज,न बजे बासरी

153.नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न

154.नकटे व्हावे पण धाकटे होऊ नये

155.नखभर सुख हातभर दुःख

156.नदीचे मूळ आणि ऋषींचे कुळ कधी पाहू नये

157.नमस्कार फुकाचा आशीर्वाद लाखाचा

158.नशीब लागले द्यायला पदर नाही घ्यायला

159.न कर्त्याचा वर शनिवार

160.नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे

161.न बोलता दुःख फार,बोलण्याने हलका भार

162.नाक दाबले कि तोंड उघडते

163.नाकापेक्षा मोती जड,सासूपेक्षा सून अवजड

164.नाकाच्या शेंड्याला जीभ पुरवणे

165.नाकापर्यंत पदर आणि वेशीपर्यंत नजर

166.नाचता येईना अंगण वाकडे

167.नाव मोठे लक्षण खोटे

168.नाव सगुणी पण करणी अवगुणी

169.रोज मरे त्याला कोण रडे

170.निंदकाचे घर असावे शेजारी

171.पाण्याची धाव समुद्राकडे,बायकांची धाव सोनाराकडे

172.पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही

173.पाण्यात राहून माशाशी वैर करून नये

174.पी हळद नी हो गोरी

175.पुढच्यास ठेच मागचा शहाणा

176.प्रकृती तितक्या विकृती

177.प्रसंग पडे बकतो गधे को कहे काका

178.फाटके नेसावे पण स्वतंत्र असावे

179.फुकटचे खाय त्याला स्वस्त महाग काय ?

180.बगल मे बच्चा गाव मै दिंडोरा

181.बसे तो फसे,फिरे तो चरे

182.बळी तो कान पिळी

183.बढाईला पुढे अन लढाईला मागे

184.बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर

185.बापसे बेटा सवाई

186.बायकोचा भाऊ लोण्याहून मऊ

187.बारा पिंपळावरचा मुंजा

188.बाराची माय खाटल्यावर जीव जाय

189.बुडत्याचे पाय डोहाकडे

190.बुडत्याला काडीचा आधार

191.बोलण्यात जोर अन कामात अंगचोर

192.बोलण्यात पट्ट रागू,कामाला आग लागू

193.भटाला दिली ओसरी,तो हात पाय पसरी

194.भित्या पाठी ब्रह्माराक्षस

195.भुकेले कोल्हे काकडीला राजी

196.मारावे परी कीर्ती रुपी उरावे

197.मन नाही स्थिरी,बहू तीर्थ करी

198.मान सांगावा जना अपमान सांगावा मना

199.मामाच्या घरी भाचा कारभारी

200.माय तसं लेकरू,गाय तसं वासरु

201.मिया बीबी राजी तो क्या करेगा काजी

202.मुह मै राम बगल मै छुरी

203.मुलाचे पाय पाळण्यात दिसतात

204.मूर्ख भांडती,वकील घरे बांधती

205.मेंढी जाते जीवानिशी,खाणारा म्हणतो वातड होती

206.मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही

207.यथा राजा तथा प्रजा

208.रात्र थोडी सोंगे फार

209.राजा बोले दाढी हाले

210.राम नाम जपणा,पराया माल अपना

211.रिकामा वाडी बोपले घडी

212.लबाडाचे निमंत्रण,जेवल्यावर खरे

213.लहान तोंडी मोठा घास

214.लाथ मारीन तिथे पाणी काढीन

215.लाज ना अब्रू,कशाला घाबरू

216.लातोन के भूत,बातों से नही मानते

217.लेकीला तूप साखर,सुनेला मीठ भाकर

218.लेकी बोले,सुने लागे

219.लोकसांगे ब्राह्मज्ञान,स्वतः कोरडे पाषाण

220.लंगडी गाय,वासरात शहाणी

221.वड्याचे तेल वांग्यावर काढणे

222.वराती मागून घोडे

223.विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर

224.वेड घेऊन पेडगावास जाणे

225.वेळ ना वखत अन कुत्रं चाललं भुकत

226.वेळीच जो जागे तो भीक न मागे

227.शहाण्याला एक बात,मुर्खाला सारी रात

228.शितावरून भाताची परीक्षा

229.शीर सलामत तो पगडी पचास

230.सगळा गाव मामाचा,एक नाही कामाचा

हे पण वाचा- पतीने पत्नीचे नाव घेण्याचे काही खास उखाणे

हे पण वाचा-नवरी साठी काही खास उखाणे