- तर मित्रानो आज आपण जाणून घेणार आहोत 151 सुंदर मराठी सुविचार संग्रह

1)शाळा हे समाजाने,समाजाच्या विकासासाठी निर्माण केलेले एक संस्कार केंद्र आहे.
2)चारित्र्याचा विकास घडविते , तेच खरे शिक्षण
3) नम्रता हा माणसाचा खरा दागिना आहे.
4) शिक्षण म्हणजे समाज सुधारणा होय.
5) बालमनाची कळी प्रेमाच्या फुंकराने फुलवित असतात तेच गुरु.
6) ज्ञान हाच सर्व सामाजिक व राजकीय क्रांतीचा पाय आहे.
7) प्रयत्न हा पॅरिस असून त्याच्या योगाने वाळवंटाचे नंदनवन करता येते.
8) स्त्री हि क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता आहे.
9) विनय हा गुण सर्व सद्गुणांचा अलंकार आहे.
10) घर हि गोष्ट दगडविटांनीं बांधली जात नाही,जिव्हाळ्याच्या व प्रेमाच्या धाग्यांनी बांधले जाते तेच खरे घर होय.
11) जेथे आळशी आरामात आहे, तेथे राम नाही.
12) विद्येवाचून मान नाही,विद्येवाचून द्रव्य नाही,आणि विद्येवाचून मनुष्यपण हि नाही.
13) मुले म्हणजे नवं जगाची आशा -उद्याचे जग बनवणारी थोर शक्ती म्हणजे मुले- साने गुरुजी.
14) गरजवंताला अक्कल नसते.
15) झोपताना दिवसाचा आढावा घ्यावा.
16) मोठी माणसे आलेल्या संधीचा कधीच दुरुपयोग करीत नाहीत.
17) चांगले संभाषण आणि चांगली संगत म्हणजेच सद्गुण समजा.
18) बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्यापूर्वीच विचार केलेला बरा .
19) कधीच न करण्यापेक्षा उशिरा का होईना केलेले बरे.
20) बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले- संत तुकाराम
21) जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण.
22) कला अशी पाहिजे कि, जी लाखो लोकांशी बोलू शकेल.
23) आपल्या दुःखाचे कारण कोणतेही असले, तरी दुसऱ्याला इजा करू नका.
24) अधिक मित्र हवे असतील, तर दुसऱ्यांच्या गुणाचे मनापासून कौतुक करा.
25) अनुभव हा महान शिक्षक आहे, पण तो मोबदला मात्र फार घेतो.
26) आईच्या डोळ्यातील रागामागे वात्सल्याचे सागर उचंबळत असते.
27) अविचाराने आत्मघात होतो.
28) आशा हि निराशेची छोटी बहीण आहे.
29) अपयशाच्या कठीण खडकाखालीच यशाच्या पाण्याचा धारा असतात.
30) आपण केलेल्या परीक्षा आणि आपली घड्याळे नेहमीच बदलत असतात.
31)कदा बोललेले खोटं लपविण्यासाठी अनेक वेळा खोटे बोलावे लागते, म्हणून खोटे बोलू नये.
32) गुलाबाला काटे असतात म्हणून तक्रार करण्यापेक्षा काट्याला गुलाब असतो, याचे सुख माना .
33) गरीब परिस्थिती समाधान हे खऱ्या श्रीमंतीचे लक्षण आहे.
34)गरिबांना दुःख अनुभवाने कळते, पण श्रीमंतांना ते बुद्धीने जाणून घ्यावे लागते.
35) गेलेल्या संधीबद्दल रडत बसण्यापेक्षा येणाऱ्या संधीचे स्वागत करा.
36) चित्र हि हाताची कृती आहे,पण चरित्र हि मनाची कृती आहे.
37)संकटे पाहून जो घाबरत नाही, तोच खरा माणूस होय.
38) सज्जन माणूस म्हणून जन्माला येणे हा योगा योग आहे पण सज्जन माणूस म्हणून मरणे हि आयुष्यभराची कमाई आहे.
39) हास्य हे जीवन वृक्षाचे फुल आहे, परंतु अश्रू हे त्याचे फळ आहे.
40) संयम हा परीस आहे,त्याने पशूचा माणूस आणि माणसाचा देव होतो.
41) स्वतःला लपविण्याचा एकाच मार्ग आहे आणि तो दुसऱ्यावर टीका करणे होय.
42) स्वतःच्या बाबतीत स्वतः कधीच नायाधीश बनू नका.
43) सौन्दर्य हे वस्तूत नसून पाहणाऱ्याच्या द्रिष्टीत असते.
44) समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात
45) संकटाना भिऊ नका, संकटाना संधी मानून त्यावर करा.
46) संकट हा सत्याकडे जाण्याचा पहिला मार्ग आहे
47) श्रीमंतीची कास धरण्यापेक्षा लोकप्रगतीची कास धरा , तुम्हीआपोआप श्रीमंत व्हाल.
48) शरीराला जसा व्यायाम तसे मनाला वाचन.
49) वृक्ष म्हणजे पृथ्वीने आकाशाच्या, विशाल भूर्जपत्रावर लिहिलेलं काव्य होत.
50) विचाराचे हत्यार नीट हाताळता यावे,याचेच खरे नाव शिक्षण होय
51) विजय हा मागून मिळत नसतो, तो धैर्याने झगडून मिळवावा लागतो.
52) वचन देताना विलंब करा, पण पाळताना घाई करा.
53) ज्ञानात मिळते तेवढे परम सुख अन्य कशातही नाही.
54) धैर्य धरणाऱ्याला नेहमी सुवार्ता ऐकण्यास मिळते.
55) धैर्य हे प्रेमासारखे आहे, नुसत्या आशेच्या बळावर ते वाटेल तितके वाढते.
56) ध्येयामागे धावताना लोकनिंदेकडे लक्ष देऊ नका.
57) नम्रता हाच ज्ञानाचा आरंभ.
58) परिस्थिती सुधारण्यासाठी कृती सुधारा.
59) पैसा बोलू लागतो,तेंव्हा सत्य गप्प बसते.
60) जशी रत्ने बाहेरून चमक दाखवतात्त, तशी पुस्तके हि आतून अंतःकरण उजळतात.
61) पुस्तके हि काळाच्या विशाल सागरातून आपणास घेऊ जाणारी जहाजे आहेत.
62) विचाराच्या युद्धात पुस्तक हेच शास्त्र आहे.
63) पुस्तक म्हणजे खिशातील बाग.
64) ध्येयाचे सूप व्यवहाराच्या शेणाने सरवावे.
65) सारी सोंगे करता येतील पण पैशाचे सोंग करता येत नाही.
66) पैशाचा प्रश्न आला कि, सर्वजण एकाच धर्माचे होतात.
67) पैशाशिवाय जीवनात अर्थ नाही, एक अर्थ असला म्हणजे जीवनात पुष्कळ अर्थ असतात.
68) प्रगती हे जीवनाचे ध्येय आहे, तर गती हा त्याचा आत्मा आहे.
69) प्रयत्न हा परमेश्वर.
70) प्रार्थना म्हणजे माणुसकीची हाक.
71) प्रार्थना म्हणजे मौन साधून मागणीरहित होऊ न केलेले आत्मसमर्पण होय.
72) प्रार्थना म्हणजे आत्म्याची भूक शरीराला जेवढे आवश्यक आहे, तेवढीच शरीराला प्रार्थना आवश्यक आहे.
73) जसे सोने तप्त केल्याने शुद्ध होते, तसे पश्चातापाने मन पवित्र आहे.
74) रिकामे मन कुविचाराचे धन.
75) बुद्धी हे आत्मदर्शनाचे महाद्वार आहे, बुद्धी उघडली कि, आत आत्मा उभाच आहे.
76) भक्त कर्माची उपासना करतो,तर कर्मठ उपासनेचे कर्म करतो.
77) मन सत्याने शुद्ध होते.
78) विश्वासामुळे माणसाला बळ येते.
79) जो माणूस कोणत्याही संकटाला भीत नाही, मृत्यूलाही भीत नाही, तोच माणूस जीवनाची गोडी चाखू शकतो.
80) ज्याचं मन सदा धर्मरत राहत, त्याला देवदेखील नमस्कार करतो.
81) आत्मविश्वास हे एक प्रभावी अंजन हे ज्याच्या डोळ्यात लकाकत असेल त्याला कसल्याही काळोखातून अचूक मार्ग दिसतो.
82) कर्तव्यची दोरी मनाच्या पतंगाला नसेल तर तो कुठेही फडफडत जातो.
83) अन्न म्हणजे देव आहे, म्हणून अन्नाचा कधीही अपव्यय करू नका.
84) स्वतःची चिंता ना करता जो दुसऱ्याची चिंता करतो तोच खरा संन्याशी .
85) दुर्बल मनाचा मनुष्य कधीही हुतात्मा होऊ शकत नाही म्हणून दुर्बल राहू नका.
86) दुसऱ्याचे ओझे उतारवण्यासाठी जेंव्हा तुम्ही पुढे होता, तेंव्हा तुमचे ओझे पूर्वीपेक्षा हल्केहोईल हे नक्की.
87) खोटा मन, खोटी रोट सोडा,म्हणजे तुम्हाला काहीही कमी पडणार नाही.
88) न्यायाची मागणी करणाऱ्यांनो स्वतः न्यायी असले पाहिजे.
89) यशाचे शिखर गाठण्यासाठी काही वेळेला अपयशाच्या पायऱ्या चढाव्या लागतात.
90) जसे लोंखंडाने लोखंडला कापता येते तसे मनाने मनाला जिंकता येते.
91) जसा आरसा मळणे अस्वच्छ होतो,तसे मन अयोग्य कर्माने मालिन होते.
91) शरीराची जखम उघडी केल्याने चिघळते, तर मनाची जखम उघडी केल्याने बरी होते.
92) सावधपणा, उत्तम निर्णय शक्ती , स्वावलंबन आणि दृढ निश्चय हे गन यशासाठी आवश्यक असते.
93) वाचनासाठी वेळ काढा, तो शहाणपणाचा निर्झर आहे.
94) मोठेपणाचा मार्ग मरणाच्या मैदानातून जातो.
95) मोठेपणाची इच्छा असेल तर मोठयांची ईर्षा व लहानाचा तिरस्कार करू नये.
96) लोक आपल्याबद्दल काय बोलतात,याचा विचार करण्यापेक्षा लोक आपल्याबद्दल तसे का बोलतात याचा विचार करा.
97) जसा गेलेला बाण परत येत नाही, तसे विचारपूर्वक केलेली गोष्ट विचारात पाडत नाही.
98) जितके निरीक्षण सूक्ष्म, तितकी समजून अधिक, म्हणून जास्त सखोल आणि अचूक विचार करा.
99) जसे प्रकाशाच्या साहाय्याशिवाय वस्तू दिसत नाही,तसे विचाराशिवाय ज्ञानप्राप्ती होत नाही
100) विचाराची संपत्ती हि माणसाच्या जीवनातील कामधेनू आहे.
101) सर्वात अधिक संकटे घेऊन येणार क्षण , आपल्याबरोबर येणाऱ्या संकटासोबत विजश्रीही घेऊन येतो.
102) काम साध्य होईपर्यंत अडचणींना तोंड द्यावेच.
103) ज्ञान म्हणजे काय,इतिहासाचे आणि अनुभवांचे काढ्लेलेले सार.
104) कार्यात यश मिळो न मिळो, प्रयत्न करण्यास कुचराई करू नका.
105) गरिबाने दिलेला पैसा एक हजार रुपयांहून अधिक मोलाचा आहे, कारण गरीब परिस्थितीतही दान करण्याची 106) इच्छा होणे यातच त्याचे मोठेपण आहे.
107) टीका आणि विरोध हीच सुमाज सुधारकास मिळालेली बक्षीस आहेत.
108) देशातील प्रत्येक घर हे शाळा आहे. आणि घरातील माता पिता हे शिक्षक आहेत.
109) विजय हाच शूर व्यक्तीचा अलंकार आहे.
110) विद्या विनयेन शोभते.
111) अनोळख्याला भाकरी द्यावी पण ओसरी देऊ नये.
112) निर्भय कृती हीच खरी प्रार्थना, बाकीच्या अर्ज, विनंत्या म्हणजे केवळ बुडबुडे.
113) वाचन हे मनाचे अन्न आहे.
114) विद्या हे मनुष्याचे सुंदर रूप आहे.
115) विद्या हे गरिबांचे धन आणि श्रीमंताचे अलंकार आहे.
116) मनुष्य मरेपर्यंत विद्यार्थी असतो.
117) विद्यार्थी म्हणजे शिक्षणाचा मुलामा चढलेली कलाकृती.
118) खरे बोलण्याचा एक दुय्यम फायदा असा होतो कि, आपण कोणाशी काय बोलतो हे लक्षात ठेवण्याची गरज नाही.
119) जगात असे एकच न्यायालय आहे कि तिथे सर्व गुन्हे माफ होतात ते म्हणजे आईचे प्रेम.
120) माणूस मोत्याच्या हाराने शोभून दिसत नाही,तर घामाच्या धाराने शोभून दिसतो.
121) आहे त्यातच जर समाधान मानले तर काम, क्रोध आणि लोभ त्यात नष्ट होतात.
122 )गरज हि शोधाची जननी आहे.
123) देवभक्तीहून देशभक्ती श्रेष्ठ आहे.
124) एकाग्र चित्ताने केलेल्या कोणत्याही कार्याचे फलित म्हणजे यश होय.
125) व्यवस्था व शिस्त हि शाळेची शोभा आहे.
126) जो मुलांचे मन जाणतो,तोच यशस्वी शिक्षक होऊ शकतो.
127) जो कर्तव्याला जाणतो, तोच यशस्वी शिक्षक होऊ शकतो.
128) त्याग व परिश्रम केल्याशिवाय कोणतेही कार्य यशस्वी होत नाही.
129) देशाचा विकास करावयाचा असेल, तर बालकांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे.
130) प्रार्थना हाच अहंकार नाशाचा उत्तम उपाय आहे.
131) आळस आणि अतिझोप हे दारिद्रयाला जन्म देतात.
132) अज्ञान हे स्वार्थ आणि मोह यांचे निर्माण केंद्र आहे.
133) तारे कितीही तेजस्वी असले तरी, ते काळोखात चमकतात.
134) आनंद हा असा सुगंध आहे, जो दुसऱ्यावर शिंपीत असताना स्वतः वरही शिंपला जातो.
135) अशा व निराशा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे, आशा संपताच निराशा संपून जाते.
134) सुविचार हे बुद्धीला मिळालेले उत्तम खाद्य आहे
135) कोणतीही चांगली कृती प्रथम आपण करावी मग इतरांना सांगावी.
136) जे काम करावयाचे असेल ते आवडीने करा.
137) सुधारणा हि मनातून झाली पाहिजे, नुसते नियम करून सुधारणा कधीच होणार नाही.
138) माणसाचे सर्वात मोठे शत्रू आळस , अज्ञान आणि अंधश्रद्धा.
139) संधीची वाट पाहू नका. ती स्वतः च शोधा आणि कामी लावा.
140) आयुष्यात नकार सुद्धा खिलाडीवृत्तीने स्वीकारायला शिका.
141) तुलना करावी पण अवहेलना करू नये.
142) मौन हा रागाला जिंकण्याचा एकमेव उपाय आहे.
143) जो सावलीप्रमाणे अतिकठीण प्रसंगही आपली स्वामी निष्ठा कायम ठेवून त्यांच्याबरोबर राहतो तोच खरा सेवक.
144) उच्च शिक्षण त्यालाच म्हणावे कि, जे प्राप्त केल्याने लोक विनम्र, परोपकारी, सेवाभावी आणि कार्य तत्पर होतात.
145) कोणतीही गोष्ट तोडून टाकणे सोपे असते, पण जोडण्याकरिता कौशल्य व सावधगिरी लागते.
146) आत्मविश्वासाचा अभाव हेच अपयशाचे खरे कारण आहे.
147) ज्याच्या अंतःकरणात सद्भावना असते त्याच्या जीवनात कधीच दुःख नसते.
148) आयुष्यातील अडचणी सोडवण्यास समर्थ असते, तेच खरे शिक्षण .
149) सुस्वभाव म्हणजे अशी विशिष्ट जमीन आहे, कि तिथे सद्गुणांचे पोषण होते
150) सावधपणा, उत्तम निर्णयशक्ती, स्वावलंबन आणि दृढ निश्चय हे गुण यशासाठी आवश्यक आहे.
151) ज्ञानाने एखादयची बुद्धी जिंकता येईल पण हृदय जिंकायचे असेल तर सेवेनेच जिंकता येईल.
तर मित्रांनो आशा आहे या सुंदर सुविचार संग्रह चा आपल्याला नक्कीच फायदा होईल.