|लहान मुलांच्या आजारावर घरगुती उपचार
तर मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत मुलांच्या आजारावर घरगुती उपचार कर बरे करावे
मुलांच्या आजारावर घरगुती उपचार | लहान मुलांचा आणि आजार उपचार
Home Remedies for Children’s Illnesses|मुलांच्या आजारावर घरगुती उपचार

सर्दी
पाच वर्ष वयाच्या मुलाला वर्षातून सात आठ वेळा सर्दी होणे हि सामान्य बाब आहे. सर्वसाधारण पाने वातावरणात बदल झाल्यामुळे तसेच alergy असेल तर सर्दी होते. allergy मुळे होणारी सर्दी आठ दिवसातून अधिक काळ राहते,तर सर्वसाधारण सर्दी आठ दिवसाच्या आत जाते. नाकातून पाणी वाहणे,थोडा ताप येणे, घशात खवखव होणे, कधी कधी साधा खोकला येणे आणि खोकल्यासोबत उलटी होणे हि सर्दीची लक्षणे आहेत.
सर्दीवर उपचार
- पाण्यामध्ये आल्याचे तुकडे टाकून पाणी उकळावे. ते गाळून घेतल्यानंतर त्यात साखर मिसळून ते बाळाला पाजावे.
- उकळत्या पाण्यात चमचाभर जिरे टाकून ते थंड करून बाळाला पाजल्यास सर्दी कमी होते.
- एक चमचा हळद व पाव चमचा ओवा पाण्यामध्ये उकळावा.व तयार झालेला काढा मध घालून बाळाला पाजावा.
सर्दी – खोकला
- विषाणूंमुळे सर्दी व खोकला होतो.
- सर्दी मुळे नाक वाहणे, शिंका येणे व ताप हि लक्षणे आढळतात. सर्दीत जंतूंचा संसर्ग झाला कि पिवळा कफ पडतो. अशा वेळी डॉक्टर चा सल्ला घ्यावा.
- थोडीशीच सर्दी असेल तर औषधें देण्याची गरज नाही.
- बाळाच्या खोलीत आद्रता वाढवण्यासाठी मोठा टॉवेल पाण्यात भिजवून वाळत घाला. खोलीत आद्रता वाढल्यास सर्दी झालेल्या बाळाला आराम पडतो.
- दिवसभर घेईल तसे पातळ गरम पदार्थ त्याला द्या.त्यामुळे छातीतील कफ मोकळा होऊन बाहेर पडतो.
- बाळाला पाटीवर झोपवावे.
- नाक चोंदल्यास डॉक्टर नाकात टाकण्याचे औषध देतात.एक किंवा दोन थेंब दिवसातून टाका.
- सर्दी खोकल्यासोबत ताप असेल तर डॉक्टरांना दाखवा.
ताप
तापामुळे बाळ किरकिर करायला लागते व त्याची भूक मंदावते. ताप असताना बाळाला भरपूर पाणी पाजावे. बाळाला भूक लागल्यास रोजचे ताजे अन्न द्यायला हरकत नाही. ताप आल्यानंतर बाळाला कमीत कमी कपडे घालावेत तसेच साध्या पाण्याने अंग पायापासून डोक्यापर्यंत वारंवार पुसावे. अंग पुसण्यासाठी बर्फ वापरू नये त्यामुळे थंडी वाजून येण्याची शक्यता असते. साधे पाणी घेऊन उघड्या अंगावर शिंपडावे. हे पाणी थोडा वेळ राहू द्यावे. लगेच कोरडे करू नये. फक्त डोक्यावर किंवा पोटावर पाणी लावू नये.
- वातावरणातील उष्ण तापमान ३४-३५ डिग्री सेमी पेक्षा जास्त झाले कि लहान मुलांच्या शरीराचे तापमान वाढते व त्यांना ताप येतो. वातावरणातील उष्णता कमी झाली कि ताप उतरतो. अशा प्रकारचा ताप २-३ दिवसात कमी होतो.
- तापाबरोबर उलटी,जुलाब, जलद श्वासोच्वास इ.तक्रारी असल्यास डॉक्टरांना दाखवावे.
- सर्दी पडसे,गोवर ,कांजण्या, टॉन्सिल्स ,न्यूमोनिया,मेंदूची सूज अशा काही कारणांमुळे मुलांना ताप येऊ शकतो. अशा वेळी डॉक्टरांना दाखवावे.
- थोडा ताप असताना अंघोळ घालण्यास काही हरकत नाही. ताप जास्त असेल तर सध्या पाण्यात टॉवेल भिजवून बाळाचे संपूर्ण अंग पुसून काढावे. तापाबरोबर उलटी,झटके अशा तक्रारी असल्यास किंवा ४० सेमी पेक्षा ताप जास्त असताना अंघोळ न घालता स्पंजिंग करावे व डॉक्टरांना दाखवावे.
- थर्मामिटर चे तापमान खरे समजावे. हाताला गरम -थंड किती लागते, त्यापेक्षा ताप थर्मामीटरने मोजून पाहावा. सामान्यतः बाळाचे सामान्य तापमान ३७. ८ सेमी किंवा १००फॅ. असते.
- औषध दिल्यानंतर ताप उतरला की, बाळाच्या अंगावर ब्लॅंकेट घालू नका.अंगावर ब्लॅंकेट घातले तर ताप पुन्हा चढू शकतो.पूर्ण अंगाला स्पंजींग करावे,म्हणजे ताप उतरतो. न्यूमोनिया होईल असे समजू नये. फक्त कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या जातात. पण त्याच बरोबर पूर्ण शरीराला स्पंजींग करणे आवश्यक असते.
- नवजात बाळाला ताप असेल तर लगेच डॉक्टरांना सांगा.
- ६ महिन्याचा बाळाला ३८. ३ सेमी किंवा १०१ फॅ. एवढा किंवा यापेक्षा जास्त ताप असेल तर डॉक्टरांना दाखवा.
- एक वर्षाचे बाळ ताप,गुंगी,बडबडने , घाबरणे अशा तक्रारी नि त्रासला असेल तर डॉक्टरांना दाखवा.
- तीन वर्षाच्या आतील मुलांना काही खूप ताप चढतो व ताप वाढला कि त्याला झटके येतात. हात पाय झाडणे,दात खिळी बसणे, डोळे फिरवून बेशुद्ध पडणे अशी त्याची लक्षणे असतात. त्याच वेळी मुलाला शी शु पण होते व तोंडातून फेसही येतो. झटके काही क्षण राहतात. डॉक्टरांकडे नेईपर्यंत झटके थांबलेले हि असतात. अशा वेळी झटके आल्यानंतर मुलाला पाठीवर झोपवून मान एका दिशेने वळवावी म्हणजे तोंडाला फेस बाहेर येईल व जीभ दाताखाली येणार नाही. नंतर त्याला डॉक्टरांकडे घेऊन जा.
ताप कसा मोजावा?
- ताप यायला लागल्यानंतर दिवसातून तीन ते चार वेळा ताप मोजावा. ताप मोजण्यासाठी थर्मामीटर वापरल्यानंतर धुवून,डेटॉल मध्ये बुडवून कोरड्या जागी ठेवावा.
- काखेतील तापमान हे गुद्वाराच्या तापमानापेक्षा थोडे कमी असते,तसेच तोंडातील तापमानही थोडे कमी असते. पाच वर्ष वयापेक्षा कमी मुलांचा ताप मोजताना थर्मामीटर काखेतच ठेवावा.
- पाच वर्षाहून मोठ्या मुलांचे तापमान तोंडात थर्मामीटर ठेवून मोजता येते,पण मूल दाताने तोडणार नाही याची काळजी घ्यावी.
- काखेतील तापमान iमोजण्यासाठी बाळाच्या अंगातील सदरा , झबले काढून घ्यावे.काखेतील त्वचा कोरड्या कपड्याने पुसून घ्यावी. थर्मामीटर झटकून पारा खाली आणावा. नंतर थर्मामीटर मुलाच्या काखेत ठेवून. हात घट्ट धरावा आणि दोन मिनिटानंतर तापमान पाहावे.
आदर्श तापमान
मुलांच्या शरीराचे सर्वसाधारण तापमान ३६.४ ते ३७. २ अंश सेल्सिअस असणे आवश्यक असते. साधारणपणे १०१अंश फॅरनहिटच्या पुढे ताप गेला की,तो आटोक्यात आणणे आवश्यक आहे.
तापावर उपचार
- ताप असल्यास डॉक्टरी सल्ला घेणे आवश्यक. त्याबरोबर लवकर आराम पडण्यास मदत म्हणून पुढील उपचार करावेत.
- गरम केलेला तुळशीचा रस छाती व कपाळावर चोळावा. एक चमचा रस,अर्धा चमचा मध मिसळून मुलाला पाजावा. यामुळे ताप लगेचच कमी होईल.
- १० ग्रॅम तुळशीची पाने, १०ग्रॅम मेथी,५ग्रॅम इंद्राजव घेऊन ५०ग्रॅम पाण्यात,पाण्याचा चौथा भाग राहीपर्यंत उकळावे.पाणी थंड झाल्यावर गाळून प्याल्यास ताप बरा होतो.
- तुळशीची पाने , बाभळीची कोवळी पाने व ओवा प्रत्येकी दहा दहा ग्रॅम घ्या.त्यातील ५ ग्रॅम भाग ५० ग्रॅम पाण्यात उकळा एक चतुरतांश भाग पाणी राहिले की काढा.त्यात साखर घालून मुलाला पाजा . कोणत्याही प्रकारच्या तापावर हे औषध गुणकारी व उपयोगी ठरतो .
- तुळशीचा रस १० ग्रॅम, पिंपळाचे चूर्ण दोन ते तीन ग्रॅम व ५ ग्रॅम साखर एकत्र करून मुलास पाजल्यास ताप उतरतो.
- भरपूर पाणी, दूध, गोड फळांचा रस, इतर रोजचा आहार देण्यास काहीच हरकत नाही. तळलेले पदार्थ देऊ नयेत.

खोकला
कोरड्या खोकल्यात घशाच्या आजारामुळे विशिष्ट्य प्रकारचा आवाज येतो. डांग्या खोकल्यात खोकल्याची उबळ येते,तर दम्यासारखा तसेच न्यूमोनियाच्या आजारात कफाचा खरखर असा आवाज येतो आणि श्वास घ्यायला त्रास होतो. खोकला येत असल्यास भरपूर पाणी पाजावे. थंड,आंबट पदार्थ देणे टाळावे. घरातील धूळ कमी करून पाळीव प्राणी घराबाहेर ठेवावेत.
खोकल्यावर उपचार
- पाव चमचा अद्रकचा रस मधात टाकून सकाळ – संध्याकाळ चाटायला द्यावा.
- डाळिंबाची साल वाळवून बारीक करावी. याची दोन ग्रॅम चूर्ण मधात मिसळून बाळाला द्यावे.
- छोट्या पिंपळीचे बारीक चूर्ण मधात टाकून चार पाच दिवस दोन वेळा चाटायला द्यावे.
- १० ग्रॅम सुहागा आणि १० ग्रॅम मध दोन्ही एकजीव करून २-३ वेळेस अर्धा चमचा पाजवावे.
- हळद ३ ग्रॅम मधात मिसळून सकाळ संध्याकाळ लहान मुलांना चाटण दिल्याने प्रत्येक प्रकारचा खोकला कमी होतो.
- ज्येष्ठमध गाईच्या दुधात उगाळून दिवसातून चार वेळा चाटवावे.
- कोष्टाचें वस्त्रगाळ चूर्ण मधातून सात दिवस दररोज तीन वेळा चाटवावे.
- फड्या निवडुंगाची पिकलेली फळे त्यांचे काटे कापून फुफाट्यात भाजून त्यांच्या रसात खडीसाखर घालून पाक करावा. तो रोज तीन चार वेळा एकेक चमचाभर मुलास चालवावा.
- दोन ग्रॅम भाजलेली हळद गाईच्या दुधात किंवा गाजराच्या रसात कालवून मुलांना पाजल्यानेही खोकला नाहीसा होतो.
- एक ग्लास दुधात अर्धा ग्लास पाणी, एक चमचा कुटलेली हळद व २ चमचे गूळ एकत्र करून एक ग्लास दूध उरेल इतके उकळावे. दूध कोमट झाल्यानंतर सेवन करावे.
- बाळाला जर उचकी लागत असेल तर बोराच्या बी मधील गर व भाताच्या लाह्या बारीक वाटून ते मधातून चाटवावे.
कफ
- बेहडे हळद मधात उगाळून मुलास दिवसातून तीन ते चार वेळा चाटवीत जावे.
- बाळ हिरडे, पिंपळे व मनुका एकत्र बारीक वाटून ते थोडे थोडे मधातून चाटवीत जावे.
- तुळशीच्या पानांच्या व आल्याच्या रसात मध घालून तो दररोज तीन चार वेळा चाटवीत जावा.
- खडीसाखर व धने यांचे वस्त्रगाळ चूर्ण मुलास तांदळाच्या धुवणातून पाजीत जावे.
पोटदुखी
लहान बाळाच्या पोटात गॅसेस झाल्यास तसेच अन्न सेवन करणाऱ्या बाळाला अपचन झाल्यास किंवा गॅस्ट्रो सारख्या आजारांची लक्षणे म्हणूनही पोट दुखू शकते. बऱ्यचदा बाळ एकसारखं रडताच राहत.एक तास किंवा त्याहूनही जास्त काळ. विशेषतः संध्याकाळ ते मध्यरात्र या दरम्यान बाळ रडतं. अशा वेळी बहुतेक करून बाळाला पोटदुखीचा त्रास होत असतो. काही वेळा बाळ स्वतःचे पाय ओढून,हाताच्या मुठी घट्ट आवळून रडतं,गॅसेस शरीराबाहेर निघतात, लालसर शी होते. स्तनपान देणाऱ्या मातेने मसालेदार अन्न,लसूण, कांदा,दुग्ध पदार्थ (जड असणारे)खाल्यास बाळाला त्रास होऊ शकतो. पोटदुखीमुळे बाळ सारखे रडत असल्यास त्याला डॉक्टरांकडे नेणे गरजेचे ठरत.
पोटदुखीवर उपचार
- जायफळ पाण्यात उगाळून मधासह चाटण दिल्याने बाळाची पोटदुखी थांबते.
- दोन ग्रॅम लवंग चूर्ण मधात टाकून बाळाला चाटण द्यावे.
- दोन ग्रॅम ज्येष्ठम आणि छोट्या पिंपळीचे चूर्ण मधात टाकून द्यावे.
- पाव चमचा ओवा तव्यावर भाजून चूर्ण करावे.हे मधासह बाळाला चाटायला द्यावे.
- जर मुलाला अतिसार झाला असेल, तर जायफळ उगाळून चाटवावे. वरून थोडे अगदी ताजे व गोड ताक प्यायला द्यावे.
- बाळाला पाजताना बाळ सरळ उभ्या स्थितीत राहील असं धरावं म्हणजे दुधाबरोबर पोटात जाणारी हवा निघून जाईल.
- स्तनपान देताना किंवा बाटलीने दूध पिताना आणि पिण्यापूर्वीही बाळाच्या पाठीवर हलक्या hatan चोळल्यास पोटातील हवा बाहेर पडेल.
- बाळाला ‘ग्राईप वॉटर’ पाजावं.
- पेपरमिंटचा छोटा तुकडा पाण्यात विरघळून बाळाला पाजावा.
- बाटलीने दूध देताना सुरुवातीलाच बाटली हलवून बाटलीत हवा राहणार नाही याची काळजी घ्यावी. हवेच्या बुडबुड्यामुळे पोटात गडबड सुरु होते.
- एक काप गरम पाण्यात ओवा पाच दहा मिनिटे भिजत घालावा आणि दोन दोन चमचे करून दिवसातून तीन चार वेळा बाळाला पाजावे.
पोटातील जंत
खाण्याच्या वाईट सवयीमुळे बाळाच्या पोटात जंत होतात. जंत होऊ नयेत यासाठी बाळाला बाहेरचे खाद्य पदार्थ देणे टाळावे. तसेच स्वच्छ आणि निर्जंतुक केलेलं पाणी प्यायला द्यावे.
जंत झाल्यास घ्यावयाची काळजी.
- तुळशीच्या पानांचा रस मधात मिसळून चाटण्यास दिल्याने लहान मुलांच्या पोटातील जंत विष्टेतून बाहेर पडतात.
- लहान मुलाच्या पोटात अनेक प्रकारचे कृमी कीटक निर्माण होतात आणि त्यामुळे त्यांचे आरोग्य दिवसेंदिवस बिघडत जाते.यापासून बचाव करण्यासाठी कडुनिंबाच्या पानांचे चूर्ण १० ते १० दिवस मुलांना द्यावे. यामुळे पोटातील सर्व कीटक हळूहळू मारायला लागतात.
- लहान मुलांना घोळच्या रसात मध टाकून काही दिवस प्यायला द्यावे.
- लहान मुलांना पपईचा रस मध टाकून प्यालाल द्यावा.
- मधात पारिजातकाच्या पानांचा रस मिसळून टाकावा.
- ज्या मुलांच्या पोटात जंत झाले आहेत,त्यांना काशीफळाचे चूर्ण दिल्यास ताबडतोब आराम मिळतो.
जुलाब
अनेक वेळा गॅस्ट्रो,कावीळ , मेंदूज्वर , मूत्रपिंडाचे आजार यामध्ये बाळाला जुलाब होऊ शकतो.अनेक वेळा उलटी होणे,उलटी बरोबर ताप येणे,पोट दुखणे , डोके दुखणे, मूल सारखे झोपणे किंवा त्याला झटके येणे,बराच वेळ लघवी न होणे, उलटीत रक्त पडणे किंवा उलटीचा रंग हिरवा असणे अशी काही लक्षणे दिसून आल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. वारंवार पातळ पाण्यासारखी शी होणे म्हणजे जुलाब होणे .नेहमी होणाऱ्या शी चे प्रमाण वाढणे, शी ला दुर्गंधी येणे असे असल्यास जुलाब होताहेत हे लक्षात घ्यावे. वरचे दूध पिणाऱ्या मुलांच्या शी पेक्षा स्तनपान करणाऱ्या बाळाची शी पातळ असते. त्याला जुलाब समजू नये.
जुलाब थांबवण्यासाठी उपचार
- जिवाणूंच्या संसर्गामुळे जुलाब होतात. अस्वच्छतेमुळे जिवाणूंचा संसर्ग होतो. म्हणून बाळाचे कपडे,त्याची खेळणी,त्याची भांडी स्वच्छ ठेवावीत व निर्जंतुक ठेवावेत. त्याचे पूरक अन्न,दूध तयार करण्यापूर्वी व स्तनपान देण्यापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवावेत.
- पाणी पाजण्यापूर्वी ते चांगले उकळून थंडगार करावे व वाटी चमच्याने पाजावे.
- दुधासाठी बाटलीची सवय न लावता वाटी चमच्याने पाजावे.
- घरात व घराभोवतालच्या परिसरात स्वच्छता ठेवावी. म्हणजे माशा, डास यांचा उपद्रव व जंतूंचा प्रादुर्भाव होणार नाही.
- बाळाला ताजे व झाकून ठेवलेलेच अन्न द्यावे.
- वरचे दूध देताना थोडे पाणी व साखर घालून मग चांगले उकळावे.
- बाळ जमल्यानंतर काळपट, हिरवट,चिकट शी होते.हळूहळू ती नंतर काही दिवसांनी पिवळसर होऊ लागते. एका दिवसात ६-७ वेळा शी होते. पुढे पुढे तीन चार वेळा शी होते. पण वारंवार व पाण्यासारखी शी झाली व उलट्याही सुरु झाल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होते. शरीरातले पाणी उलट्या व जुलाबामुळे कमी होत जाते व डिहायड्रेशन चा धोका निर्माण होतो.
- सतत जुलाब व उलट्यामुळे शरीरातील पाणीआणि क्षार कमी होणे म्हणजे डिहाइड्रेशन होय. बाळ चिडचिडे होते. त्याला खूप तहान लागते. लघवी कमी होते. हि लक्षणे डिहायड्रेशन ची आहेत हे लक्षात घेऊन ताबडतोब बाळाला डॉक्टरांकडे न्यावे, नाहीतर बाळाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.
उलटी
- दूध पिताना दुधाबरोबर हवा पोटात गेली तर बाळाला उलटी होते. बाटलीमुळे दूध पिताना जास्त हवा पोटात जाऊ शकते. त्यासाठी त्याला दूध पिल्यानंतर ढेकर देण्यासाठी खांद्यावर उभे धरून पाठीवर हलकी थाप द्यावी. ढेकर देताना थोडीशी उलटी होते. मांडीवर निजवून हळूहळू चमच्याने दूध पाजणे उत्तम.
- दोन तीन महिन्याचे बाळ आईचे दूध पिल्यानंतरही थोडीशी उलटी करते.
- बाळाला सावकाश हाताळावे. धसमुसळेपण नको. नाहीतर नाकातोंडातून बाळाला उलटी होऊ शकते .
- या उलट्या अपायकारक नसतात. वजन उंचीत वाढ होत असते.
- ठसका आल्यामुळे बाळाला उलटी होऊ शकते.
- टॉन्सिल्स सुजल्यामुळे, कान फुटल्यामुळे मुलांना उलटी होते.
- गॅस्ट्रो ची लागण झाल्यास जुलाब,उलट्या व ताप अशी लक्षणे असतात. डिहायड्रेशन ची शक्यता निर्माण होते. म्हणून डॉक्टरांना दाखवावे.
- डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर व दिलेल्या प्रमाणातच द्यावीत.
डोळ्यांची काळजी
- बाळ जन्मल्यानांतर जर त्याच्या डोळ्यातून पाणी किंवा घाण येत असेल तर लगेच डॉक्टरांना दाखवावे.
- लहान मुलांच्या डोळ्यात काजल शक्यतो घालू नये.
- बाळाला अंधारात झोपवू नये,बाळ झोपत असलेल्या खोलीचा लाईट कधीच बंद करू नये.
- व्हिटॅमिन ‘अ’ची कमतरता निर्माण होऊ नये यासाठी आईने ‘अ’ जीवनस्तव आहार घ्यावा.
- बाळाच्या डोळ्यात एखादी असाधारण गोष्ट जसे ठिपका,फोड दिसत असेल तर लगेच डॉक्टरांनाच सल्ला घ्यावा.
डोळे आल्यावर
जंतू संसर्ग, विषाणूंची बाधा किंवा allergy मुळे डोळे येतात. डोळे लाल होऊन त्यातून घाण येते आणि डोळयांना सूजही येते. डोळे दुखायला लागून त्रास होतो.
- डोळे आलेतर गुलाब पाणी आणि मध समभागीं घेऊन दोन्ही डोळ्यात एकेक थेंब टाकावा. लगेच आराम पडतो.
- शक्यतो डोळ्यांच्या डॉक्टरांना दाखविणे उत्तम.
कानदुखीवर उपचार
- प्रथम दुखणाऱ्या कानात गोडेतेल कोमट करून दोन थेंव झोपताना टाकावे. नंतर दुसऱ्या दिवशी अलगद कापसाने साफ करावे.
नासिका रोग
- आईच्या दुधात मध मिसळून नाकपुड्यात सोडावा.
- बाळाच्या नाकाला मध लावावा.
- पिंपळी दोन रत्ती आणि वंशलोचन चूर्ण घेऊन मधात मिसळून लहान मुलांना चाटण द्यावे.
दाताचे विकार
- दात उशीर उगवणे
- उगवताच किडलेले दात येणे
- दात किडणे
- वेडेवाकडे दात येणे
- ठिसूळ दात येणे
सुलभ दात येण्यासाठी उपाय
- गाईच्या दुधात मध टाकून सुमारे १५ दिवस पाजल्याने बाळाचे दात लवकर येतात.
- तुळशीच्या पानांचा रस मधात टाकून हिरड्यांवर हळुवारपणे चोळावा.
- द्राक्षांच्या दोन चमचे रसात एक चमचा मध टाकून सकाळ संध्याकाळ चाटण्यास द्यावे.
- मधामध्ये गोड संत्रांचा रस मिसळून बाळास द्यावा.
तोंडातील चट्टे
- कात,चिकणी सुपारी आणि छोट्या वेलचीचे चूर्ण मधात टाकून चाटण द्यावे.
- लहान मुलाना पोटातील उष्णतेमुळे तोंडात किंवा जिभेवर चट्टे येतात, त्याकरिता जिभेवर आणि तोंडाला मध लावावा.
- वंशलोचन, लहान वेलची आणि पांढरा काथ यांचे चूर्ण करून मधात मिसळून एकजीव करावे. हे मिश्रण जीभ आणि ओठांवर लावावे
- तोंडातील व्रणासाठी धन्याचे चूर्ण, भाजलेल्या केशराच्या चूर्णात एकत्र करून व्रणाच्या ठिकाणी लावल्याने तोंडातील व्रण जातात.
- धने पाण्यात उकळून गुळण्या केल्याने देखील तोंडातील व्रण जातात.
कांजण्या
बाळाला कांजण्या झाल्यास त्याच्या आहाराकडे लक्ष द्यावे व इतर मुलांत त्याला खेळू देऊ नये किंवा शाळेतही पाठवू नये. कांजण्या असलेले बाळ इतर मुलात खेळल्यास किंवा त्या काळात शाळेत गेल्यास, शाळेतील वा निकटसंपर्कातील बाळांनाही आजार होऊ शकतो. कांजण्या सौम्य स्वरूपाचा आजार आहे
कांजण्यावर उपचार
- ताजे,हिरवे वाटाणे पाण्यात उकळावे आणि ते पाणी बाळाच्या अंगाला हळुवार पणे लावावे. त्यामुळे त्याच्या त्वचेची आग कमी होऊन बाळाला आराम मिळतो.
- एका पेल्यात पाणी घेऊन त्यात थोडा सोडा घालावा. या पाण्याने बाळाचे अंग पुसून घ्यावे.सोड्यामुळे कांजण्या खाजत नाहीत.
- ‘ई’ जीवनसत्वाचे तेल बाळाच्या अंगाला हळुवारपणे चोळावे. त्यामुळे कांजण्या बऱ्या होण्यास मदत होते व त्वचेवर राहणारे व्रण पुसत होत जातात.
- बाळाच्या अंगाला मध लेपासारखा लावावा. तीन दिवसात आजार आटोक्यात येतो.
- कांजण्यावर घरगुती उपचार करण्याबरोबर डॉक्टरांचाही सल्ला घ्यावा.
कावीळ
जन्मल्यानंतर ४८ तासांनी कधी कधी बाळाची त्वचा पिवळी पडते.हि नसर्गिक कावीळ असते. चेहऱ्यापासून सुरुवात होऊन ती खाली पायापर्यंत सरकते.या नैसर्गिक काविळीने बाळाला अपाय होत नाही. मोठेपणाचा कावीळ हा लिव्हरचा रोग व कावीळ यांचा संबंध नाही. अशा नैसर्गिक काविळीवर औषधोपचाराची गरज नाही. हि कावीळ काही दिवसातच जाते. दहा दिवसापेक्षा जास्त दिवस राहिलीच तर मात्र डॉक्टरांना दाखवावे.
नैसर्गिक कावीळ म्हणजे काय?
सर्वसाधारण लाल पेशी या गर्भात असलेल्या बाळाच्या लाल पेशीतून वेगळ्या असतात. मुलाचा जन्म झाल्यावर या लाल पेशी तुटू लागतात व त्यातून पिवळसर द्रव बाहेर येतो. हा द्रव यकृता द्वारे बाहेर फेकायला हवा पण नवजात बालकाचे यकृत तेवढे सक्षम नसते. त्यामुळे हा द्रव रक्तात साचतो व कावीळ दिसू लागते.
काविळीचे लक्षणे
- पोटावर पिवळसर दिसल्यास काविळीचे प्रमाण जास्त आहे असे समजावे.
- तळहात व तळपाय यावर पिवळेपणा दिसल्यास गंभीर लक्षण समजून ताबडतोब डॉक्टरांनां दाखवावे.
- माता व मुलाच्या रक्ताचे ग्रुप वेगळे असतील तरीही मुलाला कावीळ होते.
- गर्भारपणात किंवा प्रसूतीनंतर मातेला संसर्गजन्य रोग झाल्यास बाळाला कावीळ होऊ शकते.
- बाळाला झालेला श्वासावरोध विषाणूंचा संसर्ग,पित्तनलिकातील दोष थायरॉईड ग्रंथीच्या अंतस्रावाची कमतरता, आर. एच.रक्तगटाच्या दोषातून उद्भवणारा कावीळ हि असाधारण अशा काविळीची प्रमुख करणे आहेत.
काविळीवर उपचार
- मुळ्याची पाने वाटून त्याचा रस काढावा व तो गाळून बाळाला पिण्यास द्यावा. या रसामुळे बाळाचे पोट साफ राहील व त्याला भूक लागेल.
- बाळाला चिमूटभर मीठ आणि मिरेपूड घालून टोमॅटोचा रस पिण्यास द्यावा.
- कावीळ हा दोन प्रकारचा असल्यामुळे घरगुती औषध देण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषध दिलेले अधिक चांगले.
- बाळाला दिवसातून पाच ते सहा वेळा लिंबू पाणी पिण्यास द्यावे,म्हणजे कावीळ बरी होण्यास मदत होईल.
- तेलकट व तळलेले पदार्थ देऊ नयेत. बाकीचा समतोल आहार द्यावा. थोड्याशा प्रमाणात आहारातून तेल तूप दिल्यास हरकत नाही, पण प्रमाण कमीच असावं. अन्न वर्ज्य करू नये.
गोवर
शरीरात गोवरच्या जंतूंची लागण झाल्यानंतर एक दोन आठवड्यात गोवराची लक्षणे सर्दी, ताप,नाकातून पाणी येणे दिसू लागतात.नंतर ३-४ दिवसांनी अंगावर लाल पुरळ येतात. याला खेड्यात गोवर बाहेर पडणे असे म्हणतात. ते चूक आहे. गोवरचे विषाणू हे लागण झाल्यापासून ते पुरळ मावळून खपल्या पडेपर्यंत श्वासावाटे बाहेर टाकले जातात. अंगावर पुरळ पुरेसा आला नाही,तर गोवर पूर्ण बाहेर पडला नाही हा समाज चूक आहे. गोवराची साथ चालू असताना मुलाला ताप आल्यास तापाची गोळी द्यावी व डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तापासाठी इंजेकशन देऊ नये. ताप जास्त असेल तर अंग थंड पाण्याने पुसून घ्यावे. मुलाला भरपूर पाणी पाजावे. अंगावर गरम पांघरून घालू नये. गोवराच्या रुग्णास पौष्टिक आहार द्यावा. गोवर हा आपोआप बरा होणारा विकार असला,तरी गोवर प्रतिबंधक लस देणे केंव्हाही चांगले.
गोवरावर उपचार
- गोवर आल्यानंतर मुलांच्या पोटात आग पडते, त्यासाठी मुलाला सात दिवस सकाळ संध्याकाळ एक ते दोन तोळे गुलकंद खाण्यास द्यावा.
- गोवर किंवा कांजण्या येऊन गेल्यानंतर पोटात पडणाऱ्या आगीवर पांढरे कांदे सोलून ते वाफाळून गुळाच्या पाकात वेलदोड्याची पूड व ते कांदे घालून ठेवावे.त्यात पाक मुरल्यानंतर दररोज एकेक कांदा पाकासह सकाळ संध्याकाळ पंधरा दिवस खाण्यास द्यावा.
- गुळवेल अर्धा तोळा व मनुका एक तोळा यांचा काढा एक कपभर सकाळ संध्याकाळ पंधरा दिवस खडीसाखर व जिऱ्याचे चूर्ण घालून द्यावा. अंगात मुरलेली कडकी जाते. या वरील उपायांनी भूकही वाढते.
टायफॉईड
प्रदूषित अन्न किंवा पाणी बाळाला दिल्याने साल्मोनीला नावाचे सूक्ष्म जंतू बाळाच्या पोटात जातात. ते आतड्यात जाऊन रक्ताद्वारे शरीराच्या विविध भागात पोहोचतात. रक्तात या सूक्ष्म जंतूंची संख्या वाढल्याने तीव्र ताप येतो. पित्ताशयात या सूक्ष्म जंतूंची झपाट्याने वाढ होत असते त्याच्या वाढीसाठी हेच ठिकाण उपयुक्त असते.
टायफॉईड ची लक्षणे
- अचानक ताप येणे,उलटी होणे, जुलाब होणे.
- डोके व अंग दुखणे,तसेच खोकला येणे
- तीव्र ताप येणे व खोकला वाढत जाणे.
- यकृत वा पित्ताशयावर सूज येणे.
- चेहरा पांढरा पडणे.
- काही वेळेस पोट व छातीच्या मधल्या भागात लहान लहान पांढरे डाग पडतात.
टायफॉईड चे परिणाम
- न्यूमोनिया होणे
- पोट फुगणे
- यकृत वा पित्ताशय सुजणे
- आतडयाचा अल्सर होणे.
- मेंदूच्या वेष्टनाचा दाह आणि अर्धांगवायू होणे.
- हाडांमध्ये गलता येणे.
- सांध्यात घाण होणे.
- रक्ताची कमतरता निर्माण होणे.
टायफॉईड चे उपचार
- प्रदूषित अन्न व पाणी यापासून आपल्या बाळाचे रक्षण करावे.
- बाळासाठी असलेल्या सगळ्या स्वच्छतेच्या नियमांचे पालन करावे.
- वेळेवर लसीकरण करून घ्यावे.
- घरगुती उपचार करत बसण्याऐवजी लवकरात लवकर दवाखान्यात न्यावे.
पुरळ
- थंड पाण्यात गोपीचंदन उगाळून त्याचा लेप लावावा.
- बाळाला जिथे जास्त पुरळ आले असतील तिथे गुलाबपाणी व चंदनाचा लेप करून लावावा.
- मेंदीची पाने पाण्यात वाटून त्याचा लेप लावल्याने देखील पुरळ कमी होतात.
- बाळाच्या अंगावर जर तेलामुळे पुरळ आले असतील, तर तेलाऐवजी दुधात थोडी हळद घालून ते बाळाच्या अंगाला लावावे.
घामोळ्या
- जांभळाच्या बी मधील गर पाण्यात उगाळून त्याचा लेप घामोळ्यांवर लावावा.
- थंड पाण्यात आवळकंठी उगाळून तिचा लेप घामोळंयनावर लावावा.
- पांढरे चंदन थंड पाण्यात उगाळून त्यात किंचित कपूर घालून त्याचा लेप घामोळ्यांवर लावावा.
हे पण वाचा-मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपाय